वडोदरा(बडोदा) जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 35 places to visit in Vadodara District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आम्ही भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती देत आहोत, आता आपण गुजरात मधील वडोदरा (बडोदा) जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहणार आहोत.वडोदरा जिल्हा हा विश्वामित्री नदीच्या काठावर वसलेला असून ज्याला पूर्वी बडोदा म्हणूनही ओळखले जात होते. हा जिल्हा,गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि सुरत नंतरचे तिसरे सर्वात मोठे शहर तर भारतामधील 20 व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. व वडोदरा हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. Top 35 places to visit in Vadodara District

हा जिल्हा एकेकाळी मराठ्यांच्या शाही गायकवाड राजघराण्याच्या मालकीचा होता. हे शहर लक्ष्मी व्हिला पॅलेस आणि गुजरातमधील सर्वात मोठे विद्यापीठ असलेल्या बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठामुळे ओळखले जाते. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहेत,व येथे प्रमुख उद्योगांमध्ये पेट्रोकेमिकल्स, कॉर्पोरेट कंपन्या, आयटी पार्क,अभियांत्रिकी, रसायने, औषधनिर्माण, प्लास्टिक, मॉडेल टेक्सटाइल, टाइल कारखाने आणि परकीय चलन सेवा आहेत.बडोद्याला समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

या जिल्ह्याचे सर्वांगीण प्रगती मराठा शासक महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात झाली. त्यांनी 1875 ते 1939 या काळात राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीतील हा काळ ‘सुवर्णकाल’ म्हणून ओळखला जातो. वडोदरा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत.

Top 35 places to visit in Vadodara District

वडोदरा(बडोदा) जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) Lakshmi Vilas Palace-

 Top 35 places to visit in Vadodara District


लक्ष्मी विलास पॅलेस हा गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील एक आलिशान राजवाडा आहे.हा राजवाडा 1890 साली बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव यांनी 1.8 लाख पाउंड खर्च करून बांधला. याशिवाय त्यांनी अनेक आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मैदाने, कारंजी, रुंद रस्ते तयार करून बडोदा शहर सुशोभित केले. हा राजवाडा 700 एकर परिसरात मध्यभागी असून या राजवाड्याचा आराखडा मेजर माँट या ब्रिटिश इंजिनीअरने केला.

हा राजवाडा 500 फूट लांब व 200 फूट रुंद असून, या राजवाड्यातील संपूर्ण फर्निचर फ्रान्समध्ये तयार केलेले आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे जगभरातील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानांपैकी एक आहे, व या राजवाड्यात सुंदर कलाकृती, मोझाइकचे काम आणि प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची तैलचित्रे आहेत. लक्ष्मीविलास’च्या परिसरात मोतीबाग पॅलेस आणि फतेहसिंग म्युझियम या भव्य इमारती आहेत.

2)Sayaji Baug-


सयाजी बाग हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातीलविश्वामित्री नदीवर बांधलेली सुंदर बाग आहे. ही बाग 113 एकरवर असून 1879 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी बांधली.या बागेला कामती बाग म्हणूनही ओळखले जाते. ही बाग भारतातील सर्वात मोठ्या बागांपैकी एक समृद्ध बाग आहे. व येथे 98 पेक्षा जास्त प्रजातींचे वृक्ष, बडोदा संग्रहालय,चित्र गॅलरी, सरदार पटेल तारांगण आणि सयाजी बाग प्राणीसंग्रहालय आहे.

या बागेला तीन प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेशद्वारावर सयाजी सर्कल येथे एक घोडेस्वार पुतळा उभा आहे जो “काळा घोडा चौक” किंवा “काळा घोडा वर्तुळ” म्हणून ओळखले जाते. तसेच या ठिकाणी अर्जन कोळी आणि हरी कोळी या धारीच्या दोन शूर भावांचे पुतळे आहेत, कारण त्यांनी 1933 मध्ये शिकारीदरम्यान सयाजीराव गायकवाड तिसरे यांचे सिंहापासून प्राण वाचवले होते.

3)Maharaja Sayajirao University-


महाराजा सयाजीराव विद्यापीठ हे गुजरात राज्यातील वडोदरा शहरात पश्चिम भारतातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थांपैकी असलेले एक सार्वजनिक विद्यापीठ आहे.या विद्यापीठाची स्थापना 1881 मध्ये, महाविद्यालय म्हणून झाली आणि 1949 मध्ये त्याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला. हे इंग्रजी माध्यमाचे एक निवासी एकात्मिक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे नाव बडोदा राज्याचे माजी शासक महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे.

