भारतभ्रमंती या वेबसाईटवर पहा भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. छत्रपती संभाजी नगर( औरंगाबाद) हा जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मोठे शहर आहे. जिल्ह्यामध्ये नऊ तालुके असून महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी पाचव्या क्रमांकाचे हे शहर आहे. या जिल्ह्याला कलात्मक रेशीम उत्पादक आणि कापूस उत्पादक केंद्र समजले जाते. येथील अजिंठा आणि वेरूळ लेण्या 1983 मध्ये युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मध्ये नोंद केले आहेत. 21 places to visit in Sambhajinagar District
पर्यटनाच्या दृष्टीने हा जिल्हा खूप समृद्धशाली आहे. पूर्वी या शहरात महत्वाचे 52 दरवाजे होते म्हणून संभाजीनगर शहराला ‘दरवाजाचे शहर’ असेही संबोधले जाते. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. हे शहर खाम नदीच्या तीरावर वसलेले असून पूर्वी मलिक अंबरने या शहराचे फतेहपुर असे नामकरण केले होते. या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
21 places to visit in Sambhajinagar District
संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
1)Jayakwadi Dam-



जायकवाडी धरण हे संभाजीनगर मधील गोदावरी नदीवर बांधले आहे. संभाजीनगर मधील हे प्रमुख धरण असून संभाजीनगरच्या विकासामध्ये या धरणाचा खूप मोठा वाटा आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे हे मातीचे धरण आहे. पैठण येथे असलेल्या या धरणाला नाथ सागर असेही म्हणतात. या धरणामुळे मराठवाड्यातील 2.40 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 102 टी एम सी इतकी आहे. या धरणामुळे जवळजवळ 400 गावांची पाण्याची तहान भागवली जाते.
2)pitalkhora caves-




औरंगाबाद शहरात कन्नड जवळ चांदोरा टेकडीवर पीतळखोरा लेणी या 14 लेण्यांचा समूह आहे. भारतातील या सर्वात जुन्या लेण्या असून यातील काही लेण्या दुमजली आहेत. औरंगाबाद मधून येथे जाण्यासाठी बसची सोयही करण्यात आली आहे.
3)Gautala Wildlife Sanctuary-



गौताळा अभयारण्य हे औरंगाबाद मधील मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. औरंगबाद मधील चाळीसगाव पासून काही अंतरावरच हे अभयारण्य आहे. या अभयारण्यात बुलबुल, मोर,पोपट, सुगरण आणि इतर विविध प्रकारचे पक्षी पाहावयास भेटतात. तसेच सर्व प्रकारचे जंगली प्राणी या अभयारण्यात आढळून येतात. पूर्वी या ठिकाणी गवळी लोकं आपल्या गाई चारत असत त्यामुळे या अभयारानाला गवताळा असे नाव पडले असावे.
4)Mhaismal Hill Station-



वेरूळ खुलताबाद या थंड हवेच्या ठिकाणी असलेले म्हैसमाळ हे संभाजीनगर शहरापासून खूप जवळ आहे. पावसाळ्यात येथील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये 1067 उंचीवर वसलेले म्हैसमाळ हे महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन आहे. तसेच या ठिकाणी एक वनस्पती कार्यशाळा देखील आहे. च्या मध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटते. निसर्गाने समृद्ध असलेल्या या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या.
5)Soneri Mahal-



संभाजीनगर मधील सोनेरी महल ही ऐतिहासिक वास्तु सातमाळा पर्वत रांगाच्या पायथ्याशी आहे. या महालाच्या मागे लहान लहान पर्वतरांगा आहेत. त्यामुळे या महलाचे दृश्य एखाद्या चित्राप्रमाणे भासते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या सोनेरी महला पासून जवळच आहे. तसेच महालाच्या परिसरात असलेली विविध प्रकारचे झाडे, गवताळ भाग, बहरलेली शेती महालाच्या सौंदर्यात भर टाकतात. या महालाच्या तळमजल्यावरील दरबार महालात असलेली चित्रे खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली आहेत. म्हणून या महालाला सोनेरी महाल असे म्हणतात.
6)Dr.Salim Ali lake-


