सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे- Top 28 places visit to in Sindhudurg District

मंडळी भारत भ्रमंतीमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील कोकण विभागातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रशासकीय जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी असे होते.1981 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ही नयनरम्य भूमी आहे.तसेच या जिल्ह्यात प्रामुख्याने मालवणी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते.Top 28 places visit to in Sindhudurg District

या जिल्ह्यात प्रमुख पिके भात , नारळ , कोकम , आंबा आणि काजू आहेत व या जिल्ह्यात मुख्यत्वे पर्यटन, मासेमारी, हे प्रमुख व्यवसाय केले जातात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 38 किल्ले असून हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे गिरीदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. 1999 मध्ये भारतातील पहिला पर्यटन क्षेत्र म्हणून या जिल्ह्याला नामांतरण मिळाले.या जिल्ह्यात आठ तालुके असून या जिल्ह्यातून कर्ली, गडनदी, तेरेखोल, आचरा, तिल्लीरी, देवगड, हिरण्यकेशी या नद्या वाहतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभल्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मासेमारी होती.आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट ही या जिल्ह्यातील महत्त्वाची मासेमारीची बंदरे आहेत. या जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून कोल्हापूर, कर्नाटक, गोवा, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. या जिल्ह्यात लोह,बॉक्साइट, मॅंगनीज, अभ्रक ही खनिजे सापडतात.या जिल्ह्यात धार्मिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात आहे.

Table of Contents

Top 28 places visit to in Sindhudurg District

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे-

1) सावंतवाडी राजवाडा –

Top 28 places visit to in Sindhudurg District


Sawantvadi Palace हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. हा राजवाडा 1755 ते 1803 या काळामध्ये खेम सावंत भोसले संस्थानाने बांधला आहे. जांबा दगडाचा बांधलेला हा राजवाडा सध्या तीन भागात विभागला असून त्यामध्ये आत्ताच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण, राज दरबार आणि म्युझियम असे भाग आहेत.

या राजवाड्यात सुंदर संग्रहालय असून राजघराण्यातील लोकांच्या वापरातील वस्तू, इतर सांस्कृतिक वारसा, शस्त्रे, शिल्प-संग्रह याशिवाय माडाची झाडे, खेळता सूर्यप्रकाश असलेले इथले मनमोकळे वातावरण मनाला प्रसन्न करते. तसेच या राजवाड्यातील दरबार हॉल अतिशय भव्य आणि देखणा असून इथली झुंबरे, लाकडी कोरीवकाम,राजचिन्हे, शासकांच्या प्रतिमा, सिंहासन पाहण्यासारखे आहे.

2) आत्मेश्वर मंदिर-


Atmeshwar Temple हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या ठिकाणी असलेले भगवान शिवाचे प्राचीन व ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरात दोन शिवलिंगाची पूजा केली जाते त्यामुळे ते अद्वितीय समजले जाते.तसेच या ठिकाणी एक अनोखा जलकुंभ आहे या जल कुंभातील स्फटिकासारखे स्वच्छ पाणी बारा महिने जमिनीच्या पातळीपासून 4 फूट उंचीवरून वाहते.सावंतवाडी आणि तेथील नागरिकांवर या देवाची कृपा आहे. अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.सावंतवाडी बस स्थानकापासून हे मंदिर दहा मिनिटाच्या अंतरावर आहे.

3) यशवंत गड-


Yashwantgad Fort हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील रेडी गावात आहे. या किल्ल्याच्या भोवताली मोठ्या प्रमाणात झाडे असून हा किल्ला रेडीचा किल्ला या नावाने ही ओळखला जातो.हा किल्ला मराठा साम्राज्यातील कान्होजी आंग्रे यांच्यासाठी बांधलेला व समुद्रकिनारी असलेला हा एक महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला जांभा दगडात बांधलेला असून सध्या किल्ल्याचे अवशेष शिल्लक आहेत.

तसेच या किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. या किल्ल्याच्या जवळपास रेडी समुद्रकिनारा आणि स्वयंभू गणपती मंदिर ही ठिकाणी आहेत. सावंतवाडी पासून हा किल्ला 32 किलोमीटर अंतरावर आहे.

4) मोती तलाव-


Moti Lake हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहराच्या मध्यभागी व सावंतवाडीची शान असलेला सुंदर तलाव आहे. हा तलाव राजवाड्यासमोर 1874 मध्ये बांधण्यात आला. हा तलाव 31 एकर परिसरात पसरलेला असून तलावाचे दगडामध्ये केलेले बांधकाम मजबूत व भक्कम आहे. पूर्वी कधी या तलावात मोती सापडले होते म्हणून या तलावाला “मोती तलाव’ नाव पडले आहे.

