भावनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 28 places to visit in Bhavnagar District

मित्रांनो भारत भ्रमंतीमध्ये आपण पाहणार आहोत गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे, भावनगर हे पूर्वी गोहिलवाड म्हणून ओळखले जात होते या शहराची स्थापना 1723 मध्ये महाराजा भावसिंहजी गोहिल यांनी केली होती. भावनगर हे सौराष्ट्र प्रदेशातील समुद्रकिनारी,खंभात आखाताच्या पश्चिमेस वसलेले एक शहर आहे. भावनगर जिल्ह्यात अनेक छोटे आणि मोठे लघु उद्योग असून व्यापारासाठी हा जिल्हा एक महत्वपूर्ण मानला जातो. या जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे जहाज तोडण्याचे यार्ड आहे.व या जिल्ह्यातील खाद्यपदार्थांमध्ये ‘गंठिया’ आणि ‘जलेबी’ प्रसिद्ध आहे. 1948 पूर्वी भावनगर राज्य हे एक संस्थानिक राज्य होते. Top 28 places to visit in Bhavnagar District

तसेच या जिल्ह्यात ठक्कर बापा,कृष्ण कुमारसिंहजी भावसिंहजी,मुळशंकर भट्ट, नानाभाई भट्ट,नझीर देखैया असे अनेक सुधारणावादी, विचारवंत, समाजवादी, कवी, लेखक, कलाकार, आणि स्वातंत्र्यसैनिक निर्माण केले आहेत. भावनगर जिल्ह्यामध्ये जहाज तोडण्याचे उद्योग, डायमंड पॉलिशिंग,प्लास्टिक, मीठ,सागरी रसायने, डायमंड कटिंग, युनिट्स,आणि जहाज बांधणी हे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. मीठ उत्पादनामध्ये गुजरात राज्यातील हा जिल्हा एक नंबरवर आहे.

तसेच भावनगर हे कापूस उत्पादनाचे एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र आहे. या जिल्ह्यात एकूण दहा तालुके असून शेती उत्पादनामध्ये प्रामुख्याने या जिल्ह्यात कापूस, शेंगदाणे, ज्वारी, बाजरी, आणि डाळिंब ही पिके घेतली जातात. भावनगर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.

Top 28 places to visit in Bhavnagar District

भावनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे

1) Shree Takhteshwar Temple-

Top 28 places to visit in Bhavnagar District


श्री तख्तेश्वर मंदिर हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील तक्तेश्वर तरहेती रोडवर, डोंगरावर असलेले भगवान शिवाचे प्राचीन व धार्मिक मंदिर आहे. या संपूर्ण मंदिराची रचना 18 खांबावर आधारलेली असून हे मंदिर 1893 मध्ये महाराजा तख्तसिंहजी यांनी बांधले होते. या मंदिराच्या प्रांगणात नंदीची मूर्ती आहे. या मंदिराजवळ एक दरी व निसर्गरम्य परिसर आहे. आणि मंदिराकडे जाणारा मार्ग हा संगमरवरी पायऱ्यांवरून बांधलेला आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी भाविक तख्तेश्वराच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात येतात.

2) Palitana And Shatrunjaya Hill –


पालिताना हे भारतातील गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील जैन धर्मियांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी असलेल्या शत्रुंजय टेकडीवर जैन धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या व वेगवेगळ्या कालखंडात बांधलेली 900 हून अधिक मंदिरे आहेत. ही मंदिरे संगमरवरी दगडांमध्ये बांधलेली असून त्यावर अत्यंत सुंदर कोरीवकाम केलेले आहे. हे मंदिर 7288 फूट उंचीवर असून या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 3500 पायऱ्या चढून जावे लागते.शत्रुंजय डोंगराला जैन धर्मात ‘सिद्धक्षेत्र’ किंवा ‘सिद्धांचल’ म्हणून ओळखले जाते. व या ठिकाणी अनेक तीर्थंकरांना ज्ञानप्राप्ती झाली, असे सांगितले जाते.

