मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण भारत देशाच्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे पाहत आहोत. आता आपण पाहणार आहोत गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे,आणंद हा भारताच्या गुजरात राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. 1997 मध्ये खेडा जिल्ह्यातून वगळून आनंद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.या जिल्ह्यात 8 तालुके असून जगातील सर्वात मोठी अमूल सहकारी दूध वितरण संस्था आहे. व 20 व्या शतकात झालेल्या दुग्ध क्रांतीमुळे आणंदला भारताची दुग्ध राजधानी म्हणून ओळखले जाते. तसेच 60 च्या दशकात देशात झालेल्या श्वेत क्रांतीचे आनंद हे केंद्रबिंदू होते. Top 22 places to visit in Anand District
येथील स्वामी नारायण मंदिर हे आणंद शहराचे मुकुट रत्न समजले जाते. याशिवाय या जिल्ह्यात सहकारी दूध विपणन महासंघ लिमिटेड (अमुल), राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ ऑफ इंडिया, सुप्रसिद्ध बिझनेस स्कूल-आयआरएमए आणि आनंद कृषी विद्यापीठाचे मुख्य कार्यालय आहे. शेती उत्पादनामध्ये या जिल्ह्यात बाजरी, गहू, तांदूळ, कापूस, तंबाखू हे पिके घेतली जातात.व येथे कापूस पिंजणे, हातमाग, आगपेट्या हे छोटे मोठे उद्योग केले जातात आणि दुधाची भुकटी व विविध दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात.
या व्यवसायाचे प्रशिक्षण येथील कृषिसंस्थेत दिले जाते. आणि येथे तंबाखू वर संशोधन केले जाते. या जिल्ह्याची मुख्य भाषा गुजराती असून इतर भाषाही बोलल्या जातात. तसेच या जिल्ह्यातील ढोकळा, खाकडा, फाफडा हे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत.आणंद जिल्हा हा चारोटारचा एक भाग असून येथील माती सुपीक आहे. या जिल्ह्यात अनेक धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.
Top 22 places to visit in Anand District
आनंद जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1) Shri Manilaxmi Shwetamber Jain Tirth-

मणिलक्ष्मी जैन तीर्थ हे गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील मानेज गावातील एक पवित्र व जागृत तीर्थस्थळ आहे.हे पवित्र मंदिर जैन धर्मातील 20 वे तीर्थंकर भगवान मुनी सुव्रत स्वामी यांना समर्पित आहे. या मंदिराची स्थापत्यकाला पूर्णतः पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये बांधलेली असून येथील वातावरणअध्यात्मिक व शांत आहे. हे मंदिर 2017 मध्ये जनतेसाठी खुले करण्यात आले.मणिलक्ष्मी तीर्थ हे 44 एकर जमिनीवर पसरलेले असून गुजरातमधील सर्वोत्तम जैन मंदिरांपैकी एक आहे.
2) Vaijnath Mahadev Temple-

वैजनाथ महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील जितोडिया या ठिकाणी 1000 वर्षापूर्वीचे एक अद्भुत, आश्चर्यकारक मंदिर आहे. येथील मंदिरात असलेल्या शिवलिंगाला 25 छोटे छोटे होल आहेत आणि त्यातून निरंतर पाणी वाहते. हे पाणी कोठून येते हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे ते एक रहस्यच आहे. स्थानिक पातळीवर येथील लोक या पाण्याला ‘शिव-गंगा’ म्हणतात.
या पाण्याने अनेक रोग बरे होतात अशी येथील लोकांची श्रद्धा आहे त्यामुळे हे पाणी गंगाजल म्हणून ते घरी घेऊन जातात. या पाण्याचे प्रयोगशाळेत निरीक्षण केले असता हे पाणी इतर पाण्यापेक्षा वेगळे आहे असे समजले त्यामुळे ही एक अविश्वासनीय गोष्ट आहे. जगातील ही शिवलिंगातून पाणी येणारे एकमेव व अद्वितीय मंदिर आहे.
Visit our website: allindiajourney.com
3) Borsad Stepwell-