डॉ.सलीम अली सरोवर म्हणजे संभाजीनगर शहराला लाभलेली निसर्गाचे अद्भुत देणगीच आहे. अत्यंत हिरवाईने नटलेले हे सरोवर शहराच्या मध्यभागी असून महाराष्ट्रातील ते एकमेव सरोवर आहे. हिवाळ्यामध्ये परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात या सरोवारावर येतात. तसेच येथे जवळच पक्षी निरीक्षण केंद्र असून पक्षी तज्ञ असलेले डॉ.सलीम अली यांचे नाव या सरोवराला देण्यात आले आहे. या सरोवराच्या आजूबाजूचा परिसर जैवविविधतेने परिपूर्ण आहे. या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती,पक्षी,प्राणी आढळून येतात.
7)Bibi Ka Maqbara-


बीबी का मकबरा हा मुघल सम्राट औरंगजेब याचा मुलगा अजम शहा यांनी त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधला आहे. औरंगजेबाची पत्नी रबिया दुरानी हीची समाधी येथे आहे. ही वास्तु ताजमहालचे अनुकरण असल्याने मराठवाड्यातील या मकबऱ्याला येथील लोक सन्मानाने ताजमहल म्हणतात. बीबी का मकबरा हे संभाजीनगर मधील ऐतिहासिक स्मारक आहे. हा मकबरा खाम नदीजवळ बांधलेला असून औरंगाबाद शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. देश विदेशातून येथे पर्यटक भेट देत असतात.
8)Siddharth Garden and Zoo-




संभाजीनगर मधील सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय या उद्यानाची निर्मिती 1985 मध्ये करण्यात आली. हे उद्यान मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असून ते शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ आहे.200 पेक्षा जास्त प्रकारचे प्राणी आणि पक्षी या संग्रहालयात आहेत. या प्राणी संग्रहालयात गौतम बुद्धांचा भव्य पुतळा बसवलेला असून बुद्धांच्या नावावरून ‘सिद्धार्थ’ असे या संग्रहालयाला नाव देण्यात आले आहे. आठवड्यातील हे प्रेक्षणीय स्थळ असून वर्षी येथे लाखो पर्यटक भेट देत असतात आणि विद्यार्थ्यांच्या सहली येथे येतात.
9)Chatrapati Shivaji Maharaj Museum –



संभाजीनगर महानगरपालिकेने निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम संग्रहालय नेहरू बाल उद्यानाजवळ आहे. पूर्वीच्या काळातील मराठा शासकांची युद्धशस्त्रे, पुरातन वस्तू, 400 वर्षांपूर्वीची जुनी पैठणी साडी तसेच पाचशे वर्ष जुना पोशाख या संग्रहालयात पहावयास भेटते. हे संग्रहालय आठवड्याचे सातही दिवस सकाळी 10:30ते संध्याकाळी6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते. औरंगाबाद स्टेशन पासून काही अंतरावर हे संग्रहालय आहे.
10)Ajintha cave –





संभाजीनगर मधील अजंठा लेणी अजिंठा येथे असलेल्या 30 बौद्ध लेण्या असून ह्या लेण्या बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथांना समर्पित आहेत. येथील प्रत्येक लेण्यांमध्ये असलेले विलक्षण कोरीव काम,उत्कृष्ट स्थापत्य शैली पाहण्यासारखे आहे. या लेण्या आठवडातील सोमवार सोडून प्रत्येक दिवशी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुले असतात युनोस्कोने 1983 मध्ये अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. या लेण्यांमध्ये भीत्तीचित्रे व गुंतागुंतीचे कोरीव काम आहे.
11)Verul cave –





वेरूळ लेण्या हया दोन किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेल्या आहेत. चरणंद्री टेकड्यांवर हा 34 लेण्यांचा समूह आहे. युनोसकोने या लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे. या बहुधर्मीय लेण्या वेरूळ लेण्या म्हणून ओळखल्या जातात. येथील लेण्यांमधील कोरीव काम अपवादात्मक चित्रे विविध प्रकारचे शिल्पे आणि हस्तकला पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करतात. या लेण्या हिंदू बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित आहेत.
visit our website:Allindiajourney.com
12)Ghrushneshwar Temple-

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर हे मंदिर संभाजीनगर मधील वेरूळ या गावात आहे भगवान शिवाला हे मंदिर समर्पित असून वेरूळ लेण्यापासून एक किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर हे मंदिर आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी सोळाव्या शतकामध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केली होती. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर परिसरात गर्भगृह आणि सभा मंडप आहे
13)Doulatabad Fort –