तसेच शत्रुंजय डोंगरावर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव (आदिनाथ) यांचे मंदिर आहे. पालितानाला शहराला ‘मंदिरांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. तसेच या ठिकाणी कुमारपाल, मिलशाह आणि समप्रति राज हे काही प्रमुख मंदिरे आहेत. मात्र हे मंदिर ‘देवाला निवास’ मानले जाते, त्यामुळे येथे रात्री कोणालाही राहण्याची परवानगी नाही.कार्तिक पौर्णिमेच्या वेळी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. भावनगर पासून हे ठिकाण 51 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: allindiajourney.com

3) Nishkalank Mahadev Temple-


निश्कलंक महादेव मंदिर हे गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील कोलियाक गावातील समुद्रात एक किलोमीटर अंतरावर असलेले एक पवित्र हिंदू मंदिर आहे. हे भारतातील दुर्मिळ समुद्री मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील चौकोनी व्यासपीठावर 5 वेगवेगळे स्वयंभू शिवलिंग असून प्रत्येक शिवलिंग समोर नंदीची मूर्ती आहे. हे मंदिर समुद्रात भरती-ओहोटीच्या वेळी बुडते तेव्हा फक्त मंदिराचा ध्वज दिसतो आणि भरती-ओहोटी कमी प्रमाणात असेल त्यावेळी हे मंदिर दिसते. हे मंदिर त्यावेळी भरती-ओहोटीला तोंड देण्यासाठी किती सक्षम बांधले हे आत्ताच्या आधुनिक अभियंते आणि तंत्रज्ञान तज्ञांसाठी न उलगडलेले रहस्य आहे. भावनगर पासून हे मंदिर 24 किलोमीटर अंतरावर आहे.

4) Gandhi Smruti Museum-


गांधी स्मृती हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील महात्मा गांधींचे जिवंत स्मारक आहे. हे स्मारक भावनगर जिल्ह्याच्या मध्यावर असून या संकुलाचे उद्घाटन 1955 मध्ये झाले. या ठिकाणी महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे 144 दिवस घालवले होते. आणि 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या झाली. या संग्रहालयात गांधी चित्र गॅलरी, महात्मा गांधींच्या जीवनातील जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध घडामोडीसंबंधित पुस्तके, दुर्मिळ छायाचित्रे, प्राचीन गोष्टी आणि स्मृतीचिन्हे आहेत.

तसेच या ठिकाणी एक मोठे खादी ग्रामोद्योग भंडार आणि ग्रंथालय आहे. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

5) Blackbuck National Park –


वेळवदार काळवीट राष्ट्रीय उद्यान हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील 1976 मध्ये स्थापन झालेले एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान 34.52 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले असून या ठिकाणी काळवीटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्यांचे मोठमोठे कळप आहेत.या उद्यानाचे हे मुख्य वैशिष्ट्य आहे. पूर्वीच्या काळी राजा महाराजांना शिकार करण्यासाठी वापरले जाणारे हे उद्यान “विडी” होते. या उद्यानाचा परिसर हिरव्यागार गवतानी आणि खुरट्या झाडाझुडपांनी वेढलेला आहे.

तसेच या उद्यानात निळे बैल, लांडगे, कोल्हे, तरस, वाघ, सिंह याशिवाय अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी आणि आणि विविध प्रकारचे पक्षी ज्यामध्ये लेसर फ्लोरिकन, व्हाईट स्टॉर्क, हॅरियर्स, सरस क्रेन पाहायला मिळतात. व येथील उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात.वेळावदार काळवीट राष्ट्रीय उद्यान, हे भावनगर जिल्ह्यातील पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. भावनगर जिल्ह्यापासून हे उद्यान 42 किलोमीटर अंतरावर आहे.

6) Barton Library-


बार्टन लायब्ररी ही गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील महत्वाच्या वाचनालयातील सर्वात जुनी असलेली एक लायब्ररी आहे. भावनगर च्या मध्यावर असलेल्या या लायब्ररीची स्थापना 1982 मध्ये झाली असून ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या ही लायब्ररी खूप महत्त्वाची आहे. येथे इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेतील 61000 पेक्षा जास्त पुस्तके आहेत. व या लायब्ररीत पुरातत्व वस्तू, सागरी वस्तू, पुस्तके, नियतकालिके आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह व विविध कलाकृती पाहायला मिळतात. या ग्रंथालयाला इंग्रजी राजकीय एजंट कर्नल एलसी बार्टन यांच्या नावावरून नाव देण्यात आले आहे. ही लायब्ररी दीडशे वर्षे जुनी असून वाचन प्रेमी या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

7) Victoria Park-


व्हिक्टोरिया पार्क हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील भावनगर शहराच्या मध्यावर व गौरीशंकर तलावाजवळ असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे.या व्हिक्टोरिया पार्कची स्थापना 1888 मध्ये झालीअसून राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ या उद्यानाचे नाव देण्यात आले आहे. हे जंगल 500 एकर क्षेत्रावर पसरलेले असून या ठिकाणी विविध प्रजातींची झाडे,वेली, आणि पक्षी आढळतात.व कोल्हा आणि अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी पाहायला मिळतात.हे उद्यान विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचे घर असून पर्यटकांसाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी शांत व सुंदर ठिकाण आहे.