या तलावात कारंजे व संपूर्ण तलावाच्या कडेला विद्युत रोषणाई केलेली आहे.संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात या तलावाचे सौंदर्य खुलून दिसते.व या तलावामध्ये फिरण्यासाठी पेडल- बोटीची सुविधा आहे. हा तलाव म्हणजे सावंतवाडी शहराची शान आहे.

5) धामापूर तलाव-


Dhamapur Lake हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर गावामध्ये असलेले ऐतिहासिक आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे.धामापूर गावात अनेक नारळ आणि पोफळीच्या बागा आहेत. नागेशराव देसाई यांनी 1530 मध्ये हा मानवनिर्मित तलाव बांधला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा सर्वात मोठा तलाव असून या तलावाच्या सभोवतालचे नैसर्गिक आणि शांत वातावरण मन प्रसन्न करते. तसेच तलावात फिरण्यासाठी बोटिंग ची सुविधाही आहे. हा तलाव म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुने मातीचे धरण आहे.

या तलावाला जागतिक वारसा सिंचन स्थळ म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच या तलाव परिसरात भगवती देवीचे मंदिर,प्राचीन दगड आणि सतीचे दगड आहेत. या तलावातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जात असून तलावाबद्दल स्थानिक लोकांमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत. तसेच या तलावाच्या ठिकाणी पक्षीनिरीक्षणासाठी 40 फुट उंच मनोरा असून पर्यटकांसाठी बोटींग, तंबु निवास, बालोद्यान इत्यादी सुविधा आहेत.

Visit our website: allindiajourney.com

6) कुणकेश्वर मंदिर-


Kunkeshwar Temple हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील अरबी समुद्राच्या काठावर निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर, प्राचीन व धार्मिक शिवमंदिर आहे. या मंदिराला 1000 वर्षांपूर्वीचा इतिहास असूनही या ठिकाणी महाशिवरात्रीला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या मंदिराचं शिल्प सुंदर कोरीव काम केलेलं असून स्थानिक लोक इथे भगवान शिवाला“कुणकेश्वर” म्हणजेच “समुद्राचा देव” मानतात.येथील स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.

या ठिकाणाला “दक्षिण काशी” म्हणून ही ओळखले जाते. या मंदिराजवळ रामेश्वर मंदिर, भगवती देवी मंदिर, पाडवानी समुद्रकिनारा, ब्रह्मदेव मंदिर, सैतावडे धबधबा ही ठिकाणी आहेत. मालवण पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर आहे.

7) श्री सागरेश्वर मंदिर-

Shree Sagreshwar Temple हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा या ठिकाणी समुद्रकिनारी असलेले प्रसिद्ध आणि धार्मिक शिवमंदिर आहे. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या सुरुंच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. हे शिवालय दगडी बांधकामात असून मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत तटबंदी आहे. तसेच हे मंदिर समुद्रकिनारी असूनही या मंदिराच्या आवारात गोड्या पाण्याची विहीर आहे.

या मंदिराच्या आसपास विठोबा मंदिर आणि माचेमाड समुद्रकिनारा आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले पासून हे मंदिर तीन किलोमीटर अंतरावर आहे.

8) देवबाग बीच-


Devbag Beach हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ देवबाग गावात शांत व सुंदर समुद्रकिनारा असलेले पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.या देवबाग बीचवर तुम्ही विविध जलक्रीडा जसे की स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच येथील डॉल्फिन पाहण्याची मजा काही औरच असते. देवबागला कर्ली नदी आणि समुद्राचा संगम असल्यामुळे हा परिसर अत्यंत सुंदर आहे.

येथून जवळच तारकर्ली बीच आणि सिंधुदुर्ग किल्ला ही पाहण्यासारखे ठिकाणी आहेत. व या समुद्रकिनाऱ्यावर सी गरुड नावाचे पक्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.देवबाग रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण 40 किलोमीटर अंतरावर आहे.

