मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहत आहोत, आता आपण पाहणार आहोत गुजरात राज्यातील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे,देवभूमी द्वारका जिल्हा हा गुजरात राज्यातील कच्छच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेला एक धार्मिक व समृद्ध जिल्हा आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय जामखांभलिया शहरात असून हा जिल्हा 15 ऑगस्ट 2013 रोजी जामनगर जिल्ह्यातून निर्माण करण्यात आला. द्वारका शहर हे गुजरात मधील सौराष्ट्र प्रदेशात एक महान ऐतिहासिक वारसा असलेले,पवित्र नगरी व महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. द्वारका नगरी, ही भगवान श्रीकृष्णांनी मथुरा सोडल्यानंतर वसवली होती, ही नगरी सुंदर वास्तूकला असलेली एक समृद्ध आणि अद्भुत नगरी होती. Top 25 places to visit in Dwarka DIstrict
आणि भगवान श्रीकृष्णांची निवासस्थान होती. पौराणिक कथांनुसार द्वारका नगरी ही समुद्रात बुडाली होती आणि आजही तिचे अवशेष समुद्राखाली आढळतात.ही नगरी भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाने विश्वकर्म्याने बांधली होती असे सांगितले जाते. द्वारका नगरी ही हिंदू धर्मातील प्रमुख चारधाम पैकी एक पवित्र धाम असून सात पवित्र पुर्यांपैकी एक मानली जाते. हिंदूंसाठी हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे आहे. देवभूमी द्वारका हे नाव पवित्र धाम द्वारकाधीश मंदिरावरून देण्यात आले आहे. हा जिल्हा अरबी समुद्र, व इतर बाजूंना जामनगर व पोरबंदर जिल्ह्यांनी वेढलेला आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने गुजराती, हिंदी, इंग्रजी भाषा बोलल्या जातात.
या जिल्ह्यात भानवड, द्वारका, कल्याणपूर व जामखंभलिया हे चार तालुके आहेत, व तूप आणि गोमती या प्रमुख नद्या वाहतात. तसेच या जिल्ह्यात वेराडी, तूप, सानी, सिंहन वरतु ही धरणे आहेत. शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यात लसूण, भुईमूग, तीळ,जिरे, धणे, कापूस, हरभरा, गहू ही पिके घेतली जातात. या जिल्ह्यात बॉक्साइट, चुनखडी ही खनिजे सापडतात.व या जिल्ह्यात तेल शुद्धीकरण कारखाना, मीठ उत्पादन, वॉशिंग सोडा आणि बेकिंग सोडाचे उत्पादन,शेती, बंधिनी कापडांवर छापलेली लोककला, हस्तकला वस्तू, खाणकाम, पर्यटन हे उद्योगधंदे आहेत. या देवभूमी मध्ये अनेक नैसर्गिक, धार्मिक,सांस्कृतिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 25 places to visit in Dwarka DIstrict
देवभूमी द्वारका जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Shree Dwarkadhish Temple-


द्वारकाधीश मंदिर हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात, गोमती नदी किनाऱ्यावर वसलेले भगवान श्रीकृष्णांचे अत्यंत पवित्र मंदिर असून, हे मंदिर द्वारकाधीश मंदिर, त्रिलोकसुंदर मंदिर आणि जगत मंदिर म्हणून ओळखले जाते. तसेच भगवान कृष्णाचे हे मंदिर भारतातील चार पवित्र हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर 2500 वर्षापूर्वी चुनखडीच्या दगडांनी बांधलेले असून, या मंदिरात गर्भगृह, अंतराळ व आयताकृती सभामंडप आहे. व या मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत, एक म्हणजे यात्रेकरू आत प्रवेश करतात ते स्वर्गद्वार आणि दुसरे जिथून यात्रेकरू बाहेर पडतात ते मोक्षद्वार होय.
हे भव्य मंदिर अरबी समुद्रातुन प्रकट झाल्यासारखे दिसते. या मंदिराच्या 43 मिटर उंच शिखरावर 52 गज कापडाचा विशाल ध्वज फडकवला जातो, आणि हा ध्वज 10 किलोमीटर अंतरावरूनही दिसतो. आणि विशेष म्हणजे हा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो, असे सांगितले जाते. तसेच या मंदिराच्या मागील बाजूस गोमती नदीकाठी जाणाऱ्या 56 पायऱ्यांचा जिना आहे. या मंदिराला जगभरातून पर्यटक भेट देतात.
2)Nageshwar Jyotirlinga-

नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील,इमारत शहरापासून जवळ असलेले,व 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले स्वयंभू शिवमंदिर आहे.या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की दारुक नावाच्या राक्षसाने शिवभक्ताला कैद केले होते. भक्तांनी केलेल्या ‘ओम नमः शिवाय’ या जपामुळे भगवान शिव येथे आले आणि त्यांनी त्या राक्षसाचा पराभव केला.
व या ठिकाणी एक स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले, त्याची पूजा आजपर्यंत चालू आहे. तसेच या मंदिराच्या आवारात भगवान शिवाची 80 फूट उंच मूर्ती आहे. वर्षभर या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.द्वारकेपासून हे मंदिर 17 किलोमीटर अंतरावर आहे.
3)Rukmini Devi Temple-


रुक्मिणी देवी मंदिर हे गुजरात मधील देवभूमी द्वारका शहराच्या मध्यभागी 2500 वर्षे जुने असलेले प्राचीन व धार्मिक तीर्थस्थळ आहे.हे मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रिय पत्नी रुक्मिणी यांच्या दैवी प्रेमाचे प्रतीक आहे. या मंदिराची वास्तुकला ही अत्यंत सुंदर व नयनरम्य आहे. व मंदिराच्या भिंतींवर विविध देवी-देवतांच्या उत्कृष्ट नक्षीकाम केलेल्या प्रतिमा आहेत.
आणि या मंदिरात सोन्याचे दागिने आणि सुंदर कपड्यांनी सजलेली रुक्मिणी देवीची तेजस्वी मूर्ती आहे. याशिवाय या मंदिरातील भिंतींवरील सुंदर, नयनरम्य चित्रे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या मोहक प्रेमकथा सांगतात. रुक्मिणी देवी ही भगवान कृष्णाची पत्नी आणि देवी लक्ष्मीचे रूप आहे. द्वारकाधीश मंदिरापासून हे मंदिर दोन किलोमीटर अंतरावर आहे.
4)Gomti Ghat Dwarka-

गोमती घाट हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असणारे एक पवित्र धार्मिक तीर्थस्थळ आहे.
हा घाट प्राचीन द्वारका नगरीचा एक भाग आणि भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे व हिंदू धर्माच्या 4 प्रमुख चारधामपैकी एक आहे. या घाटावर स्नान केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हा घाट भाविकांना, शुद्ध करणारे तीर्थस्थळ मानले जाते.
गोमती घाटाच्या आजूबाजूचा परिसरात भगवान राम, भगवान कृष्ण, आणि सुदामा यांची लहान मंदिरे आहेत. आणि रुक्मिणी देवी मंदिर व द्वारकाधीश मंदिर, द्वारका बेट आहे.गोमती घाट एक शांत, पवित्र आणि आध्यात्मिक ठिकाण आहे. व हा घाट हा द्वारकाधीश मंदिरापासून जवळ आहे.
Visit our website: allindiajourney.com
5)Beyt Dwarka-


बेट द्वारका हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील मोहक बेट व महत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे.हे बेट द्वारका समुद्राने वेढलेले असून येथे बोटीने प्रवास करून जावे लागते. महाभारत युद्धादरम्यान भगवान श्रीकृष्णाने याच ठिकाणावरून शंख फुंकला होता, त्यामुळे हे बेट शंखोधर म्हणूनही ओळखले जाते. महाभारतात या बेट द्वारकेला ‘अंतर्द्वीप’ म्हटले जात होते. हे बेट भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेतील राज्यकाळात त्यांचे निवासस्थान होते आणि त्यांचे मित्र सुदामाकडून त्यांना विशेष भेट मिळाले होते असे मानले जाते.
तसेच या बेट द्वारकाला भेट द्वारका असेही म्हणतात. कारण येथे कृष्णा आणि सुदामा यांच्या भेटीची आठवण म्हणून, भक्तांमध्ये तांदूळ दान करण्याची परंपरा आहे. या ठिकाणी श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे व अनेक प्राचीन मंदिरे आहेत. बेट द्वारका हे एक महत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे.द्वारका शहरापासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.
6)Geeta Temple-

