Top 17 places visit to Ahilya Nagar/Ahmednagar – अहिल्यानगर /अहमदनगर मध्ये भेट देण्याची प्रमुख १७ ठिकाणे

17 places visit to Ahilya Nagar /Ahmednagar : अहमदनगरचा भुईकोट किल्ला हा एकेकाळचा अभेद्य किल्ला होता. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर राष्ट्रवादी लोकांनी येथे निवास केला होता आज येथील काही खोल्या संग्रहालयात रूपांतरित केले आहेत. 1944 मध्ये ब्रिटिशांनी नेहरूंना या किल्ल्यात कैदेत ठेवले होते. पंडित नेहरूंनी ‘द डिस्कवरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक याच ठिकाणी लिहिले.

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. आशिया खंडातील पहिला साखर कारखान्याची स्थापना प्रवरानगर मध्ये झाली होती. सर्वात जास्त साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत राहता तालुक्यातील शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर याच जिल्ह्यामध्ये आहे.

Top 17 places visit to Ahilya Nagar/Ahmednagar

अहिल्यानगर /अहमदनगर मध्ये भेट देण्याची प्रमुख १७ ठिकाणे

1)श्री सिद्धिविनायक सिद्धटेक

Top 17 places visit to Ahilya Nagar/Ahmednagar


अष्टविनायकापैकी एक असलेला Siddhivinayak Siddhtek हा तिसरा गणपती अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. हा सिद्धिविनायक स्वयंभू असून मूर्तीची उंची 3 फूट उंच व 2:5 फूट रुंद आहे. ही गजमुखी मूर्ती उत्तरेकडे तोंड करून आहे. उजवा सोंडेचा गणपती असल्यामुळे या गणपतीचे सोहळे खूप आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धीसिद्धीआहेत.मंदिराला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी एक किलोमीटर चालावे लागते.

ही गजमुखी मूर्ती उत्तरेकडे तोंड करून आहे. उजवा सोंडेचा गणपती असल्यामुळे या गणपतीचे सोहळे खूप आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. मंदिराला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी एक किलोमीटर चालावे लागते.Top 17 places visit to Ahilya Nagar /Ahmednagar


2)भंडारदरा धरण-


हे धरण भंडारदरा गावात असून अहिल्यानगर मधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या धरणाला विल्सन धरण असेही म्हणतात. या धरणाची लांबी 2717 मीटर म्हणजेच 8914 फूट इतकी आहे. 1926 साली हे धरण बांधले. Bhandardara Dam

हे धरण सर्वात जुने असून आकर्षक पर्यटन स्थळ आहे. धरणाच्या आजूबाजूचा परिसर हा घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. डोंगरकड्यातून येणारे पाणी धरणात मिळते.


3)रंधा धबधबा-


Randha waterfall हा धबधबा अहमदनगर मधील अकोला तालुक्यात आहे. दोनशे फूट दरीत कोसळणारा हा धबधबा प्रवरा नदीवर आहे. येथेच रतन गडातून प्रवरा नदी वाहते. पावसाळ्यात या धबधब्यावर प्रचंड गर्दी असते. या धबधब्याला लागूनच दुसरा काताळपूरचा धबधबा पण प्रेक्षणीय आहे.


4) कळसुबाई शिखर-

Kalsubai shikhar हे अहिल्या नगर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून याची उंची समुद्री सपाटीपासून1646 मीटर इतकी आहे. येथील कठीण कातळ असून त्यावर शिड्या लावल्या आहेत. Kalsubai Sikhar

ट्रेकिंग प्रेमी साठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तीन ते चार तासात तुम्ही कळसुबाई शिखर सर करू शकता. भंडारदरा धरणापासून हे शिखर साधारणपणे दहा किलोमीटर अंतरावर आहे

5) श्री अमृतेश्वर मंदिर


भंडारदर्‍यापासून जवळच असलेल्या रतनवाडी मध्ये हे Amruteshwar temple आहे. 1200वर्षांपूर्वीचे जुने असलेले हे मंदिर हेमाडपंथी आहे. शिव शंकराचे हे मंदिर जागृत देवस्थान आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या मंदिरातील शिवलिंग पूर्ण पाण्यात जाते. मंदिराच्या बाजूला जुन्या बांधणीतील एक विहीर आहे. या मंदिरात जाण्यासाठी रतनवाडीतील बोटीने प्रवास करावा लागतो.


