अरावली जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 19 places to visit in Aravalli District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहत आहोत आता आपण पाहणार आहोत अरवली जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे, अरवली जिल्हा हा भारत देशातील गुजरात राज्यातील अरवली पर्वतरांगांच्या मध्यभागी असलेला एक महत्त्वाचा जिल्हा आहे. 15 ऑगस्ट 2013 रोजी साबरकांठा जिल्ह्यातून अरावली हा 29 वा जिल्हा विभागला गेला.या जिल्ह्याचे मुख्यालय मोडासा येथे असून गुजरात आणि राजस्थानमधून जाणाऱ्या अरावली पर्वतरांगांवरून या जिल्ह्याचे हे नाव पडले आहे. Top 19 places to visit in Aravalli District

अरवली जिल्ह्यात मोडासा, बायड, धानसुरा, भिलोदा, मालपूर आणि मेघराज हे 6 तालुके आहेत. हा जिल्हा निसर्गसंपन्न,ऐतिहासिक महत्त्व, सांस्कृतिक समृद्धता,अध्यात्मिकता आणि विविध प्रकारच्या वनस्पती व निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो. शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यात कापूस, गहू, बाजरी, आणि डाळिंब हे पिके घेतली जातात.

या जिल्ह्यात मिनी डाळ मिल, मिनी ऑइल मिल, दूध प्रक्रिया उद्योग, आणि मधमाशी पालन हे कृषी आधारित उद्योग आहेत. याशिवाय या जिल्ह्यात सिमेंट उद्योग, रासायनिक खते,अन्न प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग, आणि पर्यटन हे उद्योग चालतात. या निसर्ग रम्य जिल्ह्यात अनेक धार्मिक ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 19 places to visit in Aravalli District

अरावली जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1)Shamlaji VIshnu Temple-

Top 19 places to visit in Aravalli District


शामलाजी विष्णू मंदिर हे गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील हिरव्यागार टेकड्यांमध्ये आणि सुंदर मेश्वो नदीच्या काठावर वसलेले भगवान विष्णूचे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.हे मंदिर नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले असून गुजरात आणि राजस्थानच्या क्रॉसरोडवर आहे.

आणि हे मंदिर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एक धार्मिक केंद्र आहे. राजस्थान आणि गुजरात मधील पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.शामलाजी मंदिराजवळ अनेक हिंदू मंदिरे आहेत. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.शामलाजी रोड स्टेशन पासून हे मंदिर 13 किलोमीटर अंतरावर आहे.

2)Devnimori –

Visit our website: allindiajourney.com


देवनिमोरी गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्यातील देवनिमोरी गावी असलेले प्रसिद्ध बौद्ध स्थळ आहे. या ठिकाणी एक मोठा तलाव आणि देवनी मोरी गावाजवळ सापडलेले प्राचीन बौद्ध अवशेष या तलावाखाली बुडालेले आहेत. तसेच या तलावाच्या मध्यभागी 1962 मध्ये स्वयंसेवकांना एक बौद्ध ध्वज सापडला व बुद्धांचे काही पवित्र अवशेष सापडले होते. त्यामुळे 1962 मध्ये या ठिकाणी बौद्धांचे स्तूप असल्याचे मानले जाते.येथे बुद्धाच्या अवशेषांचे आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांचे उत्कृष्ट नमुने आहेत. आरवली शहरापासून देवनिमोरी हे गाव थोड्या अंतरावर आहे.

3)harishchandrani chauri-


हरीशचंद्रची चोरी हे गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्यातील शामळाजी गावाजवळ असलेले ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्व असलेले एक प्राचीन स्थळ आहे. या ठिकाणी ‘चोरी’ हा शब्द स्थानिक भाषेत छोटे मंदिर किंवा प्राचीन मंदिराचे अवशेष यासाठी वापरला जातो.हरीशचंद्र राजा हा सत्यवचनासाठी आणि प्रामाणिकतेसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध पौराणिक राजा होता.