हे विद्यापीठ 275 एकर जमिनीवर विस्तारलेले आहे.व त्यामध्ये 6 कॅम्पसमध्ये 89 विभाग आहेत. या विद्यापीठात विविध स्तरांवरचे शिक्षण दिले जाते ज्यात अंडरग्रेजुएट, पोस्टग्रेजुएट आणि डॉक्टरेट स्तरावरील कार्यक्रम समाविष्ट आहेत.हे विद्यापीठ NAAC द्वारे ‘A+’ ग्रेडने मान्यताप्राप्त असून येथे 14 विविध विद्याशाखा, 111 विभाग आणि अनेक शैक्षणिक केंद्रे आहेत.

4)Sursagar Lake-


सुरसागर तलाव हा गुजरात राज्यातील वडोदरा शहराच्या मध्यभागी असलेला एक सुंदर, नयनरम्य व अद्वितीय तलाव आहे. हा तलाव 18 व्या शतकात बांधला असून या तलावात भगवान शिवाची 120 फूट उंचीची मूर्ती स्थापित केली आहे. हा तलाव ‘चंदन तलाव” म्हणूनही ओळखला जातो. या तलावाचे बांधकाम श्री सुरेश्वर देसाई यांनी केले होते,यामुळे त्यांच्या नावावरून याला सुरसागर असे नाव देण्यात आले आहे. तसेच वडोदऱ्याच्या राजांनी वेळोवेळी या तलावाचे नूतनीकरण केले आहे.

या तलावाच्या अद्वितीय वास्तुकलेमध्ये भूमिगत दरवाजे आहेत,जे तलावाचे पाणी जास्त झाल्यानंतर उघडले जातात व ते पाणी विश्वामित्रा नदीत सोडले जाते.सुरसागर तलावाच्या काठावर अक्कलकोट स्वामी महाराज मंदिर, हनुमान मंदिर, सयाजीराव महाराज यांनी स्थापन केलेले म्युझिक कॉलेज आहे. पर्यटकांसाठी येथे मोटार बोटी आणि पॅडल बोटीच्या सुविधा आहेत.

5)EME Temple-


ईएमई (EME) मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील दक्षिणमूर्ती मंदिर म्हणून ओळखले जाणारे मंदिर आहे. 1966 मध्ये हे मंदिर ईएमई स्कूलने बांधले. हे मंदिर भगवान शिवाचे असून ते भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स (EME) कॉर्प्सद्वारे बांधलेले एक अनोखे मंदिर आहे. या मंदिराची रचना एका भूगर्भीय डोमसारखी असून, हे एक आधुनिक वास्तुकलेचे प्रतीक आहे.

भारतीय सशस्त्र दलांच्या प्रत्येक धर्माला सामावून घेण्यासाठी या मंदिरात सर्व धर्मांची पवित्र चिन्हे एकत्रित केली आहेत, जी ‘सर्व धर्म समभाव’ दर्शवितात. हे मंदिर भारतीय सैन्यातील धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असून येथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आणि इतर धर्मांचे लोक एकत्र पूजा करतात. व या मंदिराची वास्तुकला अ‍ॅल्युमिनियम पत्र्यांनी मढवलेली आहे.

Visit our website: allindiajourney.com

6)Aatapi Wonderland-


आतापी वंडरलँड हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील अजवा रोडवर अजवा गार्डनमध्ये असलेले सर्वात मोठे थीम पार्क आहे. हा थीम पार्क 70 एकर परिसरात पसरलेले असून त्यामध्ये 40 पेक्षा जास्त रोमांचक राईड्स, ॲडव्हेंचर राईड्स, वॉटर राईड्स, आणि गो-कार्टिंगचा, रेन डान्स, वॉटर पार्क, आणि लेझर शो आहेत.

याशिवाय या ठिकाणी एक नेत्रदीपक,मंत्रमुग्ध करणारा वॉटर लेसर शो आयोजित केला जातो, जो पाणी, प्रकाश आणि संगीताचा एक अद्भुत अनुभव देतो. तसेच या पार्कमध्ये 5 लाखांपेक्षा जास्त झाडे लावली आहेत. या पार्कमध्ये लग्न कार्यक्रम आणि लहान उत्सव आयोजित करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.

7)Tambekar Wada-


तांबेकर वाडा हा गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील रावपुरा परिसरातील एक ऐतिहासिक तीन-मजली मारवाडी वाडा आहे. हा वाडा 140 वर्षे जुना व 19 व्या शतकातील आहे. तांबेकर वाडा तीन मजली असून पूर्वी बडोदा राज्याचे दिवाण असलेले भाऊ तांबेकर यांचे हे निवासस्थान होते. सध्या हा वाडा जीर्ण झाला असला तरी त्या वेळच्या मराठा स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे.

