भारतभ्रमंती ही अशी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला भारत देशातील प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात गुजरात राज्यातील गांधीनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे.गांधीनगर जिल्हा हा गुजरात राज्याची राजधानी आहे व हा जिल्हा गांधींच्या नावावरून ओळखला जातो. या जिल्ह्यात सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालय, मंत्र्यांची निवासस्थाने, विधानभवन, राज्यपालांचे निवासस्थान, राज्यपालांचे कार्यालय, आणि महत्त्वाची कार्यालये आहेत. 19 places to visit in Gandhinagar District
तसेच या जिल्ह्यामध्ये मानसा, कलोल, देहगाव आणि गांधीनगर हे चार तालुके आहेत. हे शहर साबरमती नदीच्या काठावर वसलेले असून गुजरात मधील सर्वात सुंदर व हरित शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्याचे संपूर्ण नियोजन चंदीगडच्या धर्तीवर तयार करण्यात आल्यामुळे नियोजनबद्ध स्थायिक होणारे हे भारतातील दुसरे शहर आहे. हे शहर 30 सेक्टरमध्ये विभागलेले असून या जिल्ह्यात अनेक जातीधर्माचे लोक एकत्र राहतात.
याशिवाय येथे विस्तीर्ण हिरव्यागार बागा, मोठ्या प्रमाणावर केलेली वृक्ष लागवड आणि नदीकाठचे मनोरंजन क्षेत्र यामुळे हे शहर हिरवळीने नटलेले आहे.तसेच या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण आणि व्यावसायिक वाढीमुळे गांधीनगरचा विकास वेगाने होत आहे. या जिल्ह्यात अनेक धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आहेत.
19 places to visit in Gandhinagar District
गांधीनगर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन स्थळे
1)Akshardham Temple-

अक्षरधाम मंदिर हे गुजरात मधील गांधीनगर जिल्ह्यातील स्वामीनारायण संप्रदायाने बांधलेले एक भव्य मंदिर आहे. हे मंदिर 23 एकर जागेवर, विस्तीर्ण बागांमध्ये पसरलेले असून, हे मंदिर राजस्थानमधील 6000 टन गुलाबी संगमरवरी दगडांनी बांधले आहे. त्यामध्ये लोखंड किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही. हे मंदिर 108 फूट उंच, 240 फूट लांब आणि 131 फूट रुंदीचे आहे.
हे मंदिर 1992 मध्ये उघडले गेले व या मंदिरात गुंतागुंतीची कोरीव दगडी रचना,सुंदर मूर्तिकला, नक्षीकाम केलेले खांब, 57 खिडक्यांच्या ग्रिल, आणि 19 खांब असलेले घुमट आहेत.आणि येथील गर्भगृहात भगवान स्वामीनारायण यांची 1.2 टन वजनाची सोन्याचा मुलामा दिलेली मूर्ती आहे, तसेच येथे दररोज संध्याकाळी ‘सत्-चित्-आनंद’ जल शो आयोजित केला जातो. या मंदिराला आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी भेट दिली आहे.
2)Adalaj ni Vav-

अदलाज वाव ही गुजरात राज्यातील गांधीनगर जिल्ह्यामध्ये अडालज गावात असलेले एक ऐतिहासिक वाव (stepwell) आहे. ही वाव पाच मजली असून इ.स. 1499 मध्ये राणी रुदाबाईने आपल्या पतीच्या राजा वीरसिंह यांच्या स्मरणार्थ बांधली होती. ही अद्वितीय व ऐतिहासिक पाच मजली बावडी अष्टकोनी आकाराची असून ही रचना 16 स्तंभांवर उभी आहे. या बावडीची स्थापत्य कला अत्यंत सुंदर कोरीवकाम व हिंदू आणि इस्लामिक स्थापत्यशैलीचे मिश्रण असलेली बावडी आहे.
या बावडीच्या भिंती आणि खांबांवर पाने,फुले,पक्षी, मासे, भूमितीय नमुने अशा प्रकारचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.अडालजची बाव ही एक अद्वितीय व ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर आहे. ही वाव पाण्यासाठी पर्यटक दूरवरून येत असतात. गांधीनगर पासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे.
3)Adalaj Trimandir-

