छोटा उदयपूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे- 16 places to visit in Chhota Udaipur District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आम्ही भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती देत आहोत, आता आपण गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहणार आहोत.छोटा उदेपुर जिल्हा हा एका मोठ्या तलावाच्या काठावर वसलेला असून नर्मदा आणि तापी जिल्ह्यांनंतर तिसरा आदिवासी बहुल जिल्हा आहे. हा जिल्हा 26 जानेवारी 2013 रोजी वडोदरा जिल्ह्यातून विभाजित केला आहे. गुजरात राज्यातील हा 28 वा जिल्हा असून याचे मुख्यालय छोटा उदेपुर शहरात आहे. 16 places to visit in Chhota Udaipur District

हा एक छोटा जिल्हा असून सहा तालुक्यात विभागलेला आहे. या जिल्ह्याला समृद्ध इतिहास आणि संस्कृती असून या जिल्ह्याला 75704 हेक्टर वनक्षेत्र लाभलेले आहे. या जिल्ह्यात अनेक मंदिरे आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक वास्तू आहेत. तसेच हा जिल्हा रथवा घरांच्या भिंतींवर आतील आणि बाहेरून केलेल्या असामान्य रंगकामासाठी प्रसिद्ध आहेत. हा जिल्हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असून येथे मोठ्या प्रमाणात डोलोमाइट, फ्लोराईट, ग्रॅनाइट आणि वाळू साठे असून त्यांचे उत्खनन केले जाते.

तसेच या जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. येथे राहणारे राठवा आदिवासी पिठोरा भित्तीचित्रे तयार करण्यासाठी व त्यांच्या घरांच्या भिंतींवर गुंतागुंतीचे दृश्ये चित्रित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. येथील आदिवासी बाजार पिठोडा चित्रे आणि टेराकोटा घोडे बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांसाठी एक कलाकेंद्र आहे. या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक,सांस्कृतिक व सामाजिक पर्यटन स्थळे व जैन मंदिरे आहेत.

16 places to visit in Chhota Udaipur District


छोटा उदयपूर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) Kusum vilas palace-

16 places to visit in Chhota Udaipur District


कुसुम विलास पॅलेस हा गुजरात मधील छोटा उदयपूर येथे असलेला एक ऐतिहासिक राजवाडा आहे. हा पॅलेस 1920 च्या दशकात प्रसिद्ध वास्तुशिल्प कंपनी, भाटकर आणि भाटकर यांनी बांधला होता. कुसुम विलास पॅलेस हे राजेशाही महारावळांच्या कुटुंबांसाठी निवासस्थान होते. सध्या, हा राजवाडा एका इकॉनॉमी हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित केला आहे.

हा पॅलेस 40 एकर परिसरातील मध्यावर असून याची संकल्पना चंपानेरच्या स्थापत्य रचनेच्या कल्पनेतून प्रेरित झाली आहे.या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर एक प्रचंड लोखंडी दगड आहे. व राजवाड्याच्या बांधकामात लिफ्ट आणि आधुनिक सुविधा आहेत.हा शाही राजवाडा वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना असून हे एक अद्वितीय ऐतिहासिक वारसा स्थळ आहे.

2)Kali Niketan-


काली निकेतन हे गुजरात राज्यातील छोटा उदयपूर जिल्ह्यातील एक सुंदर, मनमोहक राजवाडा आहे. पूर्वी हा राजवाडा ‘नहार विला’ म्हणून ओळखला जात होता परंतु नंतर देवी महाकालीच्या सन्मानार्थ याचं नाव बदलून ‘काली निकेतन’ असे करण्यात आले, काली-निकेतन म्हणजे देवी कालीचे निवासस्थान. छोटा-उदेपूरच्या शासकांना कला आणि वास्तुकलेची खूप आवड होती.

त्यामुळे त्यांनी या अनेक सुंदर राजवाड्यांची निर्मिती केली.महाराज फतेहसिंहजी यांनी 19 व्या शतकात आपल्या उन्हाळी निवासासाठी हा महल बांधला होता.या इमारतीमध्ये 6 वातानुकूलित खोल्या, 2 ड्रॉइंग रूम, 2 डायनिंग रूम, 2 लॉन्ज आणि 5 टेरेस आहेत. छोटा उदयपूर मधील हा राजवाडा उत्कृष्ट वास्तुकला असलेला एक ऐतिहासिक आणि सुंदर महल आहे.