या राजाने या ठिकाणी काही काळ वास्तव केल्यामुळे राजाच्या जीवनातील घटनांचा संबंध या स्थळाशी जोडला जातो. या परिसरात प्राचीन काळातील मंदिरे, खांब, मूर्ती व शिलालेखांचे अवशेष सापडले असून हे ठिकाण पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. अभ्यासप्रेमी व पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

4)Zanzari Waterfall-


झांझरी धबधबा हा अरावली जिल्ह्यातील बायड तालुक्यातील दाभा या छोट्या गावाजवळ वात्रक नदीच्या काठावर असलेला सुंदर व नयनरम्य धबधबा आहे. झांझारी धबधबा हा अहमदाबाद आणि गांधीनगर जवळील सर्वात छान आणि नयनरम्य ठिकाण आहे. एकदिवसीय पिकनिकसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

या धबधबा परिसरात गंगामातेचे मंदिर, ऐतिहासिक उत्कंठेश्वर महादेव (उताडिया महादेव),हनुमानजी मंदिर हे वात्रक नदीच्या मध्यभागी एका लहान टेकडीवर आहे. ही ठिकाणे आहेत.बायड पासून हा धबधबा 12 किलोमीटर अंतरावर आहे.

5)Kakrai Maa Mandir-


काकराई माताजी मंदिर हे गुजरात राज्यातील आरवली जिल्ह्यातील मोडासा येथील दधलिया या ठिकाणी उंच पर्वतावर असलेले प्राचीन व प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे.हे मंदिर सोळाव्या शतकात बांधले असून हे मंदिर पर्वतावर असल्यामुळे येथील वातावरण थंड व अल्लादायक आहे. येथील मंदिर परिसरात शांत, पवित्र आणि भक्तिपूर्ण वातावरण आहे . तसेच काकराई माताजी ही स्थानिक लोकांची कुलदेवी मानली जाते व नवसाला पावणारी देवी म्हणून या मातेचि ख्याती आहे.

6)Mazum Dam-


माझुम धरण हे गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्यातीलमाझुम नदीवर बांधलेले एक महत्वाचे धरण आहे.या धरणाचा उपयोग सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.तसेच,या धरणाच्या सभोवतालचा परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात. हे धरण माझम नावानेही ओळखले जाते.

7)Sakariya Hanuman (Shree Bhid Bhanjan Hanuman)


भिडभंजन हनुमानजी मंदिर किंवा सकऱिया हनुमान (भिड भंजन हनुमान)हे गुजरात राज्यातील आरवली जिल्ह्यातील सकऱिया गावात असलेले जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी श्री हनुमानजिची 10 फूट स्वयंभू मूर्ती असून शयन ( विश्रांती) अवस्थेत आहे. या मंदिराचा परिसर निसर्गरम्य व जंगलाचा आहे.चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मारुती यज्ञ पार पाडला जातो व हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.मोडासा तालुक्यापासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.

8)Meshvo Dam –


मेश्वो धरण हे गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्यातील मेश्वो नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण शामलजी मंदिराजवळ असून 1960 च्या उत्तरार्धात हे धरण बांधण्यात आले आहे. धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य, शांत व समृद्ध आहे. या धरणाचा उपयोग सिंचनासाठी,कृषीसाठी पाणीपुरवठा, पिण्याच्या पाण्याचा स्रोत आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी होतो. हे धरण शामलजी मंदिर परिसरात असल्यामुळे पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

9)Shyamlavan-


श्यामल वण हे गुजरात राज्यातील आरवली जिल्ह्यातील हे शामलजी मंदिराच्या परिसरात असलेले एक अतिशय सुंदर व निसर्गरम्य परिसरात असलेले महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. श्यामल वण येथे भगवान कृष्णाचे मंदिर आहे, हे मंदिर पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

तसेच या ठिकाणी अरावली घाटीतील हिरवीगार नैसर्गिक वने, पर्वतीय परिसर त्यामुळे पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे.व येथे बौद्ध विहाराच्या आणि स्तूपाच्या खुणा, देवनी मोरी ही पर्यटन स्थळे आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या वनाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

10)Sunsar Waterfall-


सुसार धबधबा हा गुजरात राज्यातील भिलोदा तालुक्याजवळ अरवली जिल्ह्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेला एक अत्यंत निसर्गरम्य व हंगामी धबधबा आहे. हा धबधबा साधारणतः 15 ते 25 फूट उंचीवरून दोन स्तरातून कोसळतो.शहराच्या गोंगटापासून शांतता अनुभवण्यासाठी हा धबधबा म्हणजे एक सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील दृश्य खूप मनोहरी असते त्यामुळे मिनी-कश्मीरसारखा अनुभव मिळतो.