गीता मंदिर हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील अध्यात्मिक महत्त्व असलेले भगवान श्रीकृष्णाचे धार्मिक मंदिर आहे.या मंदिराचे नाव भगवतगीता या पवित्र ग्रंथावरून ठेवण्यात आले असून येथील वातावरण अध्यात्मिक व सुंदर आहे.या मंदिरात भगवान कृष्णाची मूर्ती असून येथील भिंतींवर संपूर्ण भगवतगीतेचे श्लोक लिहिलेले आहेत, त्यामुळे हे एक अद्वितीय ठिकाण आहे. गीता मंदिर हे द्वारका तीर्थक्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग असून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.
7)Dwarka Lighthouse-

द्वारका दीपगृह हे गुजरात मध्ये देवभूमी द्वारका जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाण आहे. अरबी समुद्राजवळ असलेल्या या ठिकाणी 43 मीटर उंच व भव्य द्वारका दीपगृह आहे.या द्वारका दीपगृहाचा दीपस्तंभ १९६० ते १९६२ दरम्यान बसवण्यात आला.येथून सूर्यास्ताचे उत्तम दृश्य अनुभवता येते. तसेच संध्याकाळच्या वेळी या दीपगृहातून शक्तिशाली, सुंदर दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळतो.या दीपगृहामुळे समुद्रातून येणाऱ्या जहाजांना आणि बोटींना सुरक्षितपणे मार्ग सापडतो. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण शांततापूर्ण असून पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.द्वारका शहरापासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.
8)Bhadkeshwar Mahadev Temple-

भडकेश्वर महादेव मंदिर हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात असलेले स्वयंभू शिवमंदिर आहे.अरबी समुद्राच्या काठावरील टेकडीवर असलेल्या मंदिरात 5000 वर्षांपूर्वी समुद्रातून स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले, तेच शिवलिंग आज श्री भडकेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते.दरवर्षी जून-जुलै महिन्यात समुद्र स्वतः या शिवलिंगाला अभिषेक करतो.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भरतीच्या वेळी हे मंदिर पाण्याखाली जाते.महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या मंदिरात किनाऱ्यापासून टेकडीकडे जाण्यासाठी उत्तम रस्ता आणि थेट मंदिरापर्यंत नेणाऱ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. व येथील मंदिर परिसर निसर्गरम्य व सुंदर असल्यामुळे पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
9) Shree Swaminarayan Temple-

श्री स्वामीनारायण मंदिर,हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या अवतारापैकी एक असून द्वारका समुद्रकिनाऱ्याजवळ आणि प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराच्या जवळ आहे. हे मंदिर शांत परिसरात एका विस्तीर्ण जागेवर बांधले असून मंदिराभोवती सुंदर बाग आहे. ह्या मंदिराच्या वास्तू कलेमध्ये विविध देव-देवतांच्या गुंतागुंतीच्या रचना आणि अद्भुत शिल्पे आहेत.
तसेच येथील उत्कृष्ट कलाकृती व या मंदिराची स्थापत्यकला अद्भुत आहे. हे मंदिर अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) या आध्यात्मिक संस्थेने बांधले आहे. व या संस्थेची देशात आणि देशाबाहेर ही मंदिरे आहेत. या मंदिरात दररोज असंख्य भाविक दर्शनासाठी येतात.
10)Gopi Talav-

गोपी तालाब हा गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील द्वारकेजवळील एक पवित्र,पावन तीर्थक्षेत्र आहे.असे सांगितले जाते की, जेव्हा भगवान कृष्णाने देहत्याग केला, तेव्हा 16000 राण्यांसह श्रीकृष्णाच्या सर्व गोपिकांनी या तलावात जलसमाधी घेतली होती. तसेच या तलावातील माती ‘गोपी चंदन’ म्हणून ओळखली जाते, भक्त ही माती कपाळावर लावतात.या तलावाजवळ नागेश्वर ज्योतिर्लिंग,बेट द्वारका ही ठिकाणी आहेत.
गोपी तलाव हे एक महत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ असून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.द्वारका शहरापासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.
11)Shivrajpur Blue Flag Beach-