बोरसाड स्टेपवेल ही गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील बोरसाड शहरात असलेली एक सात मजली प्राचीन व अद्भुत विहीर आहे. ही विहीर 1497 मध्ये वासु सोमा आणि त्यांच्या कुटुंबाने बांधली होती. ही पायऱ्यांची विहीर 7 मजली असून विहिरीला 13 कमानी आहेत. ही विहीर एक राष्ट्रीय स्मारक असून भारताच्या पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित केलेली आहे.
गुजरातीमध्ये या विहिरीला बोरसदनी वाव असेही म्हणतात. तसेच या विहिरीच्या भिंतीवर एक संवत 1553 चा संस्कृतमध्ये शिलालेख आहे. आनंद शहरापासून बोरसाड हे ठिकाण 22 किलोमीटर अंतरावर आहे.
4)ISKCON V.V Nagar, Sri Sri Radha Giridhari-


इस्कॉन व्हीव्ही नगर श्री श्री राधा गिरीधारी हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील वल्लभ विद्यानगर, येथे असलेले एक पवित्र मंदिर संकुल आहे.हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचे असून आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत सोसायटीच्या भक्तांचे हे लोकप्रिय ठिकाण आहे. या मंदिराची वास्तूकला अत्यंत अद्भुत व आश्चर्यकारक आहे. या मंदिराचे कोरीव काम व नक्षीकाम अत्यंत सुंदर व गुंतागुंतीचे आहे. या मंदिरात विविध प्रकारचे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात.
5)Bhadrakali Vav(stepwell)-

भद्रकाली वाव ही गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील उमरेठ तालुक्यात भलेज गावामध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली प्राचीन पायरी विहीर आहे.ही वाव प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून ही वाव (stepwell) वंजारा समाजाने फक्त एका दिवसात बांधली असल्याचे सांगितले जाते. हे वाव दगडात बांधलेली आहे व या वावेत सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. ही विहीर पायऱ्यांसह खोल आहे व विहिरीमध्ये सुंदर नक्षीकाम व कोरीव काम केलेले आहे.
ही विहीर 1152 मध्ये असलेले शासक सिद्धराज जयसिंह आणि त्यांची आई मिनलदेवी यांनी बांधल्याचे सांगितले जाते.या वावेजवळ भद्रकाली देवीचे मंदिर असल्याने ही वाव भद्रकाली वाव नावाने ओळखले जाते. गुजरात मधील आनंद जिल्ह्यातील ही एक ऐतिहासिक सात मजली पाण्याखालची वाव आजही पाहायला मिळते.उमरेठ रेल्वे स्टेशन पासून हे ठिकाण तीन किलोमीटर अंतरावर आहे.
6)Amul Dairy Museum-

अमूल डेअरी संग्रहालय हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील अमूल डेअरीच्या कॅम्पसमध्ये आहे. या संग्रहालयाची स्थापना 26 नोव्हेंबर 2000 रोजी करण्यात आली. हे संग्रहालय ‘दुग्ध क्रांतीचे पालक’डॉ. वेरघेझ कुरियन यांना स्मरणार्थ डॉ. कुरियन संग्रहालय म्हणूनही ओळखले जाते. या संग्रहालयात फ्री विस्तृत फोटो गॅलरी, ऐतिहासिक प्रदर्शने, आणि हिंदी भाषेतील ऑडिओव्हिज्युअल शो आहेत .
तसेच या ठिकाणी अमूलची स्थापना, दुग्धक्रांती आणि सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या दूध उत्पादक संघाचा प्रवास, दुग्धोत्पादन प्रक्रियेची माहिती,अमूलच्या प्रवासातील विविध टप्पे आणि यशोगाथा जाणून घेता येतात.हे संग्रहालय अमूलच्या स्थापनेनंतरच्या इतिहासावर, दुग्धव्यवसायातील योगदानावर माहिती देते.
7)Sardar Patel and Vithalbhai Patel Memorial-