8) Nilambag Palace-


निलमबाग पॅलेस हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील भावनगर शहराच्या मध्यावर असलेला एक ऐतिहासिक व प्रसिद्ध राजवाडा आहे. हा पॅलेस 1859 मध्ये बांधला गेला होता आणि पूर्वी या ठिकाणी भावनगरच्या राजांचे वास्तव्य होते. आता हे ठिकाण एक हेरिटेज हॉटेल म्हणून ओळखले जाते. या पॅलेसची वास्तुकला अत्यंत सुंदर असून जर्मन वास्तुविशारद, सिम्सॉम यांनी ती डिझाइन केली होती. या पॅलेस मध्ये पर्यटकांसाठी 20 आरामदायी खोल्या,7 कॉटेज, उत्कृष्ट रेस्टॉरंट, लायब्ररी आणि इतर आधुनिक सुविधा असल्यामुळे शाही अनुभव मिळतो.

9)Alang Ship Breaking Yard-


अलंग शिप ब्रेकिंग यार्ड हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील अलंग शहराजवळ असलेले एक महत्त्वाचे ठिकाण आहे.1983 मध्ये कॅप्टन एन. सुंदरेसन यांनी या अलंग शिप रिसायकलिंग यार्डची स्थापना केली. हे जगातील सर्वात मोठे जहाज तोडण्याचे केंद्र असून या ठिकाणी जगभरातून वाचवलेल्या निवृत्त मालवाहू जहाजांची सेवा संपल्यावर, धातू आणि इतर उपयोगी वस्तूंच्या पुनर्वापरासाठी आणली जातात.

दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जहाजे तोडून त्यातील धातू आणि इतर उपयोगी वस्तूंचा पुनर्वापर केला जातो. ज्यामुळे पर्यावरणावर होणारा ताण कमी होतो. अलंग शिप ब्रेकिंग यार्ड हे एक सुरक्षित औद्योगिक क्षेत्र असून येथे भेट देण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते.

10)Jashonath Mahadev Mandir-


जासोनाथ महादेव मंदिर हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पानवाडी परिसरात असलेले एक प्राचीन व ऐतिहासिक शिव मंदिर आहे. हे मंदिर 1865 मध्ये स्वर्गीय महाराजा जसवंतसिंहजी यांनी बांधले होते. या मंदिर परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत.व हे मंदिर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिध्द असून, येथे प्रत्येक पूर्णिमेला भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.

11) Akshar wadi Temple –


अक्षरवाडी मंदिर हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील वाघवाडी रोडवर असलेले एक प्रसिद्ध धार्मिक मंदिर आहे. हे मंदिर BAPS या संस्थेने बांधले असून या मंदिराला BAPS श्री स्वामीनारायण अक्षरवाडी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाशी संबंधित असून मंदिराची वास्तू कला अत्यंत सुंदर आहे.व मंदिर परिसर शांततापूर्ण आहे. या मंदिरामध्ये विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळांच्या मूर्ती आणि टेराकोटा कलाकृती आहेत.तसेच हे मंदिर लंडन येथील स्वामीनारायण मंदिरासारखे असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या जवळपास गोपनाथ महादेव मंदिर,तखतेश्वर मंदिर,दादा साहेब जैन मंदिर आणि निश्कलंक महादेव मंदिर ही मंदिरे आहेत.

12) Dada Saheb Jain Temple –


दादा साहेब जैन मंदिर हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पानवाडी या ठिकाणी असलेले जैन समुदायाचे प्रसिद्ध जैन मंदिर आहे. या ठिकाणी जैन लोक प्राचीन काळापासून विविध व्यवसायांशी संबंधित राहत होते. त्यांनी भावनगर शहरात प्रार्थना करण्यासाठी अनेक जैन देरासर बांधले आहेत.दादासाहेब जैन मंदिर हे त्यापैकी एक आहे. या मंदिरात हेतू सर्व जिवाच्या कल्याणासाठी,सामाजिक, आध्यात्मिक आणि आरोग्य सेवांशी निगडित आहे.दादा साहेब जैन मंदिर हे भावनगर मधील पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