3)Chhota Udepur Museum-


छोटा उदयपूर संग्रहालय हे गुजरात राज्यातील छोटा उदयपूर जिल्ह्यातील मुख्य गावात असलेले एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी आदिवासी लोकांचे रंगीबेरंगी जीवन,त्यांच्या कौटुंबिक जीवनशैली, दैनंदिन दिनचर्या, कला प्रकार, संस्कृती,चित्रे इत्यादींचे अत्यंत सविस्तरपणे प्रदर्शित केले आहे. हे संग्रहालय पर्यटकांसाठी सोमवार ते शनिवारपर्यंत खुले असते.

4)BAPS Swaminarayan temple-


BAPS स्वामीनारायण मंदिर हे गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी विशाल परिसरात वसलेले श्री स्वामीनारायणचे सुंदर व अप्रतिम कलाकृती असलेले मंदिर आहे. या स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवरील कलाकृती, मंदिराची वास्तुकला तसेच लाकूड आणि दगडावरील नाजूक नक्षीकाम यामुळे जगभरातील भाविक या मंदिराला भेट देतात. हे एक नवनिर्मित मंदिर असून याचे नुकतेच उद्घाटन झाले आहे.

Visit our website: allindiajourney.com

5)Hafeshwar | Mahadev Temple-


हाफेश्वर महादेव मंदिर हे गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील कवंत तालुक्यात असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हाफेश्वर गाव हे नर्मदा नदीच्या काठी असलेल्या प्राचीन शिव मंदिरासाठी ओळखले जाते. हे मंदिर सरदार सरोवर धरणाच्या जलाशयाच्या भागात असल्यामुळे वर्षातील बराच काळ पाण्याखाली बुडलेले असते त्यावेळी फक्त मंदिराचा ध्वज दिसतो.

आणि विशेष म्हणजे हापेश्वर या गावाला अलीकडेच केंद्रीय पर्यटन विभागामार्फत ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या गावाची ओळख जगभरातील पर्यटकांसाठी अधिक वाढली आहे.हाफेश्वर महादेव मंदिर हे छोटा उदयपूर शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे.

6)Tribal Art and Culture-


आदिवासी कला आणि संस्कृती ही गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील संस्कृती पिथोरा चित्रकला, पारंपरिक लोककला आणि निसर्गाशी असलेल्या निकट संबंधांमुळे ओळखली जाते. या जिल्ह्यात राठवा आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो, आणि हे आदिवासी लोक बाबा देव आणि ‘पिठोरो बाबा’ यांना आपले परम दैवत मानून त्यांची पूजा करतात व त्यांच्या धार्मिक विधींसाठी बाधा व भुवांवर विश्वास ठेवतात.

व धार्मिक विधींद्वारे त्यांना दूर करतात. तसेच हे आदिवासी लोक गुजराती – रथवी नावाची वेगळी बोली भाषा बोलतात. या जमातींमध्ये पिथोरा चित्रकला खूप प्रसिद्ध असून पिठोरो बाबांच्या पूजनासाठी ही कला अत्यंत महत्त्वाची आहे.

7)Sukhi River Dam-


सुखी नदी धरण हे गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यात नर्मदा नदीची उपनदी असलेल्या सुखी नदीवर बांधलेले महत्वाचे धरण आहे. हे धरण 1978 ते 1987 मध्ये बांधण्यात आले असून,हे धरण दगडी स्पिलवे विभाग असलेले माती भरण्याचे प्रकार आहे. या धरणामुळे 31,532 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या धरणाचे पाणी सुमारे 350 किलोमीटर कालव्यांद्वारे वापरले जाते. हा धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य व मंत्रमुग्ध करणारा आहे.