सरदार वल्लभभाई पटेल आणि विठ्ठलभाई पटेल मेमोरियल हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील करमसद तालुक्यातील लोखंडाचे पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे भाऊ विठ्ठलभाई पटेल या थोर भावंडाचे स्मारक आहे. हे स्मारक गर्द हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असून आधुनिक वास्तुकलेचा अद्वितीय नमुना आहे.
हे स्मारक म्हणजे वल्लभभाई पटेल आणि विठ्ठलभाई पटेल यांचे विचार, मूल्ये आणि विकासात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. या ठिकाणी या दोघांच्या जीवनचरित्राची माहिती, त्यांचे प्रेरणा देणारे कार्य आणि त्यांच्या योगदानाचे दस्तावेज आहेत. आनंद शहरापासून हे ठिकाण थोडे अंतरावर आहे.
8) BAPS Shri Swaminarayan Mandir, Anand-

BAPS श्री स्वामीनारायण मंदिर हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील गोया तलावाच्या काठी असलेले प्रसिद्ध स्वामीनारायणचे (कृष्ण) मंदिर आहे. या मंदिरात 8 गुंबदं व 24 टॉरेट्स आहे व येथील मुख्य गुंबदाची उंची 27 मीटर आहे. आणि मंदिरावर सुवर्ण कलश व पांढरा ध्वज आहे. हे मंदिर वैदिक हिंदू धर्माच्या तत्त्वांवर बांधले असून या भव्य मंदिराची वास्तूकला वैशिष्ट्यपूर्ण सजावटीची आहे
.या मंदिरामध्ये गुंतागुंतीचे शिल्पे, दरवाजे, आणि आत एक तेजस्वी देवता असलेले गर्भगृह आहे. येथील प्रत्येक मजल्यावर भीन्न मूर्तींच्या आणि गुरु परंपरेच्या प्रतिष्ठापन केलेले आहे. भाविकांचे हे श्रद्धेचे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे.
9)Stambhan Parshwanath Jinalaya-

स्तंभन पार्श्वनाथ जिनालय हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील खंभात परिसरातील गंभू गावाच्या मध्यभागी असलेले सर्वात प्राचीन, ऐतिहासिक व प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे.गंभू गावात अनेक देव-देवतांची मंदिरे आहेत. प्राचीन काळात गंभू हे 144 गावांचे राजधानी स्थान असलेले जैन समाजासाठी एक महत्त्वाचे केंद्र होते.
हे मंदिर दोन मजली असून त्यावर सुंदर कोरीव नक्षीकाम काम केलेले आहे. या मंदिरात श्री गंभीर पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती ही इ.स. 11 व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. भाविक मोठ्या प्रमाणात येथे दर्शनाला येतात.
10)Shree Hanumanji Temple, Lambhvel –

श्री हनुमानजी मंदिर हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील लंभवेल गावात हनुमानाचे स्वयंभू व जागृत मंदिर आहे. हे मंदिर आणंद-कंजरी रोडवर विशाल परिसरात असून ते 500 वर्षापेक्षा जुने आहे. दरवर्षी हनुमानजींच्या मंदिरात श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी भव्य यात्रा भरवली जाते, त्यावेळी हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात.
तसेच दिवाळीच्या आदल्या दिवशी, काली चौदस रोजी, या मंदिरात एक मोठा मेळा भरतो. येथील मंदिर ट्रस्ट द्वारे सर्व कामांचे नियोजन केले जाते. या मंदिरात शनिवार या आणि मंगळवार भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. आनंद शहरापासून हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.
11)Art and Craft-

गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यात हस्तकला आणि कला यांचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या हस्तकला, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन उपयोगी वस्तू बनवल्या जातात. यामध्ये मातीची भांडी, विणलेले कपडे आणि लाकडी वस्तू, यांचा समावेश होतो. आनंद जिल्ह्यात तुम्हाला हस्तकला, भरतकाम, रंगकाम, आणि मातीकाम केलेल्या वस्तू मिळतील. याशिवाय या ठिकाणी कला आणि हस्तकला वर्ग चालवले जातात त्यामध्ये तुम्ही विविध कला शिकू शकता.
येथे ‘माता नी पछेडी’ ही एक वस्त्रकला आहे ज्यामध्ये कापडावर विविध देवदेवतांच्या चित्र कापडावर काढले जाते ,भरतकाम आणि माती कामामध्ये भांडी, दिवे आणि सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. याशिवाय येथे अनेक विविध प्रकारच्या कला आहेत. गुजरात राज्यातील आनंद जिल्हा, कला आणि हस्तकला प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे.
12) Gyan Baug-

ज्ञान बाग हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील एक शांत, निसर्गरम्य,ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी एक हिंदू मंदिर व संग्रहालय आहे. हे ठिकाण शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. या ठिकाणी भरपूर झाडे, बगिचे आणि हरित परिसर असल्यामुळे पर्यटकांचे हे आकर्षणाचे केंद्र आहे.
13)Khapra Zaveri Palace-

खापरा झावेरी पॅलेस हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील पावागडच्या डोंगरपायथ्याशी असलेले एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे.हा राजवाडा 16व्या शतकाच्या सुरुवातीच्या सुलतानत काळातला असून सुलतानत स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. हा राजवाडा चौकोनी जमिनीवर उभारलेला असून चारही बाजूंनी मजबूत भिंतीने वेढलेला आहे. आजही येथील प्रवेशद्वाराचे अवशेष,भव्य कमानी, घुमट आणि मोठमोठे दरवाजे पाहायला मिळतात.
हा पॅलेस अंतर्गत सजावटीने समृद्ध आहे व या पॅलेस परिसरात अनेक धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये मशिदी, कमानी, गडकोट, मकई कोठार, कालीका मंदिर आणि लकुलीश मंदिर यांचा समावेश आहे. हे सर्व स्थळे चार तासात पाहून होतात. आनंद जिल्ह्यातील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.
14)Flow Art gallery-

फ्लो आर्ट गॅलरी ही गुजरात राज्याचे आनंद जिल्ह्यातील व्हल्लभ विद्याभवनरमध्ये असलेले प्रसिद्ध,कलात्मक आकर्षण केंद्र आहे. या आर्ट गॅलरीची स्थापना 1995 साली आंतरराष्ट्रीय कलाकार व आफ्रिकेतील केनिया येथे जन्मलेल्या कल्पना आमिन यांनी केली आहे. या गॅलरीमध्ये पारंपारिक गुजराती शैली वस्तूंमध्ये जाड कोस्टर, ट्रे, पेन स्टँड, चहाचे दिवे म्युरल्स, शिल्प,
टेबल बेस, मातीचे भांडे, कॉर्पोरेट व लग्नासाठी भेटवस्तू, चहा लाईट व इतर उपयोगी वस्तू आहेत. याशिवाय या ठिकाणी एक शिक्षणात्मक स्टुडिओ आहे, त्यामध्ये कलाकारांना माती, फायबर, धातू, लाकूड व सिमेंटचे विविध प्रयोग शिकवले जातात.
15)The Enjoy City-