6) श्री दत्त मंदिर-

देवगड येथील किशन गिरी महाराज यांनी स्थापन केलेले हे shri datta temple शनिशिंगणापूर पासून 41 किलोमीटर अंतरावर आहे.नेवासा पासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. स्वच्छता आणि शांततेसाठी हे मंदिर लोकप्रिय आहे. तीन मुखी दत्ताची मूर्ती असलेल्या या मंदिरात देहभान विसरून जाते. आषाढी एकादशीला या मंदिरातून पंढरपूरला पालखी जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक येथे दर्शनाला येतात.


7) श्री साईबाबा मंदिर शिर्डी-


राहता तालुक्यातील Shree saibaba temple हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व जाती धर्माचे लोक येथे दर्शनासाठी येत असतात. गुरुस्थान,द्वारकामाई साईबाबांनी प्रज्वलित केलेली धोनी आणि ते बसत असलेली शिळा अशा अनेक खुणा साईबाबांच्या वास्तव्याच्या शिर्डी मध्ये दिसतात. येथे दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आणि महाप्रसाद घेतात.

8) नेवासा-


अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा हे एक गाव आहे. याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो खांब आज ही आपणास पाहावयास मिळतो. या खांबाचे नित्यनेमाने रोज पूजा केली जाते.

तसेच समुद्रमंथनाच्या वेळी अमृत वाचवण्यासाठी भगवान विष्णू ने मोहिनी रूप घेतले होते त्या मोहिनी रूप विष्णूचे स्त्री वेशातील एकमेव मंदिर या नेवासे गावी आहे. या मंदिरात प्रत्येक वर्षी तीन वेळा यात्रा भरतात.

9) चांदबिबी महल –


अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदबिबी मकबरा हा तीन मजली असून अष्टकोनी आहे. अहमदनगर पासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर हा मकबरा आहे. चांदबिबी ही विजापूरची राणी होती. स्थानिक लोकांनी त्यांच्या शौर्याचा सन्मान करून चांद बीबी हे नाव ठेवले ही इमारत 70 फूट उंच असून गॅलरी वीस फूट रुंद आहे.



10) शनिशिंगणापूर-


अहमदनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले नेवासा तालुक्यातील सोनाई गावापासून थोड्या अंतरावर शनिशिंगणापूर हे तीर्थस्थान आहे. येथे शनि देवांची स्वयंभू पाषाणातील मूर्ती आहे. आणि येथील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या गावातील दरवाजांना कुलूप लावले जात नाही. शनि देवांचे एवढे महात्म्य आहे की इथे कधीही चोरी होत नाही.

This image has an empty alt attribute; its file name is shani-3-1-1024x597.png

11) अहमदनगर किल्ला-


हा किल्ला इसवी सन 1490 मध्ये अहमद निजाम शहा ने बांधला. पुढील काळात म्हणजे मराठ्यांच्या आणि इंग्रजांच्या काळात हा किल्ला खूप महत्वपूर्ण ठरला.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी “डिस्कवरी ऑफ इंडिया” हे पुस्तक इथेच लिहिले. हा किल्ला आजही मजबूत अवस्थेत आहे. आणि गडप्रेमींसाठी आकर्षक ठिकाण आहे.

12) रेहकुरी काळवीट अभयारण्य-


हे भारतातील काही मोजक्या अभयारण्यातील एक आहे. येथील अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि काळविटाच्या दुर्मिळ जाती पहावयास मिळतात. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. अहिल्यानगर मधील या अभयारण्याला अवश्य भेट द्या.

13) हरिश्चंद्रगड-


हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून या गडाची उंची 4000 फूट इतकी आहे. हरिश्चंद्र गडाचा इतिहास हा साडेतीन हजार वर्ष जुना सांगितला जातो. हरिचंद्र गडावर प्राचीन लेणे आहेत. हरिश्चंद्रगडावर शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे.