8)Pithora Art/painting-


पिठोरा चित्रकला ही गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यात राठवा भिलाल, नायक आणि ताडी या आदिवासी जमातीची देदीप्यमान लोककला आहे.
या आदिवासी जमातीतील लोक त्यांच्या निवासस्थानांच्या भिंतींवर अन्नधान्याचे देव पिठोरा यांना अर्पण म्हणून व धार्मिक विधीमध्ये लग्न, किंवा उत्सव यासारख्या प्रसंगापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी ही चित्रे काढली जातात. ही चित्रे भिंतींवर नैसर्गिक रंगांचा वापर करून काढली जातात.

व या चित्रांमध्ये शांती, समृद्धी आणि आनंद मिळतो असे येथील आदिवासी लोक मानतात. या चित्रांमध्ये भौमितिक आकार, पक्षी,प्राणी, वनस्पती व जीवसृष्टीचे चित्रण आढळते. तसेच हे आदिवासी लोक ही चित्र काढताना बांबूच्या काठ्या, कापूस आणि लाकडी स्टेन्सिल यांचे मिश्रण वापरतात.

9)Kevdi ecotourism-


केवडी इको टुरिझम हे गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यात जांबुघोडा अभयारण्य आणि रतनमहल अभयारण्याला जोडणाऱ्या मार्गावर वसलेले एक सर्वांगीण सुसज्ज वन-पर्यटन स्थळ आहे. हे अत्यंत रमणीय व निसर्गरम्य ठिकाण नदीच्या काठावर असून वन विभागाच्या अंतर्गत आहे, व कंजेटा इको कॅम्पसाइटपासून 14 किमी अंतरावर आहे. केवडी हे ठिकाण समृद्ध जंगले आणि जैवविविधतेसाठी ओळखले जाते.

या ठिकाणी अस्वल, बिबट्या, लांडगा आणि विशेष म्हणजे मोठ्या आकाराच्या उडणारी खारूताई यांसारखे प्राणी नेहमीच दिसतात. पर्यटकांसाठी येथे तंबू, बांबू कॉटेज आणि एसी डिलक्स खोल्यांशिवाय खुले ॲम्फीथिएटर, स्वयंपाकघर उपलब्ध आहेत.

10)Adivasi Academy Campus-


आदिवासी अकादमी कॅम्पस हे गुजरात राज्यातील छोटा उदयपूर जिल्ह्यातील तेजगढ या ठिकाणी आदिवासी गाव आहे. कोरज टेकडीच्या पायथ्याशी असलेली ही भव्य अकॅडमी 10 एकर वर विस्तारलेली आहे. हा परिसर निर्जन व खडकाळ असून या ठिकाणी 10,000 वर्षापूर्वीच्या काळातील प्रागैतिहासिक खडक चित्रे आहेत, त्यामुळे हे ठिकाण पुरातत्वीय वारसा स्थळ समजले जाते.

या अकॅडमीची वास्तूरचना ही प्रसिद्ध वास्तुविशारद करण ग्रोव्हर यांनी केली आहे. येथील इमारती विटांनी बनवलेल्या जाळीने बनवल्या आहेत, व त्यामध्ये वास्तुकला संग्रहालय आणि ग्रंथालयाचे व परिसरात आढळणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंचे मिश्रण आहे. तसेच येथील इमारतीचे बांधकाम अत्यंत गुंतागुंतीचे व साधेपणाचे वैभव असलेले आहे.

11)Mahasweta Devi Memorial-


महाश्वेता देवी स्मारक हे गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील आदिवासी अकादमी तेजगढ या ठिकाणी आहे. महाश्वेता देवीच्या 2017 मध्ये हे स्मारक बांधण्यात आले.महाश्वेता देवी या एक राजकीय कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांनी भारतातील पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी काम केले.

तसेच त्यांनी 1998 मध्ये गणेश देवींसोबत मिळून तेजगढमध्ये आदिवासी समुदायासाठी बुधन लायब्ररीची स्थापना केली.महाश्वेता देवींनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भारतातील आदिवासी समुदायांच्या हक्कांसाठी घालवले. त्यांनी अनेक साहित्य लिहिली त्यामध्ये हजर चुराशीर माँ’, ‘रुदाली’ आणि ‘अरण्यार अधिकार’ हे उल्लेखनीय आहेत. भारत सरकारने त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

12)Makhaniya Parvat-


मखनिया पर्वत हा गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील सुखी धरणाच्या जवळ वसलेले एक सुंदर, अप्रतिम, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हा पर्वत सुखी धरणाजवळ असून वडोदरा पासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. या पर्वतावर अत्यंत मोठमोठे विशाल दगड आहेत, त्यामुळे हा पर्वत मक्खन ( लोणी)सारखा भासतो. हे ठिकाण लोकांपासून अजूनही अज्ञात आहे.