द एंजॉय सिटी हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील बोसड तालुक्यातील वळवोद गावातील एक प्रसिद्ध मनोरंजन पर्यटन स्थळ आहे. हे जलपार्क व ऍडव्हेंचर पार्क 200 एकरांवर पसरलेले असून भारतातील सर्वात मोठ्या जलपार्कपैकी एकआहे.या ठिकाणी 73 लक्झरी वेणी,150 पेक्षा अधिक राइड्स,280 खोल्यांचे हॉटेल, थरारक ऍडव्हेंचर झोन,फूलबाग व स्पोर्ट्स मैदान आणि लहान मुलांसाठी खेळण्याची सोय आहे. तसेच येथील प्रवेशद्वारावर स्वामिनारायणांची मोठी मूर्ती आणि विविध कलात्मक शिल्पे आहेत.
16) Mahisagar Van-


महिसागर वन हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि जैवविविधतेने समृद्ध असलेले वनक्षेत्र आहे. हे वन महिसागर नदीच्या किनारी वसलेले असून पक्षी निरीक्षक, आणि निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाचे व आदर्श ठिकाण आहे. या निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने बहरलेल्या वनामध्ये विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती, आणि प्राणी व पक्षी आढळतात.
तसेच हिवाळ्यात या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचे थवे येतात. महिसागर वन हे मही नदीच्या काठी असल्यामुळे, तेथील परिसर निसर्गरम्य,शांत व जैवविविधतेने परिपूर्ण आहे.महिसागर वन, आनंद जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
17)Ashapura Mata Mandir, Piplav-

आशापुरा माता मंदिर हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील सोजिंत्रा तालुक्यातील पिपलाव गावात असलेले प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरांचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मंदिरात आशा आणि पुरी देवीच्या दोन मूर्ती आहेत एक लांब आहे आणि दुसरी थोडी लहान आहे. तसेच या ठिकाणी दीर्घकाळापासून पवित्र अखंड ज्योत चालू आहे. त्यामध्ये तेल आणि शुद्ध तूप वापरले जाते.
या मंदिराच्या परिसरात एक विशाल तलाव आहे. आशापुरी माताजी मंदिर हे पेशवे राजवी यांनी बांधले असून या मंदिरात गणेश, तारलेश्वर महादेव, खोडियार माता, हनुमानजी यांच्या मूर्ती मंदिर परिसरात स्थापित केल्या आहेत. आशापुरा मातेसाठी 56 भोग थाल केली जाते.आशापुरा माता ही भक्तांची इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून ओळखली जाते.आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात.
18)Kanewal Lake-

कणेवल तलाव हा गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील तारापूर तालुक्यातील एक महत्वाचा जलाशय आहे.हा तलाव 16 वर्षांचा जुना असून सुमारे 525 हेक्टर क्षेत्रावर पसरलेला आहे. तसेच या तलावाचे पाणी 1,987 गावांना पिण्यासाठी वापरले जाते व शेतीच्या सिंचनासाठी वापरले जाते. हा तलाव परिसर अत्यंत निसर्गरम्य असून येथील वातावरण थंड व अल्लादायक आहे.
हिवाळ्यात येथे अनेक स्थलांतरीत पक्षी जसे की सरस क्रेन, रेड-क्रेस्टीड पोचार्ड, दल्मेशियन पेलेकन, स्टॉर्क, डेमॉइसेल क्रेन, सँडपायपर इ. पाहायला मिळतात. तारापूर पासून हा तलाव 14 किलोमीटर अंतरावर आहे.
19)Shri Santram Mandir, Karamsad-

श्री संतराम मंदिर हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील करमसद या ठिकाणी असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. संतराम मंदिर हे नाडियाद येथील श्री संतराम मंदिराच्या मुख्य गादींपैकी एक आहे.व भारताचे स्वातंत्र्यसेनानी श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी संबंधित आहे. या मंदिराची स्थापना महंत श्री जानकीदास महारा यांनी करमसद येथे केली होती. हे मंदिर आजूबाजूच्या गावांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमाचे केंद्र आहे.
तसेच सध्या या मंदिरात गौशाळा, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, अॅलोपॅथी, दंतचिकित्सा आणि शिक्षण क्षेत्रातील वैद्यकीय सेवा असे अनेक उपक्रम राबवले जातात.’साकार वर्षा’ या दिवशी या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो तेव्हा भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. याशिवाय गुरुवार आणि सणांच्या वेळेस या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
20)Sojitra-