त्रिमंदिर हे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील अदलाज येथील पवित्र तीर्थस्थळ आहे. हे एक भव्य दुमजली मंदिर असून पहिल्या मजल्यावर भव्य हॉल आणि दुसऱ्या मजल्यावर मंदिर आहे. या मंदिरात जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या देवतांच्या मूर्ती एकाच व्यासपीठावर असल्याने ते त्रिमंदिर म्हणून ओळखले जाते.आणि मध्यभागी भगवान श्री सीमंधर स्वामींची 155 इंच संगमरवरी मूर्ती आहे.
हे मंदिर हिरव्यागार बागेने वेढलेले असून मंदिर संकुल परिसर 40,175 चौरस फूट क्षेत्रफळ आहे. तसेच येथे मध्यभागी एक सुंदर कारंजे आहे. व या मंदिरात परमपूज्य दादाश्री भगवान यांच्यावर माहितीपूर्ण एक संग्रहालय आणि थिएटर आहे. हे मंदिर परमपूज्य दादाश्री यांनी प्रेरित केले असून त्यांचे अनुयायी खूप मोठे होते, जगभरातील भक्त मोक्षाचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे येत होते.
4)Indroda Nature Park-

इंद्रोडा डायनासोर आणि जीवाश्म पार्कहे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील साबरमती नदीच्या काठावर, सुमारे 400 हेक्टर क्षेत्रात पसरलेले डायनासोर आणि जीवाश्म उद्यान आहे. हे उद्यान जुरासिक उद्यान म्हणूनही ओळखले जाते. हे उद्यान देशातील दोन डायनासोर संग्रहालयांपैकी एक असून ते गुजरात इकोलॉजिकल एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनद्वारे चालवले जाते.
या उद्यानात प्राणीसंग्रहालय, विशाल वनस्पति उद्यान, ब्लू व्हेल या सस्तन माशांचे प्रचंड सांगाडे,अँफीथिएटर, व्याख्या केंद्र आणि कॅम्पिंग सुविधा आहेत. तसेच येथील वाइल्डनेस पार्कच्या विशाल जंगलात असंख्य प्रजातींचे पक्षी, सरपटणारे प्राणी, खूप सार्या नीलगाय, लंगूर आणि मोर आहेत.इंद्रोडा डायनासोर आणि जीवाश्म पार्क हे एक मौल्यवान खजिनाच आहे.
Visit our website: allindiajourney.com
5)Dandi Kutir Museum-

दांडी कुटीर संग्रहालय हे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील महात्मा गांधींच्या जीवनावर आणि शिकवणींवर बांधलेले भारतातील सर्वात मोठे आणि एकमेव संग्रहालय आहे. या संग्रहालयाची रचना गांधीजींच्या प्रसिद्ध दांडी मार्चचे प्रतीक असलेल्या एका मोठ्या मिठाच्या ढिगाऱ्यासारखी आहे. या संग्रहालयात टेक्नोलॉजीचा वापर करून गांधीजींच्या जन्मापासून ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांपर्यंत, प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये काठियावाडमध्ये झाला. बालपणी ते एक लाजाळू, उल्लेखनीय आणि अद्वितीय विद्यार्थी होते. नंतर त्यांचे कस्तुरबा यांच्याशी लग्न झाले आणि तारुण्यात त्यांनी केलेले कामे यात दाखवले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरित्र दाखवणारे हे जगातील एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय 2015 पासून सर्वसामान्यांसाठी खुले केले.
6)Sarita Udyan-

सरिता उद्यान हे गुजरातमधील गांधीनगर या हिरव्यागार शहरात असलेली एक सर्वात जुनी व नयनरम्य बाग आहे. हे हिरवेगार, शांत वातावरण असलेले उद्यान साबरमती नदीच्या काठावर वसलेले असून पर्यटकांचे पिकनिक आणि आरामदायी फिरण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. या निसर्गरम्य उद्यानात हिरवीगार झाडी,फुलझाडे आणि हिरवीगार लॉन विविध प्रकारच्या वनस्पती, बोटिंग, लहान मुलांसाठी खेळण्याची सोय, फिरण्यासाठी मार्ग, सर्व वयोगटांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.
7)Craftsmen’s Village-