शिवराजपूर बीच हा गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील शिवराजपूर गावाजवळ सर्वात प्रसिद्ध, शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हा बीच निळसर,स्वच्छ व उथळ पाणी असलेला एक पांढरा-वाळूचा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे अलीकडेच या बीचला ब्लू फ्लॅग बीच ही मान्यता मिळाली आहे. याशिवाय या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन आणि इतर सुंदर पक्षी पाहायला मिळतात.
या बीचवर पर्यटकांसाठी स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, बेट टूर, समुद्र स्नान यासारख्या विविध सुविधा आहेत. त्यामुळे हा विषय पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे.द्वारकेपासून हा समुद्रकिनारा बारा किलोमीटर अंतरावर आहे.
12)Shri Shardapeeth, Dwarka-

शारदा पीठ, हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. व हे भारतातील चार प्रमुख मठांपैकी एक आहे. या मठाला द्वारका शारदा मठ, कालिका मठ म्हणूनही ओळखले जाते.आदि शंकराचार्यां हे हिंदू धर्मातील सर्वोच्च धार्मिक गुरु होते 9 व्या शतकात श्रीमद् जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी या शारदापीठाची स्थापना केली.
सध्या या मठात 78 वे शंकराचार्यजी गादीवर विराजमान आहेत. या मंदिरातील वातावरण अत्यंत धार्मिक व पवित्र आहे. शारदा म्हणजे ज्ञानदेवता सरस्वतीचे प्रतीक आहे, द्वारकेतील या ज्ञानकेंद्र शारदापीठात आजही हिंदू धर्म, संस्कृती आणि संस्कृत भाषा यांचे जतन आणि प्रचार केला जातो.हे शारदापीठ मंदिर द्वारकाधीशांच्या जगत मंदिराजवळ आहे.
13)Panchkui Tirth-

पंचकुई तीर्थ हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी महाभारतातील पाच पांडवांनी पाच गोड्या पाण्याच्या विहिरी, व शिवलिंग स्थापन केले होते असे सांगितले जाते म्हणून याला ‘पंचकुई’ असे म्हटले जाते. येथील परिसर अत्यंत शांत व निसर्ग सौंदर्य आणि बहरलेला आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण विहिरी मध्यवर्ती ठिकाणी असून भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पंचकुई तीर्थ पर्यटकांना प्राचीन धार्मिक प्रथा आणि प्रदेशाच्या सांस्कृतिक इतिहासाची झलक पाहायला मिळते. हे तीर्थक्षेत्र एक आध्यात्मिक ठिकाण असून या ठिकाणाला भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
14)Shree Gayatri Shaktipith-

श्री गायत्री शक्तीपीठ हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील गायत्री मातेचे एकमेव धार्मिक स्थळ आहे.या ठिकाणी गायत्री मातेची पूजा केली जाते. हे मंदिर 1983 मध्ये स्थापन करण्यात आले असून धार्मिक यात्रेकरूंसाठी या ठिकाणी धर्मशाळा आहेत. तसेच वर्षातून एकदा या ठिकाणी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या धार्मिक व आध्यात्मिक मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने येतात आणि गायत्री मातेची पूजा करतात.
15)Sudama Setu-