या वाड्याच्या भिंतींवर रामायण, महाभारत, मराठा आणि ब्रिटिश यांच्यातील लढाईची रंगीत भित्तिचित्रे कोरलेली आहेत. या वाड्यात लाकडी बांधकाम,नाजूक लाकडी नक्षीकाम आणि जाळीचे काम पाहायला मिळते. सध्या हा वाडा आता ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन करण्यात आला आहे.

8)Hathni Mata Waterfalls –


हथनी माता धबधबा हा गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील जम्बोघोडा जवळ असलेला एक दैवी सौंदर्य लाभलेला एक आश्चर्यकारक धबधबा आहे.या धबधब्यांच्या शेजारी एका गुहेत हथनी मातेचे एक मंदिर आहे. या धबधब्याच्या पायथ्याशी हत्तीच्या पिल्लासारखा दिसणारा खडक असल्यामुळे याला ‘हतनी धबधबा’ हे नाव पडले आहे. या धबधब्याजवळचा परिसर घनदाट झाडी आणि हिरवीगार वनराईने नटलेला आहे.वडोदरा शहरापासून हा धबधबा 75 किलोमीटर अंतरावर आहे.

9)Jambughoda Wildlife Sanctuary-


जम्बुघोडा वन्यजीव अभयारण्य हे गुजरात मधील वडोदरा पासून 70 किमी अंतरावर असलेले एक नयनरम्य ठिकाण आहे. हे अभयारण्य 130 चौरस किमी क्षेत्रात विस्तारलेले असून हा भाग घनदाट जंगल,उंच डोंगर आणि खोल दऱ्यानी वेढलेले आहे. तसेच या जंगलात दोन महत्वाचे जलाशय आहेत.आणि येथे अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी व विविध प्रकारचे पक्षी आढळतात.

येथे प्रामुख्याने रानडुक्कर, नीलगाय, कोल्हे, तरस, रानससा,कोल्हे, भेडके, सरपटणारे प्राणी आणि बिबट्या हे प्राणी आढळून येतात. तर येथील जंगलात टेक, मोहवा,साग,सदाड,शिसम,खैर, तेंदू, महुवा, पळस,बोर ही झाडे पाहायला मिळतात.या अभयारण्यात कॅम्पिंगची सोय असल्यामुळे पर्यटक येथे निसर्गाचा आणि ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकतात.

10)Chandod Triveni Sangam-


चांदोड त्रिवेणी संगम हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील डभोई तालुक्यातील एक पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणी नर्मदा, ओरसांग आणि सरस्वती नद्यांचा संगम झालेला आहे. हे ठिकाण हिंदूंसाठी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील परिसरात कपिलेश्वर महादेव, सेशा नारायण मंदिर, पिंगळेश्वर महादेव, काशी विश्वनाथ महादेव अशी मंदिरे आहेत.

हिंदूंसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थस्थानआणि येथे कपिलेश्वर महादेव, शेषशिनारायण मंदिर, पिंगलेश्वर महादेव, कुबेर भण्डारी,पोइचा नीलकंठ धाम आणि काशीविश्वनाथ महादेव मंदिर ही तीर्थक्षेत्रे आहेत.वडोदरा शहरापासून हे ठिकाण 55 किलोमीटर अंतरावर आहे.

11)Kuber Bhandari Temple-


कुबेर भंडारी महादेव मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील कर्नाली गावात, नर्मदा नदीच्या काठावर असलेले प्राचीन व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर स्वतः भगवान शिवाने स्थापन केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात धन-धान्य व संपत्तीची देवता असलेल्या कुबेर देवाची पूजा केली जाते. हे मंदिर 2500 वर्षांपासूनचे प्राचीन असून येथे दर्शन घेतल्यास धन-धान्याची कमतरता राहत नाही, अशी भक्तांची श्रद्धा गाढ आहे.

दिपवाळीत धनतेरस आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भाविक या मंदिरात मोठ्या संख्येने कुबेर देवाची पूजा करतात. वडोदरापासून हे ठिकाण 60 किलोमीटर अंतरावर असून या मंदिरात पोहोचण्यासाठी नर्मदा नदीतून बोटीने प्रवास करावा लागतो.

12)Maharaja Fatesingh Museum-


महाराजा फतेहसिंग संग्रहालय हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील विस्तीर्ण लक्ष्मी विलास पॅलेसच्या आवारात असलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक संग्रहालय आहे. हे संग्रहालय महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1909 मध्ये स्थापन केले होते. या संग्रहालयात विविध प्रकारच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. त्यामध्ये महान इटालियन पुनर्जागरण मास्टर्स यांच्या कलाकृतींच्या उल्लेखनीय प्रती,

तसेच चिनी आणि जपानी पोर्सिलेनच्या मौल्यवान संग्रह, रोकोको चित्रे, पोर्ट्रेट, संगमरवरी अर्धपुतळे आणि राजा रवी वर्मा यांची चित्रे,वेजवुड, डौल्टन, टिफनी, लालिक आणि ऑरेफोर्स काचेच्या वस्तूंचा समावेश आहे. तसेच येथे पहिल्या मजल्यावर, एक सुंदर सजवलेला युरोपियन भव्यतेचा,फ्रेंच रोकोको-शैलीचा कक्ष आहे. आणि येथील बागेत राजपुत्रासाठी पूर्णपणे कार्यरत असलेली एक खेळण्यातील टॉय ट्रेन आहे.