कारागिरांचे गाव हे गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील पेठापूर गावात,साबरमती नदीच्या मागे वसलेले,बांधणी साड्यांसाठी प्रसिद्ध गाव आहे. या ठिकाणी साड्या आणि कपड्यांवर हँड एम्ब्रॉयडरी आणि ब्राइट कलर प्रिंटिंग लाकडी प्रिंटिंग ब्लॉक्सने केली जाते.येथे नैसर्गिक रंगांनी रंगवलेले कपडे,रेशमी कापडाचे छोटे तुकडे बांधणे, लाकडी ब्लॉक आणि विविध प्रकारच्या अतिशय सुंदर बांधणी साड्यांचे उत्पादन केले जाते.
पेठापूर गाव हे गुजरातच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि हस्तकलेचा अनुभव देणारे ठिकाण आहे. दररोज येथे शेकडो पर्यटक आणि खरेदीदार साड्या खरेदीसाठी येतात. गांधीनगर पासून हे ठिकाण सात किलोमीटर अंतरावर आहे.
8)Punit Van-

पुनीत वन हे गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील सेक्टर 19 मध्ये असलेले एक अद्वितीय वनस्पति उद्यान आहे. हे वन गुजरात सरकारच्या वनविभागाने 2005 मध्ये विकसित केले. या ठिकाणी अनेक एकर जागेवर वृक्षारोपण केले असून या बागेला पवित्र वनक्षेत्र म्हटले जाते कारण हे वन झाडे नक्षत्र, ग्रह आणि राशिचक्रांचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रीय महत्त्व असलेल्या या उद्यानात सुमारे 3,500 झाडे लावण्यात आली आहेत.
आणि या उद्यानात नक्षत्रांनुसार वनस्पतींची लागवड केली आहे, त्यामुळे हे उद्यान, नक्षत्र वन, राशी वन, नवग्रह वन आणि पंचवटी वन अशा पाच मोठ्या विभागांमध्ये विभागलेले आहे. या निसर्गरम्य उद्यानात हिरवळ आणि झाडे,जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक आणि मुलांसाठी खेळाचे मैदान, सुंदर तलाव, फाऊंटन आणि खुले नाट्यगृह आहे.
9)Fun World-

फन वर्ल्ड हे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील एक लोकप्रिय मनोरंजन पार्क आहे. येथे मुलांसाठी आणि प्रौढांसाठी विविध प्रकारच्या रोमांचकारी राईड्स, वॉटर पार्क्स, आणि कुटुंबासाठी मजा करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. या पार्कमध्ये ड्रॅगन आणि स्काय ट्रेन,साया ट्रूपर, स्पिन तोरा, ॲडल्ट राईड्स, रोलर कोस्टर, जायंट व्हील, ड्रॅगन राईड, अशा थरारक राईड्स व हॉरर हाऊस, जंगल सफारी आणि वंडर टनेल आहेत. हे एक नावाप्रमाणेच मजेदार जग असून येथील वॉटर वर्ल्डमध्ये लेझी रिव्हर, वेव्ह पूल, मुलांसाठी स्लाइड्स पूल आणि इतर वॉटर राईड्सचा अनुभव घेता येतो.
10)Aalloa Hills-

आलोआ हिल्स हे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील साबरमती नदीच्या काठावर,कलोल परिसरात वसलेले एक रिसॉर्ट आणि गोल्फ कोर्स आहे. आलोआ हिल्स रिसॉर्ट हे निसर्गरम्य व शांत वातावरणात असून या रिसॉर्टच्या एका बाजूला विस्तीर्ण जंगल तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार दरी आहे. पर्यटकांसाठी येथे गोल्फ कोर्स, स्विमिंग पूल, जाकुझी, स्पा आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
येथे एक सुंदर आणि आव्हानात्मक नऊ-होल-34 पार साहसी गोल्फ कोर्स आहे, त्यामुळे गोल्फप्रेमींसाठी हे आकर्षणाचे ठिकाण आहे. याशिवाय या ठिकाणी स्विमिंग पूल, जाकुझी, स्पा, फिटनेस सेंटर आणि ऊंटाच्या गाड्यांची सफर या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच येथील निसर्गरम्य परिसरात सुंदर मोर,नीलगायी विविध प्रकारचे पक्षी त्यामध्ये सनबर्ड्स, आयोरा, किंगफिशर, लहान मिनीव्हेट्स, इंडियन रोलर्स हे पाहायला मिळतात.
11)Vithalbhai Patel Bhawan-

