वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-Top 20 places to visit in Washim District

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे वाशिम जिल्हा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. अकोला जिल्ह्याचे विभाजन करून एक जुलै 1998 रोजी वाशिम जिल्ह्याची स्थापना करण्यात आली.वाशीम जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ‘वत्सगुल्म’ असे होते. वाशिम जिल्ह्याला अकोला,अमरावती, हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या असून वाशिम जिल्ह्यात 6 तालुके आहेत. तसेच या जिल्ह्यातून पैनगंगा, काटेपूर्णा, मानोरा,अरुणावती, कास आणि आरण या महत्वाच्या नद्या वाहतात. या जिल्ह्यात आंध व गौंड याआदिवासी जमाती आढळून येतात.Top 20 places to visit in Washim District

तसेच वाशिम हे पूर्वी वाकाटक राजाची राजधानी व वत्स ऋषीची तपोभूमी होती. व या जिल्ह्यात निजामाची एक टाकसाळ (नाणी पाडण्याची जागा) होती. येथे नाणी पाडली जात असत. या जिल्ह्यातील प्रमुख पिकामध्ये तूर, कापूस,ऊस,हळद,सोयाबीन, गहू, ज्वारी व बाजरी इ. पिकांचा समावेश होतो. तसेच या जिल्ह्यात खूप प्राचीन काळापासून हातमागावर कापड विणले जाते. या जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात चरख्यावर सूत कातून खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय केला जातो.

याशिवाय या जिल्ह्यात लाकडी खेळणी, कातडी वस्तू, नायलॉन दोरी तयार करणे, रेशीम निर्मिती, गॅस सिलेंडर भरण्याचा प्रकल्प, रासायनिक खताचा प्रकल्प इ. व्यवसाय केले जातात. वाशिम जिल्ह्यात अनेक तलाव धरणे, किल्ले, अभयारण्य आहेत. या जिल्ह्यात ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत.

Table of Contents

Top 20 places to visit in Washim District

वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1)श्री बालाजी मंदिर-

Top 20 places to visit in Washim District


Balaji Temple हे वाशिम जिल्ह्यातील एक प्राचीन व महत्त्वाचे मंदिर आहे. कारंजा शहरातील सुभेदार भवानी कला यांनी हे मंदिर बांधले. या मंदिरातील बालाजी ची मूर्ती काळ्या पाषाणातील असून ते रत्नजडित अलंकारानी सजवलेली आहे. तसेच येथील मंदिराच्या प्रवेशद्वार आणि खांबावर जे शिलालेख आहेत त्यामध्ये मंदिराचे वर्ष ‘1700 शक’ असा उल्लेख केलेला आहे. तसेच या मंदिराच्या दोन्ही बाजूला मंदिरे आहेत त्यापैकी एक वेंकटेश्वर आणि दुसरे रामचंद्राचे मंदिर आहे. या मंदिराच्या समोर एक पाण्याचे दगडी टाके असून ते बांधण्यासाठी बारा वर्षे लागली असे शिलालेखात नमूद केले आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्यावेळी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.

2) पोहरादेवी मंदिर-


Pohradevi Temple महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील एक धार्मिक, जागृत व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी संत सेवालाल महाराज आणि पोहरादेवी मातेचे मंदिर आहे.संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे एक महत्वाचे व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक गुरु होते. ते बंजारा समाजाचे समाजसुधारक होते. येथील मंदिर परिसर अत्यंत निसर्ग संपन्न आहे. पोहरादेवी ही बंजारा समाजाची कुलदेवता असून ती काशी म्हणून ओळखले जाते.

या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचा भव्य पुतळा आणि सेवा ध्वज आहे. दरवर्षी रामनवमीच्या वेळी भरणारी पोहरादेवीची यात्रा देशभर प्रसिद्ध असून यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनाला येतात. तसेच पोहरादेवी मंदिर परिसरात बिरोबा, खंडोबा,महामाता यांची मंदिरे आहेत. वाशिम शहरापासून हे ठिकाण 51 किलोमीटर अंतरावर आहे.

3) अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर-


Antariksh Parshavnath Jain Temple हे वाशिम जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी असलेले एक अत्यंत पूजनीय जैन तीर्थस्थळ आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पार्श्वनाथाची मूर्ती हवेत तरंगती आहे जी जमिनीला स्पर्श करत नाही. त्यामुळे हे ठिकाण जगप्रसिद्ध असून या ठिकाणाला अंतरिक्ष पार्श्वनाथ म्हणून ओळखले जाते. या मंदिराची स्थापत्यकाल सुंदर व आकर्षक आहे.जैन धर्मातील तप, अहिंसा आणि साधनेचे महत्त्व या मंदिरात प्रकर्षाने दिसून येते.

या मंदिरातील प्रमुख देव पार्श्वनाथ भगवान हे जैन धर्मातील 23 वे तीर्थंकर आहेत. तसेच महावीर जयंती, पार्श्वनाथ जयंती आणि दशलक्षण पर्वाच्या काळात या ठिकाणी उत्सव साजरे केले जातात त्यावेळी जैन धर्माचे भाविक मोठ्या संख्येनेया मंदिराला भेट देतात. या मंदिर परिसरात पार्श्वनाथ मंदिर,ध्यानगृह हे मंदिरे आहेत.

4) हजरत बाबाजान दरगाह –


Hajrat Babajan Darga हा दर्गा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील त-हाळा या ठिकाणी असलेला प्रसिद्ध आणि धार्मिक दर्गा आहे. या ठिकाणी हजरत बाबाजान यांची समाधी असून हजरत शेर आगा जान यांची देखील समाधी आहे. या दर्ग्याच्या परिसरात सुंदर बाग आणि प्राणी आहेत.हजरत बाबाजान यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची रांग लागलेली असते. हे एक धार्मिक ठिकाण असून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वाशिम शहरापासून हा दर्गा 40 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit our website: allindiajourney.com

5) गुरुदत्त महाराज मंदिर कारंजा-


Gurudatta Maharaj Temple हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा या ठिकाणी असलेले पवित्र व धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्री दत्तावताराचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या सर्व बालपण या ठिकाणीच गेले.श्री नृसिंह महाराजांनी अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार केला. या ठिकाणी गुरुदत्त महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या श्रद्धा-भावनेने साजरा केला जातो.

तसेच सध्या येथील गुरुदत्त संस्थान द्वारे सामाजिक कार्य, धार्मिक विधी, साहित्यिक सभा आणि अनाथ वृद्ध आश्रम, न्याहारी इ. सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. अकोला रेल्वे स्टेशन पासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.

6) शृंगी ऋषी मंदिर-


Shrungi Rushi Temple हे वाशिम जिल्ह्यातील पुसेद तालुक्यातील अनसिंग गावी असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलित बांधलेले असून शृंगी ऋषीचे तपोभूमी म्हणून ओळखले जाते. या ऋषींनी दशरथ राजासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता त्यातूनच दशरथ राजांना चार पुत्र झाले होते असे सांगितले जाते. हा मंदिर परिसर निसर्गरम्य असून या ठिकाणी प्राचीन विहीर, गोमुखातील काठी आणि तलाव आहे. तसेच पावसाळ्यात येथे धबधबे पाहायला मिळतात. कार्तिक महिन्यात या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. या मंदिरात शृंगऋषींची प्रतिमा असून समोर महादेवाची पिंड व शेजारी दगडी नंदी आहे.

7)  काण्णव बंगला


Kannav Banglow हे वाशिम जिल्ह्यातील कारण झाला या ठिकाणी असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. 1903 मध्ये काण्णव नावाच्या व्यापाऱ्याने हा बंगला परदेशी वास्तुविशारदच्या देखरेखेखाली बांधला. या बंगल्याची रचना श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्यासारखी आहे, असे सांगितले जाते. हा बंगला कारंजा लाड शहरात, दिल्ली, दारव्हा, मंगरूळ आणि पोहा या चार वेशींच्याजवळ आहे. वाशिम जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात. वाशिम शहरापासून हा बंगला 70 किलोमीटर अंतरावर आहे.