13)Iskcon Temple Vadodara-


इस्कॉन मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील एक शांत आणि सुंदर मंदिर आहे. भगवान कृष्णाचे हे मंदिर आंतरराष्ट्रीय कृष्ण सोसायटीच्या अनेक केंद्रांपैकी एक आहे. या मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर, पारंपारिक, गुंतागुंतीचे कोरीव काम व रचनात्मक पद्धतीची आहे. या मंदिरात वर्षभर विविध प्रकारचे सण आणि उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे जन्माष्टमी, भगवद्गीतेवरील व्याख्याने,आणि भगवान श्रीकृष्णाची जयंतीवेळी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

14)Kirti Mandir-


कीर्ती मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील गायकवाड घराण्याच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेले एक सुंदर आणि ऐतिहासिक स्मारक, शाही समाधीस्थळ आहे. हे स्मारक वडोदरा शहराच्या मध्यावर असून 1936 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या सिल्व्हर जुबिली सोहळ्याच्या वेळी उभारण्यात आल. या इमारतीचा आकार E-आकाराचा असून त्यामध्ये बाल्कनी, टेरेस, समाध्या, घुमट आणि सोने, चांदी व कांस्य यांपासून बनवलेला,नक्षीकाम केलेला 35 मीटर उंच शिखर आहे.

आणि येथील आतील भागात नंदलाल बोस यांची भित्तिचित्रं आहेत, यामध्ये गंगावतरण, मीराबाईचे जीवन, महाभारताची लढाई, नटीर पूजन इ. समावेश आहे. तसेच येथे चित्रकार राजा रवि वर्मा यांची काही दुर्मिळ चित्र पाहायला मिळतात.व गायकवाड कुटुंबाची छायाचित्रे, नाणी, शस्त्रे, आणि इतर अनेक ऐतिहासिक वस्तू ठेवले आहेत.

15)Nazarbaug Palace-


नझरबाग पॅलेस हा गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील गायकवाड घराण्याचा सर्वात जुना भव्य राजवाडा होता. हा राजवाडा शहराच्या मध्यभागी असून 1871 मध्ये मल्हारराव गायकवाड यांनी बांधला होता. हा चार मजली उंच बांधकाम असलेला राजवाडा इटालियन- पुनर्जागरण शैलीत बांधलेला असून येथे एक तळघर आहे.

तसेच या पॅलेसच्या आवारातील सुंदर बागेमुळे या ठिकाणाला नजरबाग पॅलेस असे नाव देण्यात आले. नंतर हा पॅलेस राजघराण्याच्या खजिना ठेवण्यासाठी वापरण्यात आला. या पॅलेसमध्ये शुद्ध सोन्या-चांदीच्या, प्रत्येकीच्या नळीचे वजन शंभर किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या तोफा होत्या. याशिवाय, या परिसरात शीश महाल आहे, जो ‘ग्लास पॅलेस’ म्हणून ओळखला जातो.

16)hazira maqbara-


हजीरा मकबरा हा गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्मारक आहे. हा मकबरा समाधीस्थळ म्हणूनही ओळखला जातो. हा मकबरा 1586 मध्ये कुतुबुद्दीन मुहम्मद खान यांच्या स्मरणार्थ बांधला. कुतुबुद्दीन मुहम्मद खान,हे सम्राट अकबराचा मुलगा सलीमचे शिक्षक होते आणि गुजरातचेही काही काळ राज्यपाल होते. या मकबऱ्याची वास्तुकला इस्लामिक आणि हिंदू शैलींचे मिश्रण आहे.

व त्यामध्ये भव्य कोरीवकाम, प्रभावी जाली काम आणि सुंदर घुमट आहेत. हा मकबरा सर्वात जुना असून एका उंच अष्टकोनी चौथऱ्यावर बांधलेला आहे, आणि त्यावर पाच-कमानी असलेले प्रवेशद्वार व कुराणमधील अरबी मजकूर कोरलेला आहे. या मकबऱ्याभोवती सुंदर बाग आहे, पर्यटक या बागेत शांततेचा अनुभव घेण्यासाठी येतात.