13) Gangajaliya –


गंगाजलिया हे भावनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे.गंगाजलिया या ठिकाणी भावनगरच्या राजघराण्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ 1983 मध्ये संगमरवरीमध्ये बांधलेले स्मारक आहे. हे एक सुंदर वास्तुशास्त्रीय स्मारक असून पूर्वी या ठिकाणाला गंगाजळीया टाकी म्हणून ओळखले जात होते. हे स्मारक गंगाजलिया तलावाच्या काठावर असून सध्या ते ‘गंगा डेरी’ म्हणून ओळखले जाते. हा तलाव परिसर निसर्गरम्य आणि शांत आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी पाहायला भेटतात त्यामुळे पक्षीनिरीक्षकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.गंगाजलिया हे भावनगर मधील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. भावनगर रेल्वे स्टेशन पासून हे ठिकाण एक किलोमीटर अंतरावर आहे.

14) Lock Gate-


कुलूप दरवाजा हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील ब्रिटीश काळात समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करण्यासाठी असलेले हे लॉक गेट आहे.या लॉक गेटमुळे समुद्राच्या पाण्याच्या आवक आणि बहिर्गमनचे नियमन करता येते. हे लॉक गेट म्हणजे त्या वेळच्या अभियांत्रिकीचा एक चमत्कारच आहे. हे लॉक गेट समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करते व गोड्या पाण्यामध्ये खारे पाणी मिक्स होऊन देत नाही. ब्रिटीश काळात बांधलेले लॉक गेट हे गुंतागुंतीचे सिस्टम असून भरती-ओहोटीच्या हालचालींचे व्यवस्थापन, प्रदेशाचे पर्यावरणीय संतुलन करते. जल व्यवस्थापनात हे अनोखी व महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

15)Gaurishankar Lake-


गौरीशंकर तलाव हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील एक सुंदर तलाव आहे. हा सार्वजनिक तलाव 1872 मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बांधला असून व्हिक्टोरिया पार्कच्या बाजूला आहे. या तलावाला ‘बोर तलाव’ म्हणूनही ओळखले जाते. या तलावाजवळ भाव विलास पॅलेस आहे. पूर्वी हा पॅलेस भावनगर राजघराण्याचे क्लबहाऊस होते. हा तलाव परिसर निसर्गरम्य आणि शांत आहे. व येथे बाजूलाच असलेल्या व्हीक्टोरिया पार्क मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी आहेत. या निसर्ग रम्य तलावावर पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

16)Piram Island-


पिराम बेट हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील अरबी समुद्रातील निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमीसांठी उल्लेखनीय ठिकाण आहे.हे बेट भावनगर जिल्ह्यातील घोघा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असून 186 एकर मध्ये पसरलेले आहे. व हे बेट एका खाजगी मालकाचे आहे. पिराम बेट हे समृद्ध पक्षीजीवनासाठी प्रसिद्ध असून या बेटावर विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यामुळे हे बेट पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते.या बेटावर जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ मानला जातो.

17) Sardar Baug-


सरदार बाग हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पाणवाडी परिसरात असलेले एक ऐतिहासिक व कलात्मक बाग आहे. ही लँडस्केप बाग Pill Garden
म्हणूनही ओळखली जाते. या बागेत हिरवेगार मैदान, रंगीत फुलं, शांत फव्वारे,कारंजे आणि एक ऐतिहासिक राजवाडा आहे. या बागेचा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच गर्दी असते.

18) Bhavani Temple Mahuva –


भवानी मंदिर हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील महुवा गावाजवळील आशिया समुद्राच्या किनारी उच्च टेकडीवर असलेले पवित्र धार्मिक तीर्थस्थळ आहे. हे भवानी मातेचे मंदिर 5000 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. व लोक या ठिकाणाला ‘भवानी बीच’ म्हणूनही ओळखतात. हा समुद्रकिनारा शांत आणि सुंदर म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण भवानी माता मंदिर आणि भवानी बीचसाठी प्रसिद्ध आहे. नवरात्री आणि गुढीपाडव्याला या ठिकाणी वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात त्यावेळी भक्ताची प्रचंड गर्दी येथे पाहायला मिळते.

19)Ghogha Beach-


घोघा बीच हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील घोघा शहराजवळील एक नयनरम्य बीच आहे. हा समुद्र किनारा निसर्ग संपन्न व शांत आहे.हा शांत समुद्रकिनारा निळसर पाण्याने वेढलेला असून पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही उंट आणि घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता. आणि ताज्या सी फूडचा आनंद घेऊ शकता. हा समुद्र किनाऱ्यावर शांततेत दिवस घालवण्यासाठी प्रवाशांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. या ऐतिहासिक व निसर्गरम्य बीचला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.