हा रॉकयुक्त पर्वत 400 मीटर उंचीवर असून मोठ्या दगडांचा भाग आहे, त्यामध्ये हिरवळ व वनस्पती कमी प्रमाणात आहेत. येथील परिसर अत्यंत शांत व रमणीय आहे. व या पर्वतावरील दगड गुळगुळीत असल्यामुळे ट्रेकिंग साठी हे ठिकाण थोडे अवघड आहे.

13)Mohan Vav /Stepwells,Vajepur Kawant-


मोहन वाव ही गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील कवंत तालुक्यात वाजेपूर या ठिकाणी असलेली एक ऐतिहासिक विहीर आहे. ही विहीर सात मजली असून वास्तूकलेचा एक अद्भुत नमुनाच आहे. या वावपासून दोन किलोमीटर अंतरावर अजून एक वाव आहे, असे सांगितले जाते की या वावमध्ये लाकडाची काठी टाकली तर दोन किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून बाहेर येते. ही रहस्यमय अद्भुत वाव पाहिल्यानंतर त्या काळातील वास्तू रचनेची प्रचिती येते.

14)Zand Hanuman Temple-


झंड हनुमान मंदिर हे गुजरात मधील पावागड डोंगराजवळील जांबुघोडा या निसर्गरम्य वनामध्ये वसलेले पवित्र हनुमान मंदिर आहे. या मंदिरात डोंगरातील दगडापासून घडवलेली भगवान हनुमानाची 18 फूट उंच प्रभावशाली, मनमोहून टाकणारी मूर्ती आहे. हे प्राचीन मंदिर महाभारत काळात वनवासादरम्यान पांडवांनी बांधले होते. या मंदिराचा इतिहास पांडवांच्या कथेंशी संबंधित आहे.

आणि विशेष आकर्षण म्हणजे या ठिकाणी भीमची आटा चक्की आहे. तसेच येथील मंदिराभोवती पडलेले दगड स्थानिक लोक गावात घरे बांधण्यासाठी करतात, कारण हे दगड घरात शांती आणि समृद्धी आणतात. असा त्यांचा विश्वास आहे.

15) Nakhal Waterfall –


नाखल धबधबा हा गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील कवंत येथे असलेला एक निसर्गरम्य, सुंदर धबधबा आहे. हा धबधबा हाफेश्वर महादेव मंदिराच्या जवळ असून जंगल परिसरात आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्याने जावे लागते. येथील परिसर निसर्गरम्य व रमणीय आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेट देतात.

16)Turkheda Hill-


तुरखेडा हिल हे गुजरात मधील छोटा उदयपूर जिल्ह्यातील कवंत जवळील निसर्गरम्य, सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी गर्द झाडीने व हिरवाईने नटलेले डोंगर, दऱ्या, विविध प्रकारचे पक्षी आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे. येथून डोंगरातून वळणाने वाहणारी नर्मदा नदी, व या परिसरात असलेले अनेक धबधबे त्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.तुरखेडा हिल हे छोटा उदयपूर जिल्ह्यातील एक स्वर्गच आहे.

Visit the travel blog

1) गुजरात मधील हाफेश्वर महादेव मंदिर कोणत्या तालुक्यात आहे ?

गुजरात मधील हाफेश्वर महादेव मंदिर छोटा उदयपूर जिल्ह्यातील कवंत तालुक्यातआहे.


2)गुजरात मधील मोहन वाव कोणत्या ठिकाणी आहे?

गुजरात मधील मोहन वाव कवंत तालुक्यात वाजेपूर या ठिकाणी आहे.


3)छोटा उदयपूर जिल्ह्यातील मखनिया पर्वत कोणत्या ठिकाणी आहे

छोटा उदयपूर जिल्ह्यातील मखनिया पर्वत सुखी धरणाच्या जवळ आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top