17)Makarpura Palace-


मकरपुरा पॅलेस हा गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील गायकवाड राजघराण्याचा एक ऐतिहासिक महाल आहे. हा राजवाडा 1870 मध्ये महाराजा खंडेराव यांनी इटालियन शैलीत बांधला होता. हा महाल या राज घराण्याचे उन्हाळी निवासस्थान आणि शिकार रिसॉर्ट होते. सध्या हा पॅलेस तो भारतीय हवाई दलाकडून क्रमांक १७ टेट्रा स्कूल नावाचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे तो नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुला नाही. या महालाची रचना इटालियन शैलीत आहे, व त्यामध्ये अनेक कमानी आणि मोठे अंगण आहे.

18)Vadodara Museum and Picture Gallery-


बडोदा (वडोदरा) संग्रहालय आणि चित्र गॅलरी हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील बडोदा (वडोदरा) येथील पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास संग्रहालय आहे. हे संग्रहालय वडोदरा मधील सयाजीगंज येथील कामतीबाग येथे आहे. हे संग्रहालय 113 एकर मध्ये विस्तारलेले असून याची स्थापना 1887 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी केली होती. या इंडो-सारासेनिक वास्तुकला असलेल्या म्युझियममध्ये 1994 च्या भारताच्या टपाल तिकिटातील संग्रहालय,भारतीय ,

आणि युरोपीयन चित्रकला, पुरातत्वीय वस्तू, कांस्य वस्तू आणि पुरातत्वशास्त्रीय वस्तूंचा संग्रह, तसेच जपान, चीन आणि तिबेटमधील कलाकृती येथे पाहायला मिळतात. आणि येथील विशेष आकर्षण म्हणजे येथे इजिप्शियन ममी आणि निळ्या देवमाशाचा सांगाडा आहे. याशिवाय या संग्रहालयात टर्नर आणि कॉन्स्टेबल या ब्रिटिश चित्रकारांची मूळ चित्रे,
आणि एथनोग्राफी (मानववंशशास्त्र) संग्रह आहे.

19)Sri Aurobindo Ashram-


अरबिंदो आश्रम हा गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील दांडिया बाजार या ठिकाणी असलेला लोकप्रिय आश्रम आहे. हा आश्रम अरविंद आश्रम किंवा औरो निवास म्हणूनही ओळखला जातो. या आश्रमात अरबिंदो घोष यांचे 1894 ते 1906 या काळात बडोद्यामध्ये असताना वास्तव्य होते.अरविंद आश्रम हे एक राष्ट्रीय स्मारक असून 23 खोल्या असलेल्या या आश्रमात ग्रंथालय, एक अभ्यासिका, ध्यान हॉल आणि एक विक्री केंद्र आहे. याशिवाय काही दुर्मिळ पुस्तके ही आहेत.

अरबिंदो घोष हे बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे खाजगी सचिव, इंग्रजीचे प्राध्यापक आणि बडोदा कॉलेजचे उपप्राचार्य होते. नंतर ते तत्वज्ञानी, सामाजिक आणि राजकीय विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि श्री अरबिंदो नावाचे योगी म्हणून प्रसिद्ध झाले. या ठिकाणाला लोकमान्य टिळक, बिपिन चंद्र पाल, सिस्टर निवेदिता आणि सखाराम गणेश दुस्कर अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी भेटी दिल्या होत्या.

20)Sardar Patel Planetarium-


सरदार पटेल प्लॅनेटेरिअम हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील विश्वामित्र नदीच्या काठी असलेल्या सयाजीबागेतील एक महत्त्वाचे शैक्षणिक आणि मनोरंजन केंद्र आहे. सरदार पटेल तारामंडळाचे उद्घाटन 1976 मध्ये झाले. या प्लॅनेटेरिअमची इमारत पिरॅमिडच्या आकाराची असून या इमारतीला चार मजले आहेत, व त्यामध्ये एक मुक्तमंच 300 लोकांच्या बसण्याची क्षमता

असलेले (एम्फीथिएटर), तारामंडळ कक्ष, प्रदर्शनी कक्ष आणि वेधशाळा आहे. या ठिकाणी खगोलशास्त्र आणि विज्ञानाशी संबंधित कार्यक्रम केले जातात. व येथे पूर्ण-डोम प्रोजेक्शनद्वारे ग्रह, तारे आणि निहारिकांचे आकर्षक अनुभव,गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये दाखवले जातात.

21)Khanderao Market-


खंडेराव मार्केट हे गुजरात राज्यातील वडोदरा येथील चामराजा रोडवर वसलेली सर्वात जुनी आणि गजबजलेले बाजारपेठ व एक भव्य व्यावसायिक इमारत आहे. ही इमारत महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी 1906-07 मध्ये आपल्या राज्याभिषेकाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नगरपालिकेला भेट म्हणून बांधून दिली.