यादव राजा भिल्ल यांनी 1187 मध्ये दौलताबाद किल्ला हा किल्ला बांधला. त्यानंतर विविध राजवटीमध्ये या किल्ल्याचा जीर्णोद्धार व पुनर्बांधणी करण्यात आली. दौलताबाद मधील टेकडीवर असलेल्या या किल्ल्याला देवगिरी म्हणून देखील ओळखले जाते. या किल्ल्याचा आकार शंकू सारखा आहे. या किल्ल्यामध्ये भारत माता मंदिर, चांद मिनार, रंग महाल, चिनी महाल, सरस्वती बावडी अशा वास्तू आहेत. या किल्ल्याचे संरक्षण व्यवस्था अत्यंत अत्यंत मजबूत असल्यामुळे इथे कोणालाही प्रवेश करणे अशक्य होते
14)Himayat Garden-



हिमायत बाग ही 400 एकर क्षेत्रावर पसरलेली असून सतराव्या शतकात औरंगजेबाने ही बाग बांधली होती. या ठिकाणी दुर्मिळ अशा वनस्पती झाडे विविध फुले आणि पक्षांनी बहरलेले असते. हे उद्यान खूप वेगळ्या पद्धतीने सजवले आहे. येथील बारादरी हे ठिकाण इवाज खानने बांधले असून ते प्रेक्षणीय आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.
15) Bhadra Maruti Temple-


भद्रा मारुती मंदिर हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील खुलताबाद येथील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. हे मंदिर भारतातील दुर्मिळ मंदिरांपैकी एक आहे, जिथे भगवान हनुमानाची मूर्ती निद्रावस्थेत विराजमान आहे. येथील भद्रा मारुती नवसाला पावणारा मारुती म्हणून ओळखला जातो. पूर्वी खुलताबाद हे नगर ‘भद्रावती’ म्हणून ओळखले जात होते. येथील राजा भद्रसेन भगवान रामाची भजने गात असताना, ती भक्ती ऐकून प्रसन्न होऊन हनुमानजी येथेच कायमचे निद्रावस्थेत राहिले, अशी आख्यायिका आहे. हे मंदिर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे.
16)Khuldabad-




खुलताबाद हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले शहर आहे. पूर्वी हे शहर रौझा नावाने ओळखलं जात होते. खुलताबादला “सूफी संतांचे शहर” म्हणून ओळखले जाते, कारण 14 व्या शतकात येथे सुमारे 1500 सूफी संतांनी वास्तव्य केले होते. या शहरात अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. त्यामध्ये भद्रा मारुती मंदिर, मुघल सम्राट औरंगजेबाची कबर, हजरत ख्वाजा बुऱ्हाणुद्दीन गरीब, जर जरी जर बक्ष आणि शेख झैन-उद-दीन शिराझी यांचे भव्य दर्गे आहेत. या दर्ग्यांमध्ये 700 वर्षे जुन्या मौल्यवान वस्तू, कुराणच्या सोन्याच्या अक्षरांतील प्रती आणि मुघलकालीन तोफांचा संग्रह पाहायला मिळतो. तसेच येथे मलिक अंबरची कबर आणि बाणी बेगम गार्डन आहे. वेरूळ लेण्यांपासून हे ठिकाण 3 किमी अंतरावर आहे.
17)Shulibhanjan –


शुलीभंजन हे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील, खुलताबाद तालुक्यातील प्रसिद्ध, निसर्गरम्य आणि धार्मिक ठिकाण आहे. हे ठिकाण संत एकनाथ महाराजांचे साधना स्थळ आणि दत्त मंदिरासाठी ओळखले जाते. 16 व्या शतकातील महान संत एकनाथ महाराज यांनी या गडावर 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. आणि याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांना त्यांचे गुरु श्री जनार्दन स्वामी भेटले आणि त्यांना भगवान दत्तात्रयांचे दर्शन झाले. या डोंगराच्या शिखरावरील दत्त मंदिराच्या बाहेर एक ‘संजीवनी शिळा’ आहे या शिळेवर हलका आघात केल्यास धातूच्या घंटेसारखा आवाज येतो, जो लोकांना चमत्कार वाटतो. तसेच या गडावर महादेव मंदिर, सूर्यकुंड आणि चंद्रकुंड हे पाण्याचे दोन पवित्र कुंड आहेत. हा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून पावसाळ्याच्या दिवसांत या गडाच्या परिसरात हनुमान कुंड धबधबा प्रवाहित होतो.
18)Panchakki-