9) तारकर्ली बीच-


Tarkarli Beach हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कर्ली व अरब समुद्राच्या संगमावर असलेला शांत व सुंदर समुद्रकिनारा आहे. हा एक कोरल बीच असून या ठिकाणी बांबू व सुपारीची झाडे, पांढरी शुभ्र स्वच्छ वाळू, शांत बॅक वॉटर, आणि हिरवळ पाहिला मिळते. या ठिकाणी तुम्ही स्कूबा डायव्हिंग,पॅरासेलिंग या जल क्रीडा अनुभवू शकता. तारकर्ली बीचला क्वीन बीच म्हणून घोषित करण्यात आले आहे.तारकर्लीमध्ये वर्षभर सुखद हवामान असून पर्यटकांसाठी हे एक आरामदायक उत्तम ठिकाण आहे. तसेच या ठिकाणी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे मध्ये राहण्याची संविधान मिळते.

10) सिंधुदुर्ग किल्ला-

Sindhudurg Fort हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात बांधलेला ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण जलदुर्ग आहे. हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला 200 फूट उंच असून 25 नोव्हेंबर इ.स 1664 मध्ये बांधण्यात आला. शिवाजी महाराजांच्या आरमारात हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. या किल्ल्यावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा असून मारुतीचे छोटे मंदिर आहे.हा किल्ला कुरटे बेटावर 48 एकर क्षेत्रात पसरलेला असून किल्ल्याची तटबंदी तीन किलोमीटर लांब आहे. 2010 मध्ये महाराष्ट्र सरकारने हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.

या किल्ल्यावर 52 दरवाजे, शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील मंदिर, व किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशा तीन विहिरी आहेत.ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच आहे.हा किल्ला बांधण्यासाठी त्या वेळचे एक कोटी ‘होन’ एवढा खर्च आला होता.या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते.

11) भराडी देवी मंदिर-

Bharadi Devi Temple हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. भराडी देवी हे आंगणे कुटुंबियांचे खाजगी देवस्थान असून ते असंख्य कोकणवासियांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर माळरानावर असून येथील शांत वातावरण मनाला प्रसन्नता देते.भराडी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे.दरवर्षी या ठिकाणी भरणाऱ्या यात्रा उत्सवात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून लाखो भाविक उपस्थित राहतात.

या ठिकाणी भाविक नवस बोलतात आणि तो पूर्ण झाल्यानंतर तांदळाचे वडे वाटले जातात परंतु हे वडे बाहेर नेण्यास मनाई आहे अशी येथील प्रथा आहे. तसेच देवीची सोन्या चांदीच्या नाण्यासह ओटी भरली जाते.मालवण पासून हे ठिकाण पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.

12) स्कुबा डायविंग सागरी विश्व-


Skuba Diving हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबाग या ठिकाणी कोकण किनाऱ्यावरील प्रवाळ खडकावर स्कूबा डायव्हिंग करणे हा जलक्रीडा आवडणाऱ्या साठी अद्भुत अनुभव आहे.स्कुबा डायविंगमुळे तुम्हाला पाण्याखालील जग एक्सप्लोर करण्यास आणि डायव्हिंगचा थरार अनुभवायला मिळतो. तुम्ही जरी पोहणारे नसला तरी तुम्ही हे पाण्याखालचे जग पाहू शकता. कारण या ठिकाणी असलेले प्रशिक्षक तुमची सर्वतोपरी काळजी घेतात.मालवण पासून हे ठिकाण थोड्या अंतरावर आहे.

13) त्सुनामी बेट –


Tsunami Bet हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबाग जवळ असलेले व त्सुनामीमुळे तयार झालेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. कर्ली नदी अरबी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी हे बेट तयार झाले आहे. या ठिकाणी तुम्ही वॉटर स्पोर्ट्स, जेट स्कीइंग, बनाना बोट राईड आणि कायाकिंगचा आनंद घेऊ शकता.येतो. तसेच, या बेटावर असलेल्या वाळूमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत ज्यामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो, असे सांगितले जाते.त्सुनामी बेट 2004 मध्ये दिसले होते तेव्हा त्सुनामी लाटा हिंद महासागरावर आदळल्याचे सांगितले जाते.भोगावे बीचवरून बोटीने त्सुनामी बेटावर जाता येते.

14) मालवण सागरी अभयारण्य-


Malvan Sea Sanctuary हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळील एक महत्वाचे सागरी अभयारण्य आहे. जैविकदृष्ट्या समृद्ध किनारा पट्टीचे संरक्षण करण्यासाठी या अभयारण्याची स्थापना 1987 मध्ये झाली असून हे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील तिसरे सागरी उद्यान आहे.हे अभयारण्य 27 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले असून हे विविध सागरी जीवांचे घरच आहे.