या दोन मजली इमारतीची वास्तूकला इंडो-सरसेनिक शैलीत केली असून त्याचे बांधकाम विटा व गारा वापरून केले आहे. व या भव्य व्यावसायिक भवनचे नाव महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या नावावर ठेवले आहे. या ठिकाणी महाराजा खंडेराव गायकवाड यांचा उंच पुतळा,स्थानिक हस्तकला, भाजीपाला, फळे आणि पूजा साहित्य यांसाठी एक लोकप्रिय बाजार आहे.

22)Kala Ghoda Circle –


काळा घोडा हे गुजरात राज्यातील वडोदरा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्याअश्वारूढ पुतळ्याचे टोपणनाव आहे. हा पुतळा सयाजी बागेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे हे घोड्यावर स्वार झालेले दाखवले आहेत. हा पुतळा शहरातील सर्वात महत्वाच्या ऐतिहासिक स्मारकांपैकी एक आहे व सयाजीरावांच्या कार्यकिर्दीचे व लोकांच्या भक्तीचे प्रतीक आहे.

हा पुतळा आयताकृती दगडी शिलालेखावर उभारलेला 8 फूट उंच आहे. आणि येथील शिलालेखावर गुजराती, मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती कोरलेली आहे. ‘काळा घोडा’ हे एक शिल्प नसून, महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या कार्यकिर्दीचा गौरव करणारे इतिहासाचे जिवंत स्मारक आहे.

23)Ajwa Water Park-


अजवा वॉटर पार्क हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील पॅलेस रोडवर, निसर्गाच्या सान्निध्यात असलेले एक मनोरंजन पार्क आहे. या ठिकाणी लहान मुले आणि प्रौढांसाठी विविध प्रकारच्या रोमांचक वॉटर राईड्स, वेव्ह पूल, रेन डान्स, केअरबियन पायरोइट्स वॉटर अ‍ॅक्टिव्हिटीज आणि रिलेक्ससाठी रिसॉर्ट आहे. या पार्कमध्ये 60 फूट उंच स्लायडिंग टॉवर आहे,

ज्याला 22 पेक्षा जास्त हाय-टेक स्लाईड्स जोडलेल्या आहेत.तसेच हा पार्क पाच वेगवेगळ्या विभागांमध्ये असून येथे विविध प्रकारच्या राईड्स, पूल आणि पाण्याच्या ऍक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत. आणि येथे दिवसभर पाण्यात मौजमजा करता येते. सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

24)Nyaya Mandir-


न्याय मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील महाराजा सयाजीराव गायकवाड तृतीय यांनी 1896 मध्ये त्यांच्या पत्नी महाराणी चिमनाबाई प्रथम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधलेले मंदिर आहे. या इमारतीची वास्तूकला इंडो-सारसेनिक शैलीत असून त्याची रचना रॉबर्ट चिशोल्म यांनी केली होती. या ठिकाणी महाराणी चिमनाबाई प्रथम यांची एक संगमरवरी मूर्ती आहे. व या इमारतीच्या समोर एक घड्याळ आहे.

सुरुवातीला या इमारतीचा उपयोग भाजी मंडईसाठी करण्याचे ठरले होते, परंतु नंतर ते न्यायालय संकुल झाले. या इमारतीचे आधीचे नाव ‘चिमनाबाई न्याय मंदिर’होते, पण नंतर ते “न्याय मंदिर” म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी या इमारतीचा बांधकाम खर्च 7.44 लाख रुपये एवढा आला होता.

25)Surya Narayan Temple-


सूर्य नारायण मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील खारीवाव जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर असलेले एक दुर्मिळ, ऐतिहासिक मंदिर आहे.हे मंदिर 17 व्या शतकात महाराज गोविंदराव गायकवाड यांनी बांधले. हे मंदिर एका सुंदर बागेत वसलेले असून येथे एक मोठी काळ्या दगडाची हत्तीची मूर्ती आहे.

आणि विशेष म्हणजे या मंदिराची अशी रचना केली आहे, की सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना असलेले हे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. रथसप्तमी आणि मकर संक्रातीच्या या ठिकाणी मोठे उत्सव साजरे केले जातात.

26)Mandvi Gate-


मांडवी गेट हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. व जुन्या राजवाड्याचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार चार मजली घुमटाचे असून मुघल काळात सुलतान मुजफ्फर याने 1511-1526 दरम्यान बांधले होते.कालांतराने हे प्रवेशद्वार जीर्ण झाले होते, तेव्हा 1736 मध्ये मल्हारराव मालोजी यांनी या गेटचे नूतनीकरण केले.