या मंदिरामध्ये काही गुफा आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या उत्तरेकडे केदारेश्वराचे गुफा मंदिर आहे. येथे पाच फूट उंच शिवलिंग असून शिवलिंग पर्यंत जाण्यासाठी कमरेपर्यंत थंडगार पाण्यातून जावे लागते. लिंगा भोवती चार खांब चार खांब असून तीन खांब तुटलेल्या अवस्थेत आहेत. एकच खांब शाबूत आहे.

असे म्हटले जाते की हा खांब तुटला तर कली युगाचा अंत होईल. आणि संपूर्ण सृष्टी नष्ट पावेल. हरिश्चंद्रगडावरील आकर्षण म्हणजे कोकणकडा हा कडा 3000 फूट उंच असून बाहेरून गोलाकार आकाराचा आहे.

14) सांदन व्हॅली-

Please visit our website:Allindiajourney.com


अहमदनगर जिल्ह्यातील सांदण व्हॅली हे एक महत्त्वाचे प्रेक्षणीय ठिकाण आहेया सांदण व्हॅली ला सावल्यांची व्हॅली असे म्हटले जाते.
अहमदनगर जिल्ह्यातील सांदन या गावातून दोन किलोमीटर नागमोडी वळण घेत जानारी व्हॅली म्हणजे सांदण व्हॅली होय. पावसाळा सोडला तर बाकी वर्षभर जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे भेट देतात. सांदण व्हॅली ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची दरी आहे. ही दरी 200 ते 400 फूट खोल असून चार किलोमीटर पर्यंत लांबवर पसरली आहे.

15)आनंद धाम-


हे एक जैन पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे आनंद ऋषी चे विश्राम स्थान होते. 1992 साली आनंद ऋषींच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ हे ठिकाण बांधले गेले. या ठिकाणी पर्यटक जैन आणि हिंदी धर्माची पुस्तके पाहू शकतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे भेट देतात.हे स्मारक कमळाच्या आकाराचे आहे.

आनंद ऋषीच्या समाधीच्या मागे ग्रंथालय व सह संग्रहालय आहे. सर्व पर्यटकांसाठी ते नेहमी खुले असते. आनंद ऋषीच्या अनेक वैयक्तिक व मौल्यवान वस्तू तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तके या संग्रहालयात आहेत. हे संग्रहालय समाधी सारखेच भेट देण्याचे पवित्र स्थान आहे.

16)रतनगड किल्ला-


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सामुद्र या गावाजवळ रतनगड किल्ला आहे. हा जिल्हा ठाणे जिल्ह्याचा सीमेवर असून सह्याद्री पर्वतामध्ये येतो. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4300 फूट आहे
पुण्यापासून रतनगड चे अंतर 183 किलोमीटर आहे. रतनगड किल्ला जवळ अनेक पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. किल्ल्याच्या उत्तर बाजूला आपल्या हाताच्या अंगठ्यासारखे जे शिखर दिसते त्याला रतनगड खुट्टा असे म्हणतात.

17)आर्थर लेक –


आर्थर तलाव हा अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा गावाजवळ प्रवरा नदीवर बांधलेल्या विल्सन धरणाने हा तलाव तयार झालेला आहे. या तलावाला भंडारदरा तलाव किंवा आर्थर तलाव असेही म्हणतात.

या धरणावर सिंचन प्रकल्प आणि जलविद्युत केंद्र उभारले आहेत. पर्यटकांसाठी हे एक विशेष आकर्षक ठिकाण आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या.

1)आनंद धाम हे कोणत्या साली बांधले ?

आनंद धाम हे १९९२ साली बांधले.

2)हरिश्चंद्र गडाची उंची किती आहे ?

हरिश्चंद्र गडाची उंची 4000 फूट आहे.

3)आर्थर तलाव कोणत्या धरणाने तयार झाला आहे?

आर्थर तलाव विल्सन धरणाने तयार झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top