20) Shetrunji Dam –


शत्रुंजय धरण हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यामध्ये पालीताना तालुक्यात असलेले एक मोठे व महत्त्वाचे धरण आहे. हे धरण पालीताना शहराच्या जवळ असून शत्रुंजय नदीच्या काठी वसलेले आहे. तसेच या ठिकाणी जैन धर्मियांचे महत्वाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या धरणाचा उपयोग पिण्याचे पाणी व सिंचनासाठी केला जातो. या धरणाचे बांधकाम 1955 मध्ये सुरू होऊन 1965 मध्ये पूर्ण झाले. या धरणाची उंची सुमारे 32.02  मीटर आहे तर लांबी- 3.895 की. मी. एवढी आहे. या धरणामुळे 56,000 हेक्टेर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. व आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा होत आहे.

21) Bramha Kund-


ब्रह्मकुंड हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यात सिहोर शहरात असलेले एक पवित्र पायऱ्यांचे मंदिर कुंड आहे. हे कुंड जयसिंह सिद्धराजा यांनी बांधले असल्याचे सांगितले जाते. या कुंडातील पाणी चमत्कारिक समजले जाते कारण येथील पाण्यातून अंघोळ केल्यानंतर त्वचा रोग बरे होतात अशी लोकांची धारणा आहे. स्कंद पुराणात देखील या ब्रह्मकुंडाचा उल्लेख आढळतो. व मेरुतुंगाने लिहिलेल्या प्रबंध-चिंतामणीमध्ये या कुंडाचा उल्लेख केलेला आहे.

22) Malnath Shiv Temple –


मालनाथ शिव मंदिर हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील तळाजा रोडवर असलेले धार्मिक मंदिर आहे. हे पवित्र शिवमंदिर नदीच्या काठावर असून या मंदिराचा परिसर हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला आहे. या मंदिरात शिव,दुर्गा, गणेश, भगवान कृष्ण आणि भगवान हनुमान या देवतांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर गुजराती पारंपारिक वास्तुकलेनुसार बांधलेले असून या मंदिरात दगडात कोरलेले शिवलिंग आहे.मालनाथ शिव मंदिराचा परिसर धबधबे, हिरवळ आणि निसर्ग रम्य असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी फोटोग्राफीचा आनंद घेतात. तसेच या ठिकाणी आपल्याला पवनचक्की पहायला भेटतात. हे मंदिर भावनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे.

23)Trambak Falls-


त्रंबक धबधबा हा गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील एक निसर्गरम्य ठिकाणी,मलनाथ महादेव मंदिराजवळ असलेला प्रसिद्ध धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. यादव याचा परिसर अत्यंत निसर्ग संपन्न असून शांततापूर्ण वातावरणाने बहरलेला आहे. ट्रेकिंग प्रेमी आणि निसर्गप्रेमी चे हे आवडते ठिकाण आहे. भावनगर शहरापासून हा धबधबा 20 किलोमीटर अंतरावर आहे.

24)Bajrangdas Bapa Temple Bagdana-


बजरंगदास बाप्पा हे मंदिर गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील महुवा तालुक्यात बागडाणा गावी असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. बजरंगदास बाप्पा हे मूळचे राजस्थानचे होते.हे मंदिर 1977 मध्ये बांधले असून या ठिकाणी वानर भगवान चे मंदिर आहे.बागडाणा धाम मध्ये बाप्पा सीताराम यांचा आश्रम आहे.बागदाणा हे गाव संत बजरंगदास बापा सीताराम किंवा बागदाणा बापा सीताराम म्हणून ओळखले जाते. हे जगातील असे एकमेव मंदिर आश्रम आहे की या ठिकाणी 24 तास जेवण दिले जाते. या ठिकाणी भाविक कोणत्याही खर्चशिवाय शिवाय राहू शकतात.याशिवाय बजरंगदास बापांना समर्पित अनेक मंदिरे व आश्रम आहेत.