ज्यामध्ये 30 पेक्षा माशांच्या जास्त प्रजाती,प्रवाळ, शंख, शिंपले, आणि विविध प्रकारचे मासे यांचा समावेश होतो. या अभयारण्यात प्रवाळ भित्ती, मोती मण्यांचे ऑयस्टर, समुद्री शैवाल, विविध प्रकारचे मासे, शंख आणि शिंपले या गोष्टी आढळून येतात. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.कुडाळ रेल्वे स्टेशन पासून हे अभयारण्य थोडे अंतरावर आहे.

15) देवगड किल्ला-


Devgad Fort हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला देवगड खाडी व अरबी समुद्राच्या संगमावर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हे तालुक्याचे ठिकाण असून येथील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. देवगड किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना समुद्र असून एका बाजूला जमीन आहे. देवगड किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. त्यामध्ये मराठा अस्मितेचे युद्ध, पराक्रम आणि वारसा याची गुंफण पाहायला मिळते. या किल्ल्यावर गणपतीचे मंदिर,तोफा,विहीर असून किल्ल्याचे पडके अवशेष पाहायला मिळतात.कणकवली रेल्वे स्थानकापासून हा किल्ला थोडे अंतरावर आहे.

16) निवती किल्ला-


Nivti Fort हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पासून दहा किलोमीटर अंतरावर निवती गावात समुद्रातील डोंगरावर असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर चिरेबंदी पायऱ्यां वरून चढत जाताना वाटेने आपल्याला प्रथम पायऱ्याच्या दोंन्ही बाजूस असलेला व झाड वेलींनी झाकलेला खोल खंदक दिसतो.

व येथील किल्ल्याच्या भग्न तटबंदीतून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत व त्याच्या आतील बाजूस देवड्या आहेत. तसेच किल्ल्यावर ‘शिवाजीची तळी’ नावाची पाण्याची टाकी आहे. या किल्ल्यावरून अरबी समुद्र व वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे दिपगृह दिसते. हा किल्ला समुद्रातून होणाऱ्या व्यापारवर लक्ष्य ठेवण्यासाठी बाधण्यात आला होता.वेंगुर्ले पासून हा किल्ला 15 किलोमीटर अंतरावर आहे.

17) गोपुरी आश्रम-

Gopuri Ashram हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वागदे या ठिकाणी गड नदीच्या किनाऱ्यावर हा आश्रम आहे. हा आश्रम कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केला आहे. या आश्रमात जीवन शिक्षण शाळा असून बचत गटासाठी आठवडा बाजारपेठ उपलब्ध केली आहे. तसेच सुंदर हस्ताक्षरासाठी या ठिकाणी कार्यशाळा भरवल्या जातात.हा आश्रम सामाजिक आणि कृषी क्षेत्रांमध्ये कार्यरत असून या आश्रमाला कृषी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


18) रामेश्वर मंदिर-

Shree Rameshwar Temple हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव या ठिकाणी समुद्राजवळ असलेले धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. या गावात मोठ्या प्रमाणात मीठ तयार केले जात असल्यामुळे या गावाला ‘मिठबाव’ हे नाव पडले आहे. 2015 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली असून मंदिर परिसर अतिशय शांत सुंदर व रमणीय आहे.हे मंदिर 350 वर्षांपेक्षा जास्त पुरातन आहे व या मंदिराच्या परिसरात पुरातन शिल्प आणि पाण्याची जागा (कुंड) पाहायला मिळतात. तसेच रामेश्वर मंदिराच्या पेक्षा जुने श्री देव नागनाथ मंदिर या मंदिरा जवळच आहे. पर्यटकांचे हे आकर्षणाचे पर्यटन स्थळ आहे.

19) ऐनारी डोंगरातील लेणी-


Aeneri Cave हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील भुईबावडाच्या जवळ ऐतिहासिक व संस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पांडवकालीन लेण्या आहेत. या लेण्या समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर असून या लेणींना बकासुराचा वाडा म्हणूनही ओळखले जाते. 150 वर्षापूर्वी या लेण्यांचा शोध लागला. व या लेण्यांमध्ये अंधार असल्यामुळे बॅटरी घेऊनच प्रवेश करावा लागतो.या ठिकाणी भीम आणि बकासुर यांच्यातील युद्ध झाले होते असे लोककथेतून सांगितले जाते. येथील लेणी परिसरात निसर्गरम्य आणि सुंदर वातावरण आहे. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

20) विजयदुर्ग किल्ला-


Vijaydurg Fort हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व अभेद्य जलदुर्ग आहे. हा किल्ला 17 एकर जागेत पसरलेला आहे.विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकात शिलाहार राज घराण्यातील राजा भोजने बांधला असून या किल्ल्याला तीन चिलखती तटबंदी आहेत. तसेच या किल्ल्याच्या तीन बाजू पाण्याने वेढलेल्या असून किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत.टॅव्हेरनिअर याने इ.स. 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिल्यानंतर त्याचे वर्णन ‘विजापूरकरांचा अभेद्य किल्ला’ असे केले आहे. 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ला जिंकला होता. पूर्वी हा किल्ला मराठा आरमाराचे मुख्य केंद्र होते.