हा धबधबा परिसर हिरव्यागार जंगलांनी आणि डोंगरांनी वेढलेला आहे.व धबधब्याच्या पायथ्याशी एक तलाव तयार झालेला असून पर्यटक तेथे पोहण्याचा आनंद घेतात. या परिसरात आदिवासी लोक आणि त्यांची संस्कृती पाहायला मिळते. अहमदाबाद पासून हा धबधबा 140 किलोमीटर अंतरावर आहे.

11) Rajendranagar Hill station (Hadmat Sunset Point)


राजेंद्रनगर हिल स्टेशन आणि हदमत सनसेट पॉइंट हे गुजरात राज्यातील आरवली जिल्ह्यातील अत्यंत निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाणे आहेत. राजेंद्रनगर हिल स्टेशन हे ऊंचसखल टेकड्यांवर असलेले ठिकाण उन्हाळ्यातही थंडगार व अल्हाददायक असते. व येथूनच 4 कि.मी. अंतरावर असलेले हदमत सनसेट पॉइंट या ठिकाणी सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.

या परिसरातील हे दोन्ही ठिकाणे मुख्य आकर्षण आहेत. या ठिकाणाहून सुर्यास्ताच्या वेळी दिसणारा निसर्गरम्य देखावा अप्रतिम, विहंगम आणि मनमोहक असतो. श्यामलाजी पासून राजेंद्रनगर हिल स्टेशन 26 किलोमीटर अंतरावर आहे.

12)Shri Dipeshwari Mataji Temple –


श्री दीपेश्वरी माताजी मंदिर हे गुजरात राज्यातील आरवली जिल्ह्यातील बायड तालुक्यात उंतरडा गावात असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.हे मंदिर माजुम नदीच्या काठावर असून निसर्गरम्य परिसरात व घनदाट झाडांमध्ये आहे. या मातेबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की दीपा नावाची एक दिव्य,तेजस्वी मुलगी होती ती रोज आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नदीकाठच्या वडाच्या झाडाखाली झोके खेळण्यासाठी येत असे. एके दिवशी खेळता खेळता ती खाली पडली आणि त्या ठिकाणी फुलांचा ढिगारा झाला आणि दीपा दृश्य झाली.

तिच्या मैत्रिणीने तिच्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली ते त्या ठिकाणी धावत आले तेव्हा एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून असे सांगितले की दिपा ही एक दिव्यशक्ती आहे, आणि तिची भक्ती भावाने पूजा केल्यानंतर ते भक्तांचे दुःख हरण करेल त्यानंतर सर्वांना विश्वास बसला आणि या ठिकाणी या मातेचे मंदिर उभारले. गुजरात मधल्या हिम्मतनगरपासून हे मंदिर 46 किलोमीटर अंतरावर आहे.

13)Devraj Dham-


देवराज धाम हे गुजरात राज्याच्या अरवली जिल्ह्यात मोदासा या निसर्गरम्य ठिकाणी असलेले एक प्रसिद्ध धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे मंदिर एका उंच टेकडीवर असून निसर्गरम्य व अल्हाददायक वातावरणात आहे. ‘देवा यात पंडित’ यांची या ठिकाणी समाधी आहे. व या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जीवनात वापरलेल्या वस्तूंच्या प्रतिमा आहेत. येथील मंदिर परिसरात अत्यंत निसर्गरम्य व हिरवाईने भरलेला आहे.मोदासा शहरापासून देवराज धाम हे ठिकाण 6 किलोमीटर अंतरावर आहे.

14)Bhavnath Temple-


भावनाथ मंदिर हे गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील भिलोडा तालुक्यातील मढ गावातील प्राचीन व धार्मिक शिवमंदिर आहे. हे मंदिर हातमती नदीच्या धरणाच्या काठावर असून येथे असलेल्या शिलालेखावरून हे मंदिर सुमारे 1300 वर्षे जुने आहे. तसेच या मंदिर परिसरात भृगुकुंड नावाचा एक जलाशय आहे त्या पाण्यात स्नान केल्यास कुष्ठरोग बरा होतो असे मानले जाते.

या ठिकाणी शिव मंदिर आणि भृगुचा पुत्र अवन ऋषी यांचे मंदिर आहे.श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात.भिलोडा पासून हे ठिकाण सहा किलोमीटर अंतरावर आहे.