25)Hastagiri Jain Tirth –


हस्तगिरी जैन तीर्थ हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पालिताना जवळील प्रसिद्ध जैन मंदिर आहे. हे मंदिर शेत्रुंजय नदीजवळच्या टेकडीवर असून भगवान आदिश्वरांच्या काळातील एक पवित्र स्थान आणि शत्रुंजय पर्वताचे शिखर मानले जाते. हे पवित्र स्थान भगवान आदिश्वरांचे पुत्र भरत चक्रवती यांनी स्थापन केलेले आहे व या डोंगराळ भूमीला हस्तिसेंगिरी म्हणूनही ओळखले जाते.पालिताना मंदिरापासून हे मंदिर 16 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी 72 भव्य देवकुलिका, चार तोंडे असलेले, अष्टकोनी जैन मंदिर, तीन डोंगरी किल्ले आणि व्याख्यानगृह स्थापन करण्यात आले आहेत.हस्तगिरी जैन तीर्थ हे गुजरात राज्यातील पालितानामधील सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आहे.

26)Talaja Caves temple –


तळाजा लेणी ही गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील कवी नरसिंह मेहताचे जन्मस्थान असलेल्या तळाजा या ठिकाणी एक महत्वाचे पुरातत्व स्थळ आहे. या ठिकाणी बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माच्या लेण्या आहेत. या ठिकाणी 30 लेण्या असून त्यामध्ये 15 पाण्याच्या टाक्या आहेत. या लेण्या ‘एभल मंडप’ सारख्या वास्तू कलेत बांधलेल्या आहेत. या लेण्या रॉक-कट प्रकारच्या असून खडक कापून बनवलेले आहेत. येथील लेण्यांमध्ये बौद्ध धर्माचे उत्कृष्ट कोरीवकाम केलेले आहे. पर्यटक आणि इतिहास प्रेमी या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात. भावनगर पासून हे ठिकाण 50 किलोमीटर अंतरावर आहे.

27)Gopnath Bungalow-


गोपीनाथ बंगला हा गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील तळाजा तालुक्यात, कंभातच्या खाडीजवळ समुद्रकिनारी असलेले एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हा बंगला पूर्वी भावनगरच्या राजघराण्याचे समुद्रकिनारी असलेले निवासस्थान होते.येथे सुंदर पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा, खडकाळ किनारे आणि विविध प्रकारच्या असंख्य पक्षी पाहायला मिळतात.गोपनाथ बीच हे निसर्गरम्य व शांत ठिकाण असून येथे तुम्ही समुद्राच्या लाटा, पक्षी आणि निसर्गाच्या विविधतेचा आनंद घेऊ शकता. व येथील परिसरात गोपीनाथ मंदिर आहे. हे ठिकाण भावनगर पासून 75 किमी तर तळाजा पासून 22 किमी अंतरावर आहे.

28)Shri Vishal Jain Museum –


श्री विशाल जैन संग्रहालय हे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध संग्रहालय आहे. हे संग्रहालय जैन आचार्य विशालसेन सुरीजी यांच्या नावे असून येथे जैन धर्माशी संबंधित असंख्य कलाकृती, प्रतिमा, मूर्ती आणि ताम्रपत्र लेखन आहे. हे संग्रहालय जैन समाजासाठी अत्यंत आध्यात्मिक महत्त्व असलेले आहे. हे संग्रहालय शत्रुंजय पायऱ्यांच्या पायथ्यापासून 500 मीटर खाली आहे.

येथे जैन कलाकृतींचा संग्रह, पूर्वीच्या मंदिरांमधून उत्खनन केलेल्या मूर्ती आणि ताडाच्या पानांवर लिहिलेली प्राचीन हस्तलिखिते, 500 वर्षापूर्वीच्या कलाकृती आणि सुंदर हस्तिदंती व कोरीवकाम आहे. तसेच येथील तळघरात आरशाच्या भिंती आणि चार तीर्थंकरांच्या खूप वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रतिमा असलेले एक आश्चर्यकारक वर्तुळाकार मंदिर आहे. भावनगर पासून हे ठिकाण 51 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit the travel blog

1) भावनगर जिल्ह्यातील वेळवदार काळवीट राष्ट्रीय उद्यान कोणत्या साली स्थापन करण्यात आले?

भावनगर जिल्ह्यातील वेळवदार काळवीट राष्ट्रीय उद्यान 1976 साली स्थापन करण्यात आले .


2) भावनगर जिल्ह्यातील अलंग शिप ब्रेकिंग यार्ड कोणत्या शहराजवळ आहे?

भावनगर जिल्ह्यातील अलंग शिप ब्रेकिंग यार्ड अलंग शहराजवळ आहे.


3) भावनगर जिल्ह्यातील जासोनाथ महादेव मंदिर कोणत्या परिसरात आहे ?

भावनगर जिल्ह्यातील जासोनाथ महादेव मंदिर पानवाडी परिसरात आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top