सोजित्रा हे भारतातील गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील एक गाव आहे. सोझित्रा हे माहीसागरच्या संगमाजवळ असलेल्या खंभात बंदराच्या रस्ता मार्गातील एक गाव आहे. त्यामुळे सोझित्रा हे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनले होते. येथे व्यापारी, सावकार आणि प्रसिद्ध कारागीर यांचा प्रमुख वावर होता. तसेच सोजित्रा गावामध्ये अनेक वैभवशाली व ऐतिहासिक तलाव, बारव, जैन मंदिरे, बुद्ध मूर्ती, आणि मशीद आहेत.
तसेच येथील तलावाच्या उत्खननात आजही या गावाच्या वैभवशाली इतिहासाची आणि प्राचीनतेची साक्ष देतात. येथील तलावाच्या उत्खननात दुसऱ्या शतका पूर्वीच्या मूर्ती सापडली आहेत.सोजित्रा येथे अनेक हिंदू आणि जैन धर्माची विविध मंदिरे आहेत.
21)Shree Sikotar Mata Temple –

श्री सिकोतर माता मंदिर हे गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील खंभात तालुक्यात रालेज गाव गावामध्ये असलेले सिकोतर मातेचे पवित्र व जागृत देवस्थान आहे.सिकोतर माता मंदिर हे श्री वाहनवटी सिकोतर माता मंदिर म्हणूनही ओळखले जाते. ही माता सागरात जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या नाविकांची कुलदेवताआहे. या मातेचे महात्म्य एवढे आहे की पूर्वी जेव्हा जहाजे समुद्रात हरवत, तेव्हा नाविक सिकोतर मातेला प्रार्थना करत.
या प्रार्थनेनंतर मंदिरातील तांब्याच्या खांबावर एक दिवा आपोआप प्रज्वलित व्हायचा आणि त्याच्या दिशेने मार्गदर्शन करून जहाजे सुरक्षित बंदरावर पोहोचत. या मातेच्या दर्शनासाठी खेडा, आनंद, भरुच आणि खंभात परिसरातून भाविक येतात.खंभात शहरापासून हे ठिकाण 7 किमी अंतरावर आहे.
22)Swaminarayan Temple – Bochasan

स्वामीनारायण मंदिर बोचासन हे भारतातील गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
बोचासन हे गाव धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे कारण येथे बोचासनवासी श्री अक्षरपुरुषोत्तम संस्थान (BAPS Swaminarayan Sanstha) या जागतिक ख्यातीच्या संस्थेचे जन्मस्थान आहे.बोचासन येथे (BAPS) या संस्थेचे पहिले औपचारिक केंद्र 1907 मध्ये गुरु शास्त्रीजी महाराज यांनी स्थापन केले होते.त्यामुळे हे गाव स्वामीनारायण संप्रदायाच्या भक्तांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, सत्संग, उत्सव यांचे आयोजन केले जाते. आनंद शहरापासून हे ठिकाण 25 किलोमीटर अंतरावर आहे.
1) आनंद जिल्ह्यातील श्री सिकोतर माता मंदिर कोणत्या नावाने ओळखले जाते ?
आनंद जिल्ह्यातील श्री सिकोतर माता मंदिर वाहनवटी नावाने ओळखले जाते .
2) आनंद जिल्ह्यातील कणेवल तलाव हा कोणत्या तालुक्यात आहे ?
आनंद जिल्ह्यातील कणेवल तलाव हा तारापूर तालुक्यात आहे.
3) आनंद जिल्ह्यातील आशापुरा माता मंदिर हे कोणत्या गावात आहे ?
आनंद जिल्ह्यातील आशापुरा माता मंदिर हे पिपलाव गावात आहे .