सुदामा सेतू हा गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील गोमती नदीवर नवीन बांधलेला झुलता पादचारी पूल आहे.या पुलाचे नाव कृष्णाचा बालपणीचा मित्र सुदामा याच्या नावावरून ठेवले आहे.हा पूल श्री द्वारकाधीशांचे मंदिर ते पुलाच्या दुसऱ्या बाजूस सुंदर निळसर निर्मळ पाणी असलेल्या द्वारका बीचला जोडतो. हा पुल बांधण्यापूर्वी गोमती नदीतून बोटीने प्रवास करावा लागत असे.
या पुलाचे बांधकाम रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मदतीने 2016 मध्ये पूर्ण झाले. व या पुलाच्या बांधकामाचा खर्च 7.42 कोटी रुपये एवढा आला. हा पूल 166 मीटर लांब आणि 4.2 मीटर रुंद आहे, या पुलाची पादचाऱ्यांना वाहून नेण्याची क्षमता ताशी 25,000 ते 30,000 एवढी आहे. व या पुलाला 40 मिमी लॉक केलेल्या कॉइल केबल दोऱ्यांनी बांधला आहे.
16)Iskcon Temple Dwarka-

इस्कॉन मंदिर, द्वारका, हे गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात असलेले एक आश्चर्यकारक व सुंदर भगवान श्रीकृष्णाचे पवित्र मंदिर आहे. हे मंदिर ओएसिस विस्तीर्ण एकरांवर पसरलेले असून,आंतरराष्ट्रीय कृष्णा चेतना सोसायटीचा एक भाग आहे. या मंदिराची वास्तु कला ही पारंपारिक,गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि सुंदर पद्धतीने केलेली असून येथे सजवलेल्या देवता आणि सुशोभित परिसर, सुव्यवस्थित बाग व सुंदर देवता स्थापना आहेत.
तसेच या मंदिरात ध्यान आणि जप करण्यासाठी अनुकूल व शांत वातावरण आहे. या मंदिरात पर्यटक भजन, आरती आणि वैदिक ग्रंथांवरील व्याख्याने या आध्यात्मिक गोष्टींचा आनंद घेतात. येथील मुख्य मंदिराशेजारी एक संग्रहालय असून भगवान कृष्णाचे जीवन आणि शिकवणी डायोरामाद्वारे प्रदर्शित केली जाते.
17)Samudra Narayana Temple-

समुद्र नारायण मंदिर हे गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात असलेले एक ऐतिहासिक, अद्भुत व प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर गोमती नदी व अरबी समुद्राच्या तिन्ही बाजूंनी वेढलेले विष्णू मंदिर आहे. हा मंदिर परिसर शांत असून या मंदिरातील स्थापत्यकाला कोरीव दगडात केलेली आहे. येथील समुद्र नारायणाची मूर्ती वाळूच्या रंगाची असून येथील लोकांचा असा विश्वास आहे की मंदिरावर धडकणाऱ्या प्रचंड समुद्राच्या लाटा श्रीमद् नारायण हरि हरि हा सूर निर्माण करतात.
तसेच या समुद्र नारायण मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे गेल्यावर, डाव्या बाजूला प्रवेशद्वाराजवळ एका लहान गुहेत सिंहाच्या शिखरावर बसलेल्या देवी गोमतीची पूजा केली जाते. तसेच या मंदिराजवळ चक्र नारायण मंदिर आहे ज्यावर एक दगड आहे, त्या दगडावर भगवान विष्णूचे चक्र आहे असे सांगितले जाते.द्वारकाधीश मंदिरापासून हे ठिकाण एक किलोमीटर अंतरावर आहे.
18)Bhai Mohkam Singh Ji Gurdwara Panj Payara-

भाई मोहकम सिंह जी गुरुद्वारा पंज पयारा हे हे गुजरात मधील द्वारका जिल्ह्यातील शीख धर्माचे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे.कारण हे ठिकाण पहिल्या ‘पंज प्यारे’ (पाच प्रिय) लोकांमध्ये सामील असलेल्या भाई मोहकम सिंह यांचे जन्मस्थान आहे.भाई मोहकम सिंग यांचा जन्म 1663 मध्ये येथे झाला होता व त्यांच्या वडिलांचे नाव भाई जगजीवन राय आणि आईचे नाव संभाली जी होते.
हे गुरुद्वारा शांततापूर्ण आणि अध्यात्मिक वातावरणाने बहरलेले असून शीख धर्मियांचे एक पवित्र ठिकाण आहे.भाई मोहकम सिंग हे आनंदपूर साहिब येथे ‘पंज प्यारे’ (पाच प्रिय) म्हणून ओळखले जातात. द्वारका शहरापासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.
19)Harshad Mata Temple-