मांडवी गेट हे वडोदरा शहराच्या मध्यभागी असून, चौकातील चार मुख्य रस्त्यांना जोडते. या गेटच्या चार मजली घुमटावर एक घड्याळ बसवलेले आहे. आणि या गेटला चारही बाजूंनी कमानी व तीन प्रवेशद्वारे आहेत. पूर्वी या ठिकाणी व्यापारांची महत्त्वाची बाजारपेठ होती.मांडवी गेट,हे ‘नॉर्थ गेट’ म्हणून ही ओळखले जाते.

27)Gaekwad Baroda Golf Club-


गायकवाड बडोदा गोल्फ क्लब हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील सर्वात जुना, खाजगी आणि एक अद्वितीय गोल्फ क्लब आहे. हा गोल्फ क्लब लक्ष्मी विलास पॅलेसच्या आवारात असून या प्रमुख क्लबची स्थापना बडोद्याच्या पूर्वीच्या राजघराण्याने केली होती. या क्लबचा परिसर नयनरम्य आणि हिरव्यागार विस्तीर्ण परिसर असलेला आहे. तसेच येथे चिंचेच्या आणि कडुलिंबाच्या झाडांमध्ये उडणारे मोर लक्ष वेधून घेतात.

या क्लबची डिझाईन प्रसिद्ध गोल्फर आणि आंतरराष्ट्रीय डिझाइन रणजित नंदा यांनी केली आहे. या क्लबमध्ये गोल्फ व्यतिरिक्त टेनिस, बॅडमिंटन, जलतरण तलाव, चॅम्पियनशिप डिझाइन केलेले दोन टेनिस कोर्ट, इनडोअर बॅडमिंटन कोर्ट या सुविधा आहेत.

28)Narmada Canal-


नर्मदा कालवा हा गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील गुजरातची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणारा महत्वाचा कालवा आहे. हा कालवा भारतातील दुसरा सर्वात लांब कालवा आहे, व या कालव्यातील पाणी सरदार सरोवरातून आणले जाते. या कालव्याची लांबी 532 किलोमीटर (331 मैल) असून गुजरातमध्ये 458किलोमीटर (285 मैल) एवढी आहे.

हा कालवा सिंचनाचा मुख्य स्रोत म्हणूनही ओळखला जातो. या कालव्याचा परिसर निसर्गरम्य असून कालव्याच्या काठावर अनेक इको-कॅम्प आहेत. येथून तुम्ही भारताचा एक महाकाय पुतळा विशाल स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहू शकता. तसेच मत्स्यशेतीसाठी हा कालवा एक महत्त्वाचे ठिकाण आहे व ते समृद्ध मत्स्यजीवनाचे घर आहे.

29)Nandalay Temple-


नंदालय मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील हरिनगर गोत्री जवळील भगवान कृष्णाचे मंदिर पवित्र तीर्थस्थळ आहे. हे मंदिर गजबजलेल्या परिसराच्या मध्यभागी असून येथे प्रार्थना आणि भजनांसाठी मोठा सभामंडप आहे. येथील मंदिर परिसर सुंदर, शांत व आध्यात्मिक वातावरनाणे बहरलेला आहे. त्यामुळे भक्तांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे. तसेच या मंदिराचे वास्तुकला अत्यंत सुंदर व नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे.
भक्तांसाठी येथे राजभोग प्रसादी आणि महाप्रसाद देण्याची सोय आहे.

30)Ajwa Nimeta Dam Garden-


अजवा-निमेता धरण उद्यान हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे .आजवा धरण हे सयाजी सरोवर धरणामुळे तयार झालेला एक जलाशय आहे. हे विश्वमित्री नदीशी जोडलेले मातीचे धरण असून ते 20 व्या शतकाच्या सुरुवातीला वडोदराचे शासक महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी बांधले होते.या धरणाच्या शेजारी प्रसिद्ध अजवा बागा आहे, जी वृंदावन गार्डन म्हणूनही ओळखली जाते.

तसेच या ठिकाणी हिरव्यागार निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेले निमेता वन्यजीव अभयारण्य आहे. आणि या अभयारण्यात वाघ, बिबटे आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींसह विविध वन्यजीव प्राणी आढळतात. व येथील जलाशयामध्ये सुमारे 340 मगरी आहेत. पर्यटकांसाठी व निसर्गप्रेमी साठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

31)Tapovan Temple-


तपोवन मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील पेट्रोकेमिकल टाउनशिपमध्ये असलेले भगवान शिव आणि हिंदू देवतांच्या इतर देवतांना समर्पित मंदिर आहे. येथील मंदिर परिसर अत्यंत निसर्गरम्य व विशाल आहे. त्या मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर नक्षीकाम व कोरीव काम केलेले असून येथील मंदिराचे रंगीबेरंगी छत पारंपरिक व आधुनिक वास्तुकलेचे अनोखे मिश्रण आहे.