8) ऋषी तलाव-


Rushi Lake हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या शहरात मध्यावर असलेला एक ऐतिहासिक आणि धार्मिक तलाव आहे.असे सांगितले जाते की श्री करंज ऋषी यांनी या ऋषी तलावाची निर्मिती केली आहे. पूर्वी या ठिकाणी अनेक ऋषी तपस्या करत असत त्यामुळे या गावाला ऋषिवट असेही म्हटले जात होते. या तलावाजवळ श्री क्षेत्र नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मस्थान आहे. तसेच कारंजा शहरात अनेक तलाव असल्यामुळे या शहराला तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते.कारंजा लाड शहरात अनेक तलाव असल्यामुळे या ठिकाणी पूर्वी सैन्यांचे तळ पडायचे. पर्यटकांसाठी ऋषी तलावामध्ये बोटिंगची सुविधा आहे.

9) कारंजा‑सोहोल वन्यजीव अभयारण्य-


Karanja ‑Sohol wildlife sanctuary हे महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील काळवीटांच्या संख्येचे जतन करण्यासाठी आणि या प्रदेशातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी इ. स. 2000 मध्ये या अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे. कारंजा शहरात असलेले हे उष्णकटिबंधीय अभयारण्य 1,832 हेक्टरवर असून या अभयारण्यातुन आदाण नदी वाहते. त्यामुळे या अभयारण्याचा परिसर निसर्गरम्य आहे. तसेच या अभयारण्याचा परिसर गवताळ असून या ठिकाणी प्रामुख्याने बेहडा, काटसावर, मोहा, कळंब, खैर, पळस हे वृक्ष जास्त प्रमाणात आढळतात.

तसेच या अभयारण्यात विविध प्रकारचे पक्षी आणि वन्यजीव प्राण्यांमध्ये काळवीट , चिंकारा,लांडगा, इंडियन फॉक्स नीलगाय, रानडुकर, कोल्हा, रानमांजर व 145+ पक्षांच्या प्रजाती,आणि इतर अनेक वन्यजीव प्रजाती आढळतात. वाशिम शहरापासून हे अभयारण्य सात किलोमीटर अंतरावर आहे.

10) जगदंबा मंदिर नांगरतास-


Jagdamba Mata Temple हे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नागरतास या ठिकाणचे प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. हे मंदिर चारशे वर्षांपूर्वीचे असून श्री जगदंबा मातेवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. येथील मंदिर परिसर शांत व भक्तीने वातावरणाने बहरलेला आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे राज्यातून अनेक ठिकाणाहून भाविक येथे दर्शनासाठी येतात.

11) पद्मतीर्थ-


Padmatirth हे वाशिम जिल्ह्यातील भगवान विष्णू ने निर्माण केलेले एक प्राचीन व पवित्र शिव तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की वासुकी ऋषींनी प्रथम स्नान केल्यामुळे हे ठिकाण ‘वासुकी नगर’ म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी एक पाण्याचे मोठे कुंड आहे. तसेच या ठिकाणी बालाजी मंदिर व श्री गुरुदत्त मंदिर आहे, त्यामुळे या धार्मिक स्थळाचे महत्व अधिक आहे. या ठिकाणचे बालाजी मंदिर 1779 मध्ये बांधण्यात आले. वाशिम शहराच्या पूर्व बाजूला पद्मतीर्थ हे ठिकाण दोन किलोमीटर अंतरावर आहे.


12) चामुंडा देवी मंदिर-


Chamunda Devi Temple हे वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर वाशिम शहराचे ग्रामदैवत असून राज्यातील अनेक भागाचे कुलदैवत आहे. वाशीम जिल्ह्याचे प्राचीन नाव “वत्सगुल्म” होते. पुराण कथेनुसार चामुंडा देवीने चंड-मुण्ड या राक्षसांचा वध या ठिकाणी केल्याचा सांगितले जाते. या मंदिरात दहा फूट खोलीत चामुंडा मातेची स्वयंभू मूर्ती आहे.पुरातत्त्व उत्खननात मंदिर परिसरातून तीन मूर्ती मिळाल्या होत्या ज्यामध्ये चामुंडा देवी, बालाजी व नालसाहेब.