तसेच या किल्ल्यामध्ये मंदिर,वीहीर, पाण्याच्या टाक्या, तोफा, पडके महाल व युद्ध कैद्यांना ठेवण्यासाठी कोठडी आहे.विजयदुर्ग हा अजिंक्य किल्ला असल्यामुळे या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हटले जाते. तसेच या ठिकाणी असलेली 40 किलोमीटर लांबीची वाघोटन खाडी या किल्ल्याचे बलस्थान आहे. मुंबईपासून हा किल्ला 225 किलोमीटर अंतरावर आहे.

21) विमलेश्वर मंदिर-


Vimleshwar Temple हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाडा गावात झऱ्याच्या खळखळत्या पाण्याच्या सानिध्यात व निसर्गरम्य परिसरात असलेले शंकराचे जागृत देवस्थान आहे. चारशे वर्ष जुने हे मंदिर कोरीव लेण्यासाठी प्रसिद्ध असून मंदिर परिसर दाट वनराईने वेढलेला आहे.मोठ्या कातळात कोरलेले हे मंदिर पंधरा मीटर उंच व 100 मीटर लांब आहे. मंदिराच्या समोर दगडात कोरलेले अजस्त्र हत्ती व त्यावर बसलेले माहूत आहेत.तसेच हनुमान, ब्रह्मा, महेश, विष्णू आणि गरुड यांच्या कोरलेल्या मूर्ती आहेत.देवगड पासून हे मंदिर 6किलोमीटर अंतरावर आहे.

22) वालावल-


Valaval हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली नदीच्या काठावर असलेले निसर्गरम्य व सुंदर गाव आहे. या ठिकाणी हेमाडपंती शैलित बांधलेले लक्ष्मीनारायणाचे प्राचीन व सुंदर मंदिर आहे. या मंदिराची रचना,लाकडी कोरीव काम, अंतर्बाह्य सजावट व येथील कमळ पुष्पाने भरलेला तलाव पर्यटकांना आकर्षित करतो. चंद्र सूर्याचे दर्शन या ठिकाणी एकाच वेळी घडते. तसेच मंदिराच्या उत्तरेला असलेल्या वालावल खाडीचे सौंदर्य अप्रतिम आहे. पर्यटक या ठिकाणाला मोठ्या प्रमाणात भेट देतात.

23) श्री दत्त देवस्थान माणगाव-


Shree Datta Devsthan हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव या ठिकाणी असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे.वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांचे माणगाव हे जन्मगाव असून त्यांनी या दत्त मंदिराची स्थापना केली.टेंबे स्वामी यांचे या ठिकाणी भव्य मंदिर असून ते भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथील मंदिर परिसर प्रसन्न व शांत आहे.या मंदिराच्या परिसरात विहीर,प्राचीन यक्षिणी मंदिर व औदूंबराचे वृक्ष असून त्याखाली पादुका आहेत.तसेच पर्यटकांसाठी या ठिकाणी विश्वस्ताकडून राहण्याची सोय केलेली आहे.

24) रेडीचा गणेशमंदिर-


Redi Ganesh Temple हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळ असलेल्या रेडी गावात निसर्गरम्य ठिकाणी असलेले पवित्र गणेश मंदिर आहे. 1976 मध्ये या गावात खानी चे काम करत असताना खाणीमध्ये हे गणेशाचे द्विभुजा मूर्ती सापडली व या मूर्ती सोबत गणेशाचे वाहन असलेले उंदराची मूर्ती ही सापडली.असे सांगितले जाते की, एका स्थानिक व्यक्तीला स्वप्नात दृष्टांत झाला होता की, या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे. गावकऱ्यांच्या मदतीने 1978 मध्ये या गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली. वेंगुर्ल्यापासूनही ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे.