हर्षद माता मंदिर हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात हलारच्या समुद्रकिनाऱ्यावर, मियाणी गावाजवळ आणि मेधाखाडी किनाऱ्यावर वसलेले अत्यंत धार्मिक स्थळ आहे. व येथील कोळसा डोंगरावर वसलेले हरसिद्धी मंदिर हे चालुक्यकालीन आहे. हे मंदिर हरसिद्धी माता मंदिर म्हणूनही ओळखले जाते. तसेच हे मंदिर जगु शाह या दानशूर व्यापाऱ्याच्या जहाज बुडाल्याच्या आणि नंतर मातेच्या कृपेने जहाज परत मिळाले,नंतर या व्यापाऱ्याने माताजींना प्रसन्न करून, पहाडीच्या माथ्यावरून खाली आणले व या स्थानी मंदिरात स्थापित केले.
अशी आख्यायिका सांगितली जाते. तसेच हे हरसिद्धी मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि राजा विक्रमादित्य यांची कुलदेवीचे मंदिर आहे. अशी मान्यता आहे की आरतीच्या वेळी माता हरसिद्धी प्रत्यक्ष उपस्थित राहतात. मंदिरात एक झुला आहे आणि माता आल्यावर तो आपोआप हलू लागतो. त्यावेळी संपूर्ण वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र वाटते. पोरबंदरपासून हे मंदिर 30 किलोमीटर अंतरावर आहे.
20)Makardhwaj Mandir-

मकरध्वज मंदिर हे गुजरात मधील द्वारका जिल्ह्यातील श्रीकृष्णाच्या मुख्य मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले भगवान हनुमानाचे एक अद्वितीय आणि भव्य मंदिर आहे. हे मंदिर दांडी हनुमान मंदिर म्हणून ही प्रसिद्ध आहे. या दुर्मिळ मंदिरात ब्रह्मचारी असलेल्या हनुमान आणि त्यांची संतती मकरध्वज यांच्या मूर्ती आहेत.पौराणिक माहितीनुसार, माशाने खाल्लेल्या हनुमानाच्या घामाच्या थेंबापासून मकरध्वज जन्मला होता.
हे मंदिर त्यांच्या भेटीचे स्मरण करते. हनुमान दांडी मंदिर हे एक महत्त्वाचे तीर्थस्थळ असून हनुमान आणि मकरध्वज यांच्यातील पिता-पुत्राच्या नात्याचा शोध घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आकर्षित करते.
21)Shani Dev Temple Hathla-

शनिदेव मंदिर हे गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्हाआणि पोरबंदर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या हाथला गावात एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर शनिदेवाचे जन्मस्थान मानले जाते. शनीदेव हे सूर्य आणि छायाचा मुलगा आहे, व नऊ ग्रहांपैकी एक म्हणजे शनीदेव. शनी हा सूर्यमालेतील सातवा ग्रह आहे. शनीने आपल्या वडिलांना शत्रू मानले होते आणि भगवान शिवाची संतुष्ट करण्यासाठी कठोर तपस्या केली.
शिवाने शनि देवांना त्याचे वडील सूर्यासह सर्व ग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली होण्याची शक्ती दिली.शनिदेव हे लोकांना त्यांच्या आयुष्यातील कर्मांवर आधारित बक्षीस आणि शिक्षा देतात.द्वारकेपासून हे मंदिर 92 किलोमीटर अंतरावर आहे.
22)Narara,Marine National Park –