याशिवाय 400 वर्षांपूर्वी वानखेडे कुटुंबाने तुळजापूरहून या मूर्तींची स्थापना केल्याचे सांगितले जाते.कार्तिक महिन्यात सूर्योदयानंतर देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात हे आजही आपल्याला पाहायला मिळते. नवरात्रीमध्ये या ठिकाणी देवीची मोठी यात्रा भरते.वाशिम रेल्वे स्थानकापासून हे ठिकाणे किलोमीटर अंतरावर आहे.

13) पिंगलाक्षी देवी मंदिर-

Pinglakshi Devi Temple हे वाशिम जिल्ह्यातील वनसंपदेने बहरलेल्या रिसोड या ठिकाणी असलेले एक जागृत देवस्थान आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीत केलेले असून मंदिराजवळ एक तलाव आहे तो तलाव पिंगलाक्षी तलाव म्हणून ओळखला जातो. नवरात्रीच्या काळात या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात.

14) मध्यमेश्वर मंदिर-


Madhyameshwar Temple हे वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र व प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम वाकाटक काळात झालेले आहे.असे सांगितले जाते की हे मंदिर लंकेपासून मेरू पर्वतापर्यंत असलेल्या जगाच्या मध्यरेषेवर आहे. तसेच पूर्वीच्या काळातील लोकांना ग्रह, तारे याचे ज्ञान व्हावे याकरिता येथे वेधशाळा सुरू करण्यात आली होती. आणि या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून मध्यमेश्‍वर मंदिर निर्माण करण्यात आले.

मध्यमेश्‍वर मंदिराबद्दल वत्सगुल्म माहात्म्य या ग्रंथात असा उल्लेख करण्यात आला आहे की चामुंडा तीर्थाच्या उत्तरेस मध्यरेखा दर्शविणारे मध्यमेश्‍वर नावाचे लिंग आहे. पूर्वी या ठिकाणी एक वेधशाळा होती. तेव्हा तेथे ऋषी-मुनी ग्रह-तार्‍यांचा अभ्यास करीत होते. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

15) संत अमरदास बाबा मंदिर-


Amardas maharaj मंदिर हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड या ठिकाणी असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे.रिसोड म्हणजे ऋषीवट नगरी हे ठिकाण रिसोडवासियांचं ग्रामदैवत असून हे ठिकाण अनेक साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. या भूमीत अनेक साधूसंत ऋषीमुनींनी जप-तप, अनुष्ठान आणि समाजसेवा केली आहे. 21व्या शतकात शिवस्वरुप संत शिरोमणी अमरदास बाबा यांच्या पदस्पर्शाने ही भूमी मंगलमय झाली.अमरदास बाबा हे कुठून आले त्यांच्या कुटुंब कोणता याबद्दल कोणतेही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्यामुळेच रिसोडवासियांचा उद्धार झाला असे इथल्या स्थानिकांची भावना आहे.

अमरदास बाबांना योगी आणि शिवस्वरूप मानलं जात असून त्यांनी या ठिकाणी 50 वर्ष निरंतर साधना केली आहे. 1958 मध्ये त्यांचे भव्य मंदिर बांधण्यात आले.या मंदिरात दररोज अन्नदान केले जाते. बाबांच्या या मंदिराजवळ हेमाडपंती सिद्धेश्वर मंदिर, द्रोपदी कुंड आणि त्रिवेणी संगम आहे. व या ठिकाणी एक गंगा उद्यान तयार करण्यात आले आहे. महाशिवरात्रीला येथे 15 दिवसाची मोठी यात्रा भरते त्यावेळी विदर्भातूनच नाही, तर संपूर्ण भारतातून लाखोंच्या संख्येत भाविक रिसोड मध्ये येतात. सामान्य भक्तांच्या हाकेला बाबा धावून जातात अशी बाबांची ख्याती आहे.

16) संत बिरबलनाथ महाराज मंदिर-


Sant Birbalnath Maharaj Mandir हे वाशिम जिल्ह्यातीलमंगरुळपीर शहराचे ग्रामदैवत आहे. तसेच बिरबलनाथ महाराजांच्या नावाने या शहराला ‘मंगरुळनाथ’ म्हणूनही ओळखले जाते. बिरबलनाथ महाराज हे अनेक महान संताच्या सहवासात राहिले होते त्यांनी आपल संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी खर्च केल. 1850 मध्ये बिरबलनाथ महाराज येथे आल्याचे सांगितले जाते. तेव्हा त्यांचे वय पंधरा ते सोळा वर्षाचे होते.