25) श्री वेतोबा मंदिर-


Shree Vetoba Temple हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली या ठिकाणी असलेले वेतोबाचे प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या पायथ्याशी असलेल्या नयनरम्य आरवली गावाचे ग्रामदैवत असून श्री क्षेत्रपाल देव वेतोबा यांची गावचा तारणहार म्हणून या ठिकाणी पूजा केली जाते. हे मंदिर सोळाव्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. पूर्वी या वेतोबा देवाची मूर्ती फणसाच्या लाकडात कोरलेली असायची त्यामुळे ती दर शंभर वर्षांनी स्थापना करावी लागायची परंतु 1916 मध्ये एका स्थानिक शिल्पकाराने ही मूर्ती पंचधातूची बनवली व मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या वेतोबा देवाला चामड्याच्या चपला अर्पण केल्या जातात. वेंगुर्ले पासून हे ठिकाण बारा किलोमीटर अंतरावर आहे.

26) तिलारी धरण-


Tilari Dam हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यात तिलारी नदीवर बांधलेले महत्त्वाचे धरण आहे. या धरणाचा उपयोग सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो.हे धरण महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा संयुक्त पाटबंधारे प्रकल्प आहे. हे धरण धामणे गावाजवळ दाट जंगलात 38.05 मीटर उंचीचे दगडी धरण बांधले असून या धरणाची पाणी पातळी 111.55 एवढी आहे.तिलारी नदी सुमारे 650 मीटर उंचीवरून खाली उतरते. त्यामुळे या नैसर्गिक उंचीचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. या धरण परिसरात पारगड किल्ला व मांगेली धबधबा ही पर्यटन स्थळे आहेत.

27) लाकडी खेळणी सावंतवाडी-


Wooden Toys ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या ठिकाणी बनवली जातात.सावंतवाडीतील चितारआळी हे सुंदर आणि हुबेहुब फळे आणि भाज्यांच्या लाकडाच्या प्रतिकृती बनवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणा शिवाय हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आक‍‍र्षणाचे केंद्र बनले आहे. ही रंगीबिरंगी खेळणी खरी असल्याचा भास होतो. भारतीय पोस्टाने बारा हस्तकलांना पोस्ट कार्डवर स्थान दिले आहे .

त्यामध्ये सावंतवाडीतील लाकडी खेळण्याचा समावेश आहे. सावंतवाडीतील या खेळण्यांना जगभरातुन मागणी असून भारतातील हे लाकडी खेळण्यांचे मुख्य मार्केट आहे. ही खेळणी पांगारा लाकडा पासून बनवली जातात. सावंतवाडी बस डेपो पासून हे ठिकाण दहा मिनिटाच्या अंतरावर आहे.

28) समुद्ध आंबोली-


Amboli Ghat हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले आंबोली गाव समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर संपन्न, व समुद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.महाराष्ट्राच्या सह्याद्री रांगांत असलेल्या आंबोलीत विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणीसृष्टी आहे त्यामुळे या ठिकाणाला पृथ्वीवरचे ‘इकोलॉजीकाल हॉट स्पॉट'(जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र) म्हणून ओळखले जाते.

या ठिकाणी असलेली दाट जंगले, दर्‍या खोर्‍यांचा नयनरम्य देखावा, या ठिकाणी असलेले धबधबे,आकाशाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, वर्षभर हिरव्यागार असणार्‍या दर्‍या, तसेच आंबोली पासून जवळ असलेल्या निसर्गरम्य चौकुळच्या जंगलात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे, आणि वन्यजीव आढळून येतात. या शिवाय या ठिकाणी असंख्य प्रकारच्या वनौषधी सापडले आहेत. अलीकडच्या काळात चौकुळ येथे 35 ते 40 लहान मोठ्या गुहा आढळून आल्या आहेत.

आंबोली हे कोकणातील गर्द वनराईने आणि जैवविविधतेने नटलेले समृद्ध ठिकाण आहे.हिरण्यकेशी नदीचा उगम या ठिकाणी झालेला असून हिरण्यकेश्वर (शंकर) मंदिर या ठिकाणी आहे.पर्यटक बारमाही या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात. कोल्हापूर पासून हे ठिकाण 128 किलोमीटर अंतरावर आहे.

Visit the travel blog

1)आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यात आहे?

आंबोली घाट सिंधुदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे.

2) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री दत्त देवस्थान कोणत्या ठिकाणी आहे?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री दत्त देवस्थान कुडाळ तालुक्यातील माणगाव या ठिकाणी आहे.

3) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला किती एकर जागेत पसरलेला आहे?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला एक ऐतिहासिक व अभेद्य जलदुर्ग आहे. हा किल्ला 17 एकर जागेत पसरलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top