15)Odhari Mata Temple-


ओढारी माता मंदिर हे गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्यातील मोडासा या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.या मंदिराच्या जवळ एक सुंदर ओढारी तलाव व बगीचा आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्याने भाविकांची व पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते.मोडासा बस स्टँड पासून हे ठिकाण एक किलोमीटर अंतरावर आहे.

16)Malpur Tribal Centre-


मालपूर आदिवासी केंद्र हे गुजरात राज्यातील आरवली जिल्ह्यातील श्यामलजी जवळ आदिवासी समुदायासाठी असलेले एक महत्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात. या केंद्रात आदिवासी लोकांच्या संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली जपल्या जातात. या भागात शेती, हस्तकला,इतर पारंपरिक व्यवसाय, लोकनृत्य, आदिवासी हाट बाजार स्मारक प्रांतवल (बयाद तालुका) आदिवासी स्मृतीस्तंभ, आणि आदिवासी मुलांसाठी शिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी आदिवासी लोकांचे कला व संस्कृती पाहायला मिळते.

17)Shree Swaminarayan Temple, Torda-


श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्यातील भिलोदा तालुक्यातील टोरडा या ठिकाणी असलेले पवित्र धार्मिक मंदिर आहे. हे ठिकाण आध्यात्मिक संत गोपालनंद स्वामी यांचा जन्मस्थान असून श्री स्वामी नारायण संप्रदायात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 1945 मध्ये करण्यात आली. याशिवाय या मंदिरात गदंबिन गोपाललालजी, हरिकृष्ण महाराज, गोपालनंद स्वामी, गणपती दादा आणि हनुमानजी यांच्या मूर्ती आहेत.

अषाढ पौर्णिमेला या ठिकाणी रात्री अनाज उपायाने ‘तो लाई’ विधी साजरी केली जाते. यामध्ये 11 प्रकारचे धान्य वेगवेगळे मापून एका मटकीत ठेवले जाते, व सोन्याच्या तराजूने वजन केले जाते. येथील मंदिर परिसर अत्यंत शांत व अध्यात्मिक आहे.

18)Gebi Mahadev temple-


गेबी महादेव मंदिर गुजरात राज्यातील आरवली जिल्ह्यातील मोडासा तालुक्यात,माझम नदीकिनारी असलेले पवित्र शिवमंदिर आहे. या ठिकाणी जवळच माझम धरण आहे. येथील मंदिर परिसर निसर्गरम्य, सुंदर व शांत आहे. दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिराच्या जवळपास रक्षेश्वर महादेव (मालपुर), भुवनेश्वर महादेव (भिलोदा), रामेश्वर महादेव (मेढासन) ही मंदिरे आहेत.

19)Darbargadh Fort-


दरबारगड किल्ला हा गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्यातील मालपुर तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला Sisodia राजपूतांनी चित्तोडगढ येथून स्थलांतर करून 13–14 व्या शतकात बांधला होता. या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत सुंदर पद्धतीने केलेले असून ते मध्ययुगीन अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुनाच आहे.

या किल्ल्याचा महत्त्वाचा ऐतिहासिक प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांनी सूरत शहरावर आक्रमण केलेले होते तेव्हा रावळ रामसिंहजी यांनी त्यांचे स्वागत केले होते.या किल्ल्याला विविध भिंती, प्रवेशद्वार,राजप्रसाद, दरबार आणि रणांगणे आहेत. तसेच या किल्ला परिसरात हस्तकला विक्री, शुभ्र तलाव, प्राचीन मंदिरे आणि हिंदू तीर्थक्षेत्रे आहेत.

Visit the travel blog

1) गुजरात मधील शामलाजी विष्णू मंदिर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

गुजरात मधील शामलाजी विष्णू मंदिर हे आरवली जिल्ह्यात आहे .


2)आरवली जिल्ह्यातील श्री दीपेश्वरी माताजी मंदिर कोणत्या गावात आहे ?

आरवली जिल्ह्यातील श्री दीपेश्वरी माताजी मंदिर उंतरडा गावात आहे.

3)आरवली जिल्ह्यातील राजेंद्रनगर हिल स्टेशन कशासाठी प्रसिद्ध आहे ?

आरवली जिल्ह्यातील राजेंद्रनगर हिल स्टेशन हदमत सनसेट पॉइंटसाठी प्रसिद्ध आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top