या मंदिरात ध्यान कक्ष, गौशाळा आणि सुंदर बाग आहेत. तसेच येथे देवी दुर्गा, तिरुपती बालाजी, लक्ष्मी-नारायण, नऊ ग्रह आणि सत्यनारायण यांसारख्या अनेक देवतांची मंदिरे आहेत.

32)Sevasi Vav-


सेवासी वाव (सेवसी व्हिद्याधर वाव)ही गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील सिंधरोठ किंवा न्यू अलकापुरीपासून सुमारे 8 किमी अंतरावर,
एक ऐतिहासिक पायऱ्या असलेले विहीर (स्टेपवेल) आहे. ही विहीर 500 वर्ष जुनी असून आख्यायीकानुसार ही वाव 1543 साली राजा हरिदास यांनी आध्यात्मिक नेते श्री विद्याधर यांच्या स्मरणार्थ बांधली आहे.

ही वाव सेवसी गावात असल्यामुळे ती ‘सेवसी वाव’ या नावाने ओळखले जाते. आख्यायिकेनुसार पौर्णिमेच्या रात्री येथे समृद्धीसाठी सोने-नैसर्गिक सजवलेल्या तरुणींचा बळी दिला जात असे, पण ही आख्यायिका खरे असेल असे सांगता येत नाही. या विहिरीत अनेक पायऱ्या, मंच , स्तंभ-मंडप आणि कोरीव नक्षीकाम केलेले आहे.

33)Nareshwar Dham-


नरेश्वर धाम हे गुजरात मधील वडोदऱ्यापासून सुमारे 55 किमी अंतरावर असलेले धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर अत्यंत सुंदर असून येथे अनेक तलाव आहेत. हे ठिकाण श्री रंग अवधूतांनी स्थापन केलेल्या आश्रमामुळे प्रसिद्ध आहे. श्री रंग अवधूत हे विद्वान, शिक्षक व समाजसेवक होते. त्यांनी 1925 मध्ये सांसारिक संपत्तीचा त्याग करून लोकांना अध्यात्माबद्दल उपदेश दिला.

व आयुर्वेद औषधोपचार आणि शस्त्रक्रिया शिबिरांद्वारे सामान्य जनतेची सेवा केली.त्यांनी गुजराती, हिंदी, संस्कृत व इंग्रजी भाषांमध्ये अनेक ग्रंथ लिहिले आहेत. येथील आश्रमात त्यांच्या वैयक्तिक वस्तू टेबल, खुर्ची, खाट जतन करून ठेवलेल्या आहेत.

34)BAPS Shri Swaminarayan Mandir-


बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील अटलादरा भागात एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या भव्य मंदिराची अप्रतिम वास्तुकला, सुंदर रचना, असून हे मंदिर आध्यात्मिक कार्यांसाठी ओळखले जाते. या मंदिरात स्वामीनारायण आणि गुणतीततानंद स्वामींच्या मूर्ती आहेत.

या मंदिराचे उद्घाटन इ.स. 1945 मध्ये शास्त्रीजी महाराज (भगवान स्वामिनारायणांचे तिसरे आध्यात्मिक उत्तराधिकारी) यांच्या हस्ते झाले. वडोदरा मधील हे मंदिर लोकप्रिय स्थळांपैकी एक आहे.

35)Alkapuri Haveli-


अलकापुरी हवेली ही गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व धार्मिक स्थळ हवेली मंदिर आहे. हे ठिकाण श्री भगवान कृष्णाचे स्वरूप मानले जाते. हे मंदिर विशाल आणि सुंदर सजावटीने नटलेले आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला दागिने, हार आणि विविध अलंकारांनी सुंदररीत्या सजवलेले असते. हे स्थळ भूतकाळातील जीवनशैली आणि परंपरांचा झलक दाखवते, त्यामुळे पर्यटकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे.

visit the travel blog

1)ईएमई मंदिर कुठे आहे आणि ते कशासाठी आहे?

ईएमई मंदिर, मंदिर, हे गुजरातमधील वडोदरा येथील भगवान शिवाचे दक्षिणामूर्ती मंदिर आहे.


2) गुजरात मधील सेवासी वाव ही कोणत्या ठिकाणी आहे ?

गुजरात मधील सेवासी वाव ही वडोदरा जिल्ह्यातील सिंधरोठ या ठिकाणी आहे .


3) गुजरात मधील नर्मदा कालव्याची लांबी किती किलोमीटर आहे ?

गुजरात मधील नर्मदा कालव्याची लांबी 532 किलोमीटर (331 मैल) किलोमीटर आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top