नरारा मरीन नॅशनल पार्क हे गुजरात मधील जामनगर व द्वारका जिल्ह्याच्या किनाऱ्यावर बेट द्वारका जवळ, ओखामांढल तालुक्यात अरबी समुद्रात असलेला भारतातील पहिले समुद्री राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली. हे उद्यान 162.89 चौ.कि.मी. क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. या ठिकाणी समुद्र ओसरल्यानंतर तुम्ही समुद्राच्या तळाशी पायी चालत जाऊन थेट समुद्री जीवसृष्टीचे दर्शन घेऊ शकता.
या ठिकाणी डॉल्फिन, समुद्री कासव,कोरल रीफ्स व रंगीबेरंगी मासे, ऑक्टोपस, खेकडे, सी-हॉर्स, स्क्विड, जेलीफिश, स्टारफिश हे समुद्रप्राणी पाहायला मिळतात व समुद्री गरुड, बगळे, फ्लेमिंगो, हेरॉन इत्यादी स्थलांतरित पक्षी दिसतात. तसेच येथे मॅंग्रोव्ह्स, समुद्री गवत,कोरल रीफ यासारख्या वनस्पती आढळतात. पर्यटकांना येथील मॅंग्रोव्हच्या जंगली भागात पक्षी निरीक्षण करता येते.
23)Sonkansari Temple, Bhanvad-

सोन कंसारीचे मंदिर हे गुजरात मधील द्वारका जिल्ह्यातील भानवड या ठिकाणी असलेले प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे. हे ठिकाण नवलखा मंदिराच्या डोंगराच्या टोकावर वसलेले असून मंदिरासमोर एक सुंदर तलाव आहे. व येथील सोनकंसारी तलावाभोवती एक मोठी विहीर आहे व सभोवताली अनेक मंदिरे आहेत. हे मंदिर सतीच्या कथेशी संबंधित असून आज घुमली मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
घुमली नगर शापामुळे नष्ट झाले होते त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आले. या मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा असून हे मंदिर एक धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते.सोनकंसारी मंदिर हे पोरबंदर पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे.
24)Shree Halar Tirth Aradhana Dham Jain Temple-

श्री हालार तीर्थ, अराधना धाम हे गुजरात मधील द्वारका जिल्ह्यातील सिहण नदीच्या तीरावर असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 40 एकरवर उभारलेले जैन धर्माचे मंदिर असून हे प्रभावी धाम जैन वास्तुकलेचे व शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे जगभरातून येणाऱ्या जैन भक्तांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. जैन मंदिरे व भगवान जिनेश्वर हे आध्यात्मिक साधनेचे मुख्य आधार आहेत.
हे जाणून वाघजीभाई यांनी लोकांसाठी अराधना धाममध्ये एक भव्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांना श्री महासेनविजयजी महाराज यांच्या दिव्य शक्तीने स्वर्गातूनच या पवित्र हालार तीर्थाच्या निर्मितीत मदत केली.
25)Sudarshan Setu-

सुदर्शन सेतू हा गुजरात मधील द्वारका जिल्ह्यातील, भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे. हा सेतू कच्छच्या आखातातील बेट द्वारका बेटाला आणि ओखाला जोडतो.या पुलाची एकूण लांबी 2,320 मीटर असून या पुलाचे उद्घाटन 25 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.या सेतूचे “सुदर्शन” हे नाव भगवान कृष्णाचे शस्त्र, सुदर्शन चक्रावरून देण्यात आले आहे.
या पुलामुळे द्वारकेला भेट देणाऱ्या सुमारे 8,500 रहिवासी आणि दरवर्षी वीस लाख यात्रेकरूंना मदत होते. तसेच या पुलावर वाहनांसाठी चार लेन आणि लोकांसाठी मार्ग आहेत. या पुलाच्या वाटेवर तुम्हाला भगवद्गीतेतील अद्भुत चित्रे आणि धार्मिक संदेश पाहता येतील. या पुलामुळे यात्रेकरू आणि पर्यटकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास झाला आहे.
1)द्वारका दीपगृह हे गुजरात मध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1)द्वारका दीपगृह हे गुजरात मध्ये देवभूमी द्वारका जिल्ह्यातील अरबी समुद्राजवळ आहे.
2) द्वारका जिल्ह्यातील सुदर्शन सेतू पुलाची लांबी किती आहे ?
2) द्वारका जिल्ह्यातील सुदर्शन सेतू पुलाची एकूण लांबी 2,320 मीटर आहे .
3) द्वारका जिल्ह्यातील सोन कंसारीचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?
3) द्वारका जिल्ह्यातील सोन कंसारीचे मंदिर भानवड या ठिकाणी असलेले प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे.