महाराज या ठिकाणी जेव्हा धुनी पेटवत असत तेव्हा तिथे पाऊस पडत नसे असे सांगितले जाते. तसेच बाबांच्या सांगण्यावरूनच या ठिकाणी लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधण्यात आले आहे.व दादा हयात कलंदर यांचा दर्गा आहे.1929 पासून माघ महिन्यातील पौर्णिमेला बिरबलनाथ महाराजांचे यात्रा या ठिकाणी अवीरतपणे भरत आहे.

17) हिवरा गणपती मंदिर-


Hivra Ganesh Temple हे वाशिम जिल्ह्यातील हिवरा गावातील एक जागृत देवस्थान आहे. या गणपती मंदिराची स्थापना जवळपास 107 वर्षांपूर्वी करण्यात आली. या मंदिरात बाप्पाच्या मूर्तीच्या बाजूला पार्वती मातेची ही मूर्ती आहे. त्यामुळे हे मंदिर एक अनोखे आहे.हा गणपती बाप्पा नवसाला पावणार आहे त्यामुळे दूर दूर वरून लोक येथे नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी येत असतात.

दर चतुर्थीला या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. गणेशोत्सवामध्ये या ठिकाणी भजन, कीर्तन व विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम केले जातात. वाशिम पासून हे ठिकाण वीस किलोमीटर अंतरावर आहे.

18) श्री सिद्धेश्वर मंदिर-


Shree Siddheshwar Temple हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे असलेले अति प्राचीन स्वयंभू शिव मंदिर आहे. या मंदिर परिसरात एक तलाव आहे. या मंदिराच्या गर्भगृहात स्वयंभू शिवपिंड आहे. या संपूर्ण मंदिराच्या भिंतीवर पायापासून ते कळसापर्यंत अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे. त्यामध्ये विविध प्राणी,देवदेवतांच्या मुर्त्या यांचा समावेश आहे. पूर्वी या मंदिरासमोर कारंजे होते. या निसर्गरम्य परिसरात असलेल्या मंदिराला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.

19)अडाण धरण –


Adan Dam हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात असलेले व अडाण नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे. या धरणाची उंची 30.13 मीटर असून लांबी 755 मीटर एवढी आहे. तसेच या धरणाचे पाणी साठवण क्षमता 1428 किमी एवढी आहे. या धरणातुन कारंजा शहराला आणि जवळपासच्या 25 गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच शेतीच्या सिंचनासाठी ही या धरणाचा उपयोग केला जातो. धरणाची पाणी पातळी वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग केला जातो. वाशिम जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचे जलस्त्रोत आहे.

20) दोन मजली विहीर कारंजा लाड-

Two-Story Well ही वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी दोनशे वर्षापेक्षा जास्त पुरातन असलेली विहीर आहे. ही प्राचीन विहीर श्री दिलीप काका मिश्री कोटकर यांच्या शेतात असून विहिरीमध्ये चक्क धर्मशाळा आहे. या धर्मशाळेतील खोल्या आजही चांगल्या सुस्थितीत आहेत. या विहिरीत छान कमानी व कोणाडे बांधलेले आहेत. या दुर्मिळ विहिरीचे बांधकाम अप्रतिम व अविश्वसनीय आहे. त्यामुळे ही सुंदर विहीर एकदा तरी पाहिलीच पाहिजे.

Visit the travel blog

1) वाशिम जिल्ह्यातील दोन मजली विहीर कोणत्या ठिकाणी आहे?

वाशिम जिल्ह्यातील दोन मजली विहीर कारंजा लाड या ठिकाणी दोनशे वर्षापेक्षा जास्त पुरातन असलेली विहीर आहे.

2)वाशिम जिल्ह्यातील हिवरा गणपती मंदिर कधी बांधण्यात आले?

वाशिम जिल्ह्यातील हिवरा गणपती मंदिर हे 107 वर्षांपूर्वी बांधण्यात आले.

3) वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण हे अडाण नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top