विठ्ठलभाई पटेल भवन हे गांधीनगर जिल्ह्यातील गुजरात विधानसभेचे मुख्यालय आहे. ही तलावाच्या मध्यभागी एका उंच व्यासपीठावर बांधलेली इमारत संपूर्ण कॉम्प्लेक्समधील सुंदर इमारत आहे.ही इमारत नर्मदा भवन आणि सरदार भवनला झुलत्या कॉरिडॉरद्वारे जोडलेली असून येथील सरदार भवनमध्ये राज्य सचिवालय आहे तर नर्मदा भवन हे सर्व विभाग प्रमुखांचे कार्यालय आहे.
हे एक प्रमुख राजकीय केंद्र असून, येथे राज्याच्या विधानसभेचे कामकाज चालते. या इमारतीचे नाव सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू व स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलभाई पटेल यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे.या इमारतीमध्ये एक मोठे उद्यान असून येथे गुजरातच्या स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे आहेत. हे ठिकाण गुजरात राज्याचे महत्त्वाचे राजकीय स्मारक आहे.
12)Sant Sarovar Dam-

संत सरोवर धरण हे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील साबरमती असलेले एक धरण आहे. हे धरण जलसंधारणाच्या उद्देशाने बांधले असून हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.या धरणावर सुमारे 6 किमी लांबीचा जलाशय आहे व येथील परिसर निसर्गरम्य, फुलांचे नयनरम्य दृश्य,व शांततापूर्ण आहे. या धरणाकडे जाणारा रस्ता गांधीनगरमधील इंद्रोडा गावातून जातो. व हे धरण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण एकदिवसीय पिकनिक आणि फोटोग्राफी साठी उत्तम डेस्टिनेशन आहे.
13) Mini Pavagadh Temple-

मिनी पावागढ हे गुजरात मधील गांधीनगर पासून थोड्या अंतरावर, निसर्गरम्य परिसरात, अंबड गावात असलेले माता महाकालीचे धार्मिक आणि ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराला पावागड मंदिराची प्रतिकृती मानले जाते. हे मंदिर 800 वर्षे जुने असून या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की ,साबरमती नदी किनाऱ्यावर एक ब्राह्मण शिवलिंग घेऊन बसले होते ते ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी महाकालीचे मंदिर आहे. भाविकांसाठी हे एक श्रद्धेचे ठिकाण असून नवरात्रि मध्ये येथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
14) Vasaniya Mahadev Mandir-


वासानिया महादेव मंदिर हे गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील वासन या गावाजवळ प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर वासन गावाजवळ असल्याने वासानिया महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते.आणि हे मंदिर श्री वैजनाथधाम म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील आकर्षण म्हणजे या मंदिराच्या समोर भगवान शनिदेव आणि श्री साईबाबांचे मंदिर व भगवान हनुमानजींची 53 फूट उंचीची अद्वितीय मूर्ती आहे.
हे मंदिर खूप मोठ्या परिसरात असून येथे सर्व ज्योतिर्लिगांची प्रतिकृती स्थापित केली आहेत. तसेच येथील हनुमानाच्या पुतळ्याजवळ अशोक वाटिका उभारण्यात आली आहे. महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.
15)Mahudi Jain Temple-

महुदी जैन मंदिर हे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील मानसा तालुक्यातील,महुदी गावात असलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे.या जैन मंदिराची स्थापना 1917 मध्ये श्वेतांबर जैन भिक्षू बुद्धिसागरसुरी यांनी केली. हे मंदिर जैन देवता घटकर्ण महावीरांनाआणि सहाव्या तीर्थंकर , पद्मप्रभ यांना समर्पित असून श्वेतांबर जैन आणि इतर समुदायांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे.
हे ऐतिहासिक ठिकाण पूर्वी मधुपुरी म्हणून ओळखले जात होते. या मंदिराच्या मध्यवर्ती ठिकाणी देवता पद्मप्रभ यांची 22 इंची संगमरवरी मूर्ती आहे. तसेच येथे भक्तांसाठी ‘सुखडी’ प्रसाद दिला जातो.
16)Children’s Park-