पाणचक्की ही संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील, स्थापत्य आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट व अद्भूत नमुना आहे. डोंगरावरील झऱ्यातून खाली आणलेल्या पाण्याद्वारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती. सुफी संत बाबा शाह मुसाफिर यांच्या दर्ग्याला जोडलेली ही इमारत महमूद दरवाज्याजवळील बागेत असून त्यात मशीद, मदरसा, कचेरी आणि मंत्र्याचे घर, आहेत. त्या काळात शहरात येणारे यात्रेकरू, सुफी संत, शिष्य आणि सैनिकांसाठी धान्य दळण्याची व्यवस्था आणि पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने ही पाणचक्की उभारण्यात आली होती. कोणतीही आधुनिक यंत्रणा नसताना, केवळ गुरुत्वाकर्षण आणि सायफन पद्धतीचा वापर करून जमिनीखालून मातीच्या पाईप्सद्वारे हे पाणी शहरात आणले गेले. हे एक आश्चर्यच मानले जाते.
19)Shree Sansthan Ganpati Temple –

श्री संस्थान गणपती मंदिर हे संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील, राजाबाजार येथील शहराचे मुख्य ग्रामदैवत आहे. या मंदिरातील गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची, बसलेल्या स्वरूपातील व पूर्वाभिमुख आहे. अखंड काळ्या पाषाणातील ही स्वयंभू मूर्ती 350 वर्षांपूर्वी एका पिंपळाच्या झाडाखाली सापडली होती. लोकमान्य टिळक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दिग्गज नेत्यांनी या गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले होते. आणि शहरातील कोणत्याही सार्वजनिक कार्याची किंवा गणेशोत्सवाची सुरुवात या मंदिरातील पूजेनेच होते. व अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभही याच मंदिरापासून होतो. गणेशोत्सवात दररोज हजारो भाविक मंदिरात आयोजित केल्या जाणाऱ्या भंडाऱ्याचा लाभ घेतात.
20)Kailasanatha Temple-



कैलास मंदिर हे संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील, वेरूळ येथील प्राचीन शिल्पकलेचा आणि स्थापत्यशास्त्राचा एक अद्भूत आणि अद्वितीय चमत्कार आहे. हे जगातील सर्वात मोठे एकाच अखंड खडकातून कोरलेले शिवमंदिर आहे. आठव्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याने एकाच महाकाय खडकाला कळसापासून पासून खालपर्यंत कोरून हे शिवमंदिर तयार केले होते. हे मंदिर वेरूळ लेण्यांचा गुंफा क्र. 16 मध्ये असून युनेस्कोने 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत याचा समावेश केला आहे.
या मंदिराचे बांधकाम द्रविड शैलीचे असून, ते तयार करण्यासाठी अंदाजे 40,000 टन दगड बाहेर काढण्यात आला होता. हे मंदिर सुमारे 276 फूट लांब, 154 फूट रुंद आणि 90 फूट उंच आहे. व मंदिराच्या बाहेरील आणि आतील भिंतींवर रामायण, महाभारत आणि हिंदू पुराणातील प्रसंग अत्यंत सुंदररीत्या कोरलेले आहेत. तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर भव्य नंदी आणि दोन विशाल हत्ती आहेत. हे मंदिर राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात पूर्ण झाले.
21)Bani Begum Garden-



बानी बेगम गार्डन हे संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील, खुलदाबाद येथील एक सुंदर आणि ऐतिहासिक मुघल शैलीतील उद्यान आहे. हे उद्यान मनमोहक वास्तुकला, हिरवेगार परिसर आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. या उद्यानाचे नाव औरंगजेबाच्या एका मुलाची राजपुत्र बिदर बख्तची पत्नी, बानी बेगम यांच्या नावावरून नाव दिले आहे. या बागेत बानी बेगम यांची कबर आहे. हे उद्यान ‘चारबाग’ या मुघल शैलीत चार भागात विभागलेले असून यामध्ये भव्य घुमट, आकर्षक कारंजे, खांब आणि बारादरी (बारा दरवाजे असलेली रचना) यांचा समावेश आहे, ज्यातून मुघल कलेची झलक दिसून येते. संभाजीनगर (औरंगाबाद) शहरापासून हे ठिकाण 25 किमी अंतरावर आहे.
1)संभाजीनगरमधील हिमायत बाग किती एकरवर पसरली आहे?
संभाजीनगरमधील हिमायत बाग 400 एकरवर पसरली आहे.
2)बीबी का मकबरा कोणी बांधला ?
बीबी का मकबरा औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने आईच्या स्मरणार्थ बांधला.
3)जायकवाडी धारण कोणत्या नदीवर आहे ?
जायकवाडी धारण गोदावरी नदीवर आहे ?