चिल्ड्रन्स पार्क हे गुजरात मधील गांधीनगर शहराच्या सेक्टर 28 मध्ये असलेले मुलांसाठी आणि कुटुंबासाठी एक लोकप्रिय उद्यान आहे. हे एक शांत ठिकाण असून येथे लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी तलाव,मिनी ट्रेन खेळणी ट्रेन, बोटिंग, क्लाइंबिंग हिल्स आणि इतर अनेक मनोरंजक राईड्स आहेत. तसेच येथील तलावात तुम्ही बोटिंग करू शकता आणि या पार्कमध्ये स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध आहेत. या निसर्गरम्य, फुलांनी आणि झाडांनी नटलेल्या शांत उद्यानात, स्थानिक व पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.
17)Icchapurti Hanuman Temple –

इच्छापूर्ती हनुमान मंदिर हे गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील सेक्टर 27 मध्ये असलेले सुंदर मंदिर आहे.या मंदिरात हनुमानाने आपल्या एका खांद्यावर संपूर्ण पर्वत उचललेली एक अनोखी मूर्ती आहे. या मंदिरात एकच शिवलिंगही स्थापित केलेले आहे. या मंदिरातील वातावरण अत्यंत भक्तीमय व शांत असल्यामुळे लोक श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात.
हा हनुमान भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो म्हणून,या मंदिराला ‘इच्छापूर्ती’ असे नाव देण्यात आले आहे. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी येथे भक्तांची गर्दी असते.
18)Dholeshwar Mahadev Temple-

ढोलेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या गांधीनगरजवळ रांदेसन गावात, साबरमती नदीच्या काठावर असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. असे सांगितले जाते की हे हे मंदिर 1000 वर्षापूर्वीचे म्हणजे महाभारत काळापासूनचे आहे.याचा उल्लेख पद्म पुराण, स्कंद पुराण आणि शिव पुराणात आढळतो. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, देवराज इंद्राने आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती.
हे मंदिर ‘काश्मीरचे काशी’ म्हणूनही ओळखले जाते. कारण जर कोणत्या भक्ताला काशीला जाता आले नाही, तर या ठिकाणी जाऊन साबरमती नदीत स्नान केल्यानंतर भक्ताला काशीला गेल्याचे पुण्य मिळते. महाशिवरात्री व श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
19)Uvarsad Ni Vav-

उवारसाद वाव ही गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील उवारसाद गावात असलेली एक ऐतिहासिक पायऱ्यांचे विहीर (stepwell) आहे. ही पूर्वाभिमुखी पायऱ्यांची विहीर 350 वर्ष जुनी असून ही विहीर प्रसिद्ध अदलाज वावपासून फक्त 5 किमी अंतरावर आहे. या विहिरीचे स्थापना हिंदू राजाने केलेली असल्याचे सांगितले जाते.या वावेच्या खांबांवर व भिंतींवर भारतीय आणि इस्लामिक स्थापत्यशैलीचे मिश्रण आहे. या विहिरीत दगडी खांब आणि तुळया आहेत. व चुन्याच्या मशाली आहेत.
1)गांधीनगरमधील प्रमुख पर्यटन स्थळे कोणती आहेत?
गांधीनगर मध्ये अक्षरधाम मंदिर, अडालज त्रिमंदिर, मिनी पावागढ, आणि वासनिया महादेव मंदिर ही सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहेत.
2) गांधीनगर शहरातील चिल्ड्रन्स पार्क किती सेक्टर मध्ये आहे ?
गांधीनगर शहरातील चिल्ड्रन्स पार्क हे 28 सेक्टर मध्ये आहे.
3) गांधीनगर जिल्ह्यातील कारागिरांचे गाव कोणते आहे ?
गांधीनगर जिल्ह्यातील कारागिरांचे पेठापूर हे